< 1 Samuel 12 >
1 Afei, Samuel kasa kyerɛɛ ɔman no bio sɛ, “Deɛ mopɛɛ sɛ meyɛ no mayɛ, mama mo ɔhene.
१शमुवेल सर्व इस्राएलास म्हणाला, “पाहा जे तुम्ही मला म्हणाला ती प्रत्येक गोष्ट ऐकून मी तुम्हावर एक राजा नेमला आहे.
2 Matwa me mmammarima ho ayi no, na megyina ha sɛ akɔkoraa tidwono. Masom sɛ mo ɔkannifoɔ firi me mmɔfraase.
२तर आता पाहा, राजा तुम्हापुढे चालत आहे, आणि मी म्हातारा होऊन केस पिकलेला झालो आहे; पाहा, माझे पुत्र तुम्हाजवळ आहेत. व मी आपल्या तरुणपणापासून आजपर्यंत तुम्हापुढे चाललो आहे.
3 Afei, monka nkyerɛ me, ɛberɛ a megyina Awurade ne deɛ wɔasra no wɔ ne din mu anim yi, hwan nantwie anaa nʼafunumu na mawia? Masisi mo mu bi pɛn anaa? Madi mo nya pɛn anaa? Magye adanmudeɛ bi pɛn anaa? Sɛ mayɛ bɔne bi a, monka nkyerɛ me, na mɛtenetene deɛ manyɛ no yie.”
३मी हा येथे आहे; परमेश्वरासमोर व त्याच्या अभिषिक्तासमोर माझ्याविरूद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला काय? मी कोणाचे गाढव घेतले काय? मी कोणाला लबाडीने लुबाडले आहे काय? मी कोणावर जुलूम केला आहे काय? मी डोळे बंद करून कोणाकडून लाच घेतली काय? माझ्याविरूद्ध साक्ष द्या, म्हणजे मी त्याची भरपाई करीन.”
4 Wɔbuaa sɛ, “Dabi, wonsisii yɛn, na wonnii yɛn nya ɛkwan biara so, na wonnyee adanmudeɛ fua pɛ mpo.”
४ते म्हणाले, “तुम्ही आम्हास फसवले नाही, आमच्यावर जुलूम केला नाही, किंवा कोणा मनुष्याच्या हातून काही चोरले नाही.”
5 Samuel kaa sɛ, “Awurade ne ne onipa a wɔasra no no yɛ mʼadansefoɔ sɛ morentumi nka sɛ mabɔ mo korɔno.” Wɔn nyinaa kaa sɛ, “Ampa ara, ɛyɛ nokorɛ!”
५मग तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हास काही सापडले नाही याविषयी आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे आणि त्याचा अभिषिक्त साक्षी आहे.” ते म्हणाले, “परमेश्वर साक्षी आहे.”
6 Samuel toaa so sɛ, “Ɛyɛ Awurade na ɔyii Mose ne Aaron. Ɔno na ɔyii mo agyanom firii Misraim asase so.
६शमुवेल लोकांस म्हणाला, “ज्याने मोशेला व अहरोनाला नेमले, आणि ज्याने तुमच्या वडिलांना मिसर देशातून काढून वर आणले तो तर परमेश्वरच आहे.
7 Seesei, monnyina ha dinn wɔ Awurade anim ɛberɛ a megu so rekaakae mo nneɛma akɛseɛ a Awurade ayɛ ama mo ne mo agyanom no.
७तर आता, स्थिर उभे राहा, म्हणजे परमेश्वराने न्यायीपणाची जी सर्व कृत्ये तुम्हासाठी व तुमच्या वडिलांसाठी केली त्याविषयी मी परमेश्वरासमोर विनंती करतो.
8 “Ɛberɛ a na Israelfoɔ wɔ Misraim na wɔsu frɛɛ Awurade no, ɔsomaa Mose ne Aaron sɛ, wɔnnyi wɔn mfiri Misraim, na wɔmfa wɔn mmra saa asase yi so.
८याकोब मिसरात गेल्यावर, तुमच्या वाडवडिलांनी परमेश्वराकडे आरोळी केली. तेव्हा परमेश्वराने मोशेला व अहरोनाला पाठवले, त्यांनी तुमच्या वाडवडिलांना मिसरातून काढून आणले आणि या ठिकाणी वसवले.
9 “Nanso, ankyɛre biara na nnipa no werɛ firii Awurade, wɔn Onyankopɔn, enti ɔmaa Sisera a ɔyɛ Hasor akodɔm sahene no ne Filistifoɔ ne Moabhene dii wɔn so.
९पण परमेश्वर त्यांचा देव याला ते विसरले तेव्हा त्याने हासोराचा सेनापती सीसरा याच्या हाती, व पलिष्ट्यांच्या हाती, व मवाबाचा राजा याच्या हाती, त्यांना विकले आणि ते त्यांच्याशी लढले.
10 Afei, wɔsu frɛɛ Awurade bio, na wɔpaee mu kaa wɔn bɔne sɛ, ‘Yɛayɛ bɔne sɛ yɛatwe yɛn ho afiri Awurade ho, na yɛresom ahoni Baalim ne Astoret. Na sɛ wogye yɛn firi yɛn atamfoɔ nsam a, yɛbɛsom wo, na wo nko ara na yɛbɛsom.’
१०तेव्हा ते परमेश्वरास हाक मारून म्हणाले, आम्ही पाप केले आहे, कारण आम्ही परमेश्वरास सोडून बआल आणि अष्टारोथ या मुर्तींची सेवा केली आहे. परंतु आता तू आमच्या शत्रूच्या हातातून आम्हास सोडीव म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.
11 Na Awurade somaa Yerub-Baal, Barak, Yefta ne Samuel, na ɔgyee mo firii mo atamfoɔ nsam na mobɛtenaa asomdwoeɛ mu.
११मग परमेश्वराने यरुब्बाल, बदान, व इफ्ताह, व शमुवेल यांना पाठवून तुम्हास तुमच्या चहूकडल्या शत्रूच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला.
12 “Nanso, mosuroo Amonfoɔ ɔhene Nahas enti, moka kyerɛɛ me sɛ, ‘Dabi, yɛrepɛ ɔhene ama wadi yɛn so’—nanso na Awurade mo Onyankopɔn yɛ mo so ɔhene.
१२परंतु अम्मोनाच्या संतानाचा राजा नाहाश तुम्हावर आला असे तुम्ही पाहिले, तेव्हा परमेश्वर तुमचा देव तुमचा राजा होता तरी, तुम्ही मला म्हणालात की, असे नको तर आम्हावर राजा राज्य करो.
13 Afei, mo ɔhene a moayi no nie; deɛ mobisaeɛ no. Hwɛ, Awurade ayɛ mo apɛdeɛ ama mo.
१३तर आता जो राजा तुम्ही निवडला ज्याला तुम्ही मागितले, तो हा पाहा; पाहा परमेश्वराने तुम्हावर राजा नेमला आहे.
14 Sɛ mosuro Awurade, na mosom no, tie nʼasɛm, na sɛ moammu ne mmara so, na mo ne mo ɔhene a ɔdi mo so no nyinaa di Awurade, mo Onyankopɔn akyi a, biribiara bɛyɛ yie.
१४जर तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची सेवा कराल, त्याची वाणी ऐकाल, आणि परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध बंड करणार नाही, तर तुम्ही व तुम्हावर राज्य करणारा तुमचा राजाही परमेश्वर तुमचा देव याला मानीत जाल तर बरे.
15 Na sɛ moantie Awurade, na motia ne mmara a, ne nsa bɛyɛ duru wɔ mo so sɛdeɛ ɛyɛɛ mo agyanom so no.
१५परंतु तुम्ही परमेश्वराची वाणी न ऐकून त्याच्या आज्ञेच्याविरूद्ध बंड कराल, तर परमेश्वराचा हात जसा तुमच्या वाडवडिलांविरूद्ध होता, तसा तो तुमच्याविरुध्द होईल.
16 “Enti afei, monnyina hɔ dinn, na monhwɛ ade kɛseɛ a Awurade rebɛyɛ.
१६तर आता तुम्ही स्वतःला सादर करा आणि जी मोठी गोष्ट परमेश्वर तुमच्या डोळ्यांपुढे करणार आहे ती पाहा.
17 Monim sɛ saa ɛberɛ yi a ɛyɛ ayuotwaberɛ yi, osuo nntɔ. Mɛma Awurade adwa aprannaa na ama osuo atɔ. Afei mobɛhunu bɔne a moyɛeɛ sɛ mobisaa ɔhene no.”
१७आज गव्हाची कापणी आहे की नाही? परमेश्वरास मी हाक मारीन, अशासाठी की, त्याने मेघांच्या गडगडाटसह पाऊस पाठवावा. मग तुम्ही जाणाल व पाहाल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने किती मोठे दुष्टपण केले.”
18 Ɛhɔ ara Samuel frɛɛ Awurade, na ɛda no ara, Awurade dwaa aprannaa, tɔɔ osuo. Nnipa no nyinaa suroo Awurade ne Samuel.
१८तेव्हा शमुवेलाने परमेश्वरास हाक मारली आणि त्याच दिवशी परमेश्वराने मेघगर्जनासह पाऊस पाठवला. म्हणून सर्व लोकांस परमेश्वराचे व शमुवेलाचे फार भय वाटले.
19 Nnipa no nyinaa ka kyerɛɛ Samuel sɛ, “Bɔ Awurade, wo Onyankopɔn, mpaeɛ ma wʼasomfoɔ sɛdeɛ yɛrenwuo, na yɛrenyɛ bɔne nka yɛn bɔne ahodoɔ nyinaa ho sɛ yɛabisa ɔhene.”
१९तेव्हा अवघे लोक शमुवेलाला म्हणाले, “आम्ही मरू नये म्हणून, परमेश्वर तुमचा देव याच्याकडे तुम्ही आपल्या सेवकांसाठी प्रार्थना करा. कारण आम्ही राजा मागून आपल्या सर्व पापांत आणखी या दुष्कर्माची भर टाकली आहे.”
20 Samuel buaa sɛ, “Monnsuro. Moayɛ saa bɔne yi nyinaa bi deɛ, nanso monnnane mo ani mfiri Awurade so, na momfa mo akoma nyinaa nsom Awurade.
२०मग शमुवेल लोकांस म्हणाला, “भिऊ नका. तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे, तथापि परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून भलतीकडे फिरू नका, तर आपल्या संपूर्ण मनाने परमेश्वराची सेवा करा.
21 Monnsane nkɔdi ahoni huhuo a wɔrenyɛ mo papa biara, na wɔrentumi nnye mo nkwa no akyi, ɛfiri sɛ, wɔn ho nni mfasoɔ.
२१तुम्ही भलत्या गोष्टींकडे वळू नका कारण जे लाभदायक नाहीत व ज्यांच्याने तुमचे रक्षण करवत नाही कारण त्या निरोपयोगी आहेत.
22 Esiane ne din kɛseɛ no enti, Awurade rempo ne nkurɔfoɔ. Awurade afa mo sɛ nʼankasa nʼadeɛ.
२२कारण आपल्या महान नावाकरता, परमेश्वर आपल्या लोकांस नाकारणार नाही, कारण तुम्हास आपले स्वत: चे लोक असे करणे परमेश्वरास आनंददायी वाटले.
23 Na me deɛ, merenyɛ bɔne ntia Awurade sɛ meremmɔ mpaeɛ mma mo. Na mɛkɔ so akyerɛ mo papa ne bɔne.
२३मी तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून देण्याने मी परमेश्वराच्या विरूद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच राहो. चांगला व सरळ मार्ग मी तुम्हास शिकवीन.
24 Nanso, monhwɛ sɛ mobɛsuro Awurade na moasom no nokorɛm.
२४केवळ परमेश्वराचे भय धरा आणि खरेपणाने वागून आपल्या संपूर्ण मनाने तुम्ही त्याची सेवा करा. कारण त्याने तुम्हासाठी केवढी महान कृत्ये केली आहेत हे तुम्ही लक्षात घ्या.
25 Na sɛ mokɔ so yɛ bɔne a, wɔbɛsɛe mo ne mo ɔhene nyinaa.”
२५परंतु जर तुम्ही वाईट करण्याचे चालूच ठेवाल तर तुम्ही आणि तुमचा राजा दोघे नष्ट व्हाल.”