< Nnwom 26 >
1 Dawid dwom. Bu me bem, Awurade, efisɛ, mabɔ bra a asɛm nni ho: mede me ho too Awurade so na manhinhim.
१दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे. मी परमेश्वरावर न डगमगता विश्वास ठेवला आहे.
2 Sɔ me hwɛ, Awurade, hwehwɛ me koma ne mʼadwene mu.
२हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर. माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा.
3 Wʼadɔe wɔ mʼanim daa na mɛnantew wo nokware mu.
३कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे.
4 Me ne nnaadaafo ntena na me ne nyaatwomfo nso nni hwee yɛ.
४कपटी लोकांबरोबर मी सहयोगी झालो नाही, किंवा मी अप्रामाणिक लोकांत मिसळलो नाही.
5 Mikyi nnebɔneyɛfo guabɔ na mempɛ sɛ me ne amumɔyɛfo tena.
५मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. आणि मी दुष्टांसोबत राहत नाही.
6 Mehohoro me nsa wɔ bembu mu, na mekɔ wʼafɔremuka ho ahyia, Awurade,
६मी आपले हात निर्दोषतेने धुईन, आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन.
7 na mepae mu ka wʼayeyi na meka wʼanwonwade nyinaa.
७अशासाठी की, मी तुझी स्तुती मोठ्याने करावी आणि तू केलेल्या आश्चर्याची कृत्ये सांगावी.
8 Mʼani gye ofi a wote mu ho, Awurade, faako a wʼanuonyam wɔ no.
८परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते.
9 Mfa me kra nka nnebɔneyɛfo de ho nkɔ, ne me nkwa nka mogyapɛfo de ho,
९पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस.
10 wɔn a amumɔyɛ nhyehyɛe wɔ wɔn nsam na adanmude ayɛ wɔn nsa nifa ma.
१०त्यांच्या हातात कट आहे, आणि त्यांचा उजवा हात लाच घेण्याने भरला आहे.
11 Nanso mebɔ ɔbra a ho tew; hu me mmɔbɔ na gye me nkwa.
११पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन, माझ्यावर दया कर आणि मला तार.
12 Mʼanan sisi asase tamaa so; na guabɔ kɛse ase na mɛkamfo Awurade.
१२माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे, सभेमध्ये मी परमेश्वराची स्तुती करीन.