< 2 Beresosɛm 20 >
1 Eyi akyi no, Moabfo, Amonfo ne Maonfo asraafo bi tuu Yehosafat so sa.
१यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनी लोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटावर चालून आले.
2 Abɔfo bɛka kyerɛɛ Yehosafat se, “Asraafo bebree fi Nkyene Po no akyi wɔ Edom rebɛko atia wo. Wɔadu Hasason-Tamar” (En-Gedi din baako ne no).
२काही लोकांनी येऊन यहोशाफाटाला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करून येत आहे. ती हससोन-तामार!” म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा.
3 Yehosafat tee saa asɛm no, ne ho yeraw no nti, obisaa Awurade hɔ akwankyerɛ. Ɔhyɛɛ sɛ obiara a ɔwɔ Yuda no nni abuada.
३यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वरास काय करावे, असे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली.
4 Na nnipa a wɔwɔ Yuda nkurow nyinaa so baa Yerusalem, bɛhwehwɛɛ Awurade.
४तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले.
5 Na Yehosafat sɔre gyinaa Yudafo ne Yerusalemfo anim wɔ Awurade Asɔredan no adiwo foforo hɔ.
५यहोशाफाट, परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांमध्ये तो उभा राहिला.
6 Ɔbɔɔ mpae se, “Awurade, yɛn agyanom Nyankopɔn, wo nko ne Onyankopɔn a wote ɔsoro. Wo na wudi ahenni a ɛwɔ asase nyinaa so. Woyɛ otumfo ne ɔkɛse a obiara ntumi ne wo nni asi.
६तो म्हणाला, “आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रामधल्या सर्व राज्यांचा तूच शास्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही.”
7 Yɛn Nyankopɔn, bere a wo nkurɔfo bedui no, woampam wɔn a na wɔte asase yi so no ana? Na woamfa saa asase yi amma wʼadamfo Abraham asefo afebɔɔ ana?
७तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलादेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस.
8 Wo nkurɔfo tenaa ha sii saa Asɔredan yi maa wo.
८अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाकरिता त्यांनी मंदिर बांधले.
9 Wɔkaa se, ‘Sɛ ɔhaw bi te sɛ ɔko, ɔyare anaa ɔkɔm bi to yɛn a, yebetumi aba wʼanim wɔ saa Asɔredan yi mu, baabi a wɔahyɛ wo din anuonyam no. Yebetumi asu afrɛ wo sɛ, gye yɛn nkwa, na wubetie yɛn, agye yɛn.’
९ते म्हणाले, तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे, “संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु, आमची हाक ऐकून तू आम्हास सोडव.”
10 “Na afei, hwɛ nea Amonfo, Moabfo ne Seir asraafodɔm reyɛ. Woamma yɛn agyanom anni saa aman no so nkonim bere a Israel fii Misraim no, na mmom, wɔfaa wɔn ho a wɔansɛe wɔn.
१०“पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेईर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांस तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही.
11 Afei, hwɛ sɛnea wɔretua yɛn so ka. Wɔaba sɛ, wɔrebetu yɛn afi wʼasase a wode maa yɛn sɛ agyapade no so.
११पण तेव्हाच त्यांच्या नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हास आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हास बहाल केला आहेस.
12 Yɛn Nyankopɔn, worensiw wɔn ano? Yenni ahoɔden sɛ asraafodɔm kɛse yi a wɔpɛ sɛ wɔbɛtow hyɛ yɛn so yi. Yenhu nea yɛnyɛ, na yɛhwɛ kwan sɛ wobɛboa yɛn.”
१२हे देवा, या लोकांस चांगले शासन कर. आमच्यावर चाल करून येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हास काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे.”
13 Bere a Yuda mmarima nyinaa ne wɔn nkokoaa, wɔn yerenom ne wɔn mma gyina Awurade anim no.
१३यहूदातील सर्व मंडळी आपल्या पत्नी आणि तान्ह्या मुलांसकट सर्व अपत्यांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती.
14 Awurade Honhom baa mmarima a wogyinagyina hɔ no mu baako so. Na ne din de Yahasiel a ɔyɛ Sakaria babarima a ɔno nso yɛ Benaia babarima, na ɔno nso yɛ Yeiel babarima, na ɔno nso yɛ Lewini Matania, a ɔyɛ Asaf aseni no babarima.
१४तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा पुत्र. जखऱ्या बनायाचा पुत्र. बनाया यईएलाचा पुत्र. आणि यईएल मत्तन्याचा पुत्र. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत
15 Ɔkae se, “Ɔhene Yehosafat, tie! Mo Yudafo ne Yerusalemfo nyinaa, muntie! Sɛnea Awurade se ni: Munnsuro. Mommma asraafodɔm kɛse ntu mo koma, efisɛ ɔko no nyɛ mo dea, na ɛyɛ Onyankopɔn dea.
१५यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरूशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे.
16 Ɔkyena, muntu nten nkɔ wɔn so. Mubehu sɛ wofi Sis atrapoe a ɛwɔ obon no fa a epue Yeruel sare no so hɔ reba.
१६उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल.
17 Na ɛho nhia mpo sɛ mobɛko. Munnyinagyina mo afa, monyɛ dinn na monhwɛ Awurade nkonimdi. Ɔka mo ho, Yuda ne Yerusalem manfo. Munnsuro, na mommma mo koma ntu. Ɔkyena, monkɔ hɔ, na Awurade ka mo ho.”
१७तुम्हास या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हास आढळून येईल. यहूदा आणि यरूशलेम लोकहो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.”
18 Na ɔhene Yehosafat sii ne ti ase, na Yuda ne Yerusalem manfo no nyinaa nso yɛɛ saa, de som Awurade.
१८यहोशाफाटाने मस्तक भूमीपर्यंत लववले. यहूदा आणि यरूशलेममधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले. त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली.
19 Na Lewifo a wofi Kohat ne Kora mmusua mu sɔre gyina teɛɛ mu dennen sɔree Awurade, Israel Nyankopɔn.
१९कहाथ आणि कोरह या घराण्यांतील लेवी इस्राएलच्या परमेश्वर देवाची भजने म्हणण्यास उभे राहिले. उच्च स्वरात त्यांनी परमेश्वराची भजने म्हटली.
20 Ade kyee nʼanɔpahema no, Yuda asraafo no kɔɔ Tekoa sare so. Bere a wɔrekɔ no, Yehosafat gyina kae se, “Muntie me, mo Yudafo ne Yerusalemfo nyinaa. Munnye Awurade, mo Nyankopɔn, nni na mubetumi agyina pintinn. Munnye nʼadiyifo no nni, na mubedi nkonim.”
२०यहोशाफाटाचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरूशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.”
21 Ɔhene no ne nnipa no ntuanofo dii nkitaho wiei no, oyii nnwontofo bi sɛ wonni asraafo no anim, nto dwom mma Awurade, nkamfo no wɔ nʼanuonyam kronkron no nti. Dwom no mu nsɛm ni: “Monna Awurade ase na nʼadɔe wɔ hɔ daa!”
२१यहोशाफाटाने लोकांस प्रोत्साहन दिले व सूचना दिल्या. परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले, “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची प्रीती सर्वकाळ आहे.”
22 Bere a wɔpagyaw ayeyi dwom no, Awurade maa Amon, Moab ne bepɔw Seir asraafo no twaa wɔn ho koe.
२२लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने यहूदावर चाल करून आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेईर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.
23 Moab ne Amon asraafo no dan wɔn ani kyerɛɛ mmarima a wofi bepɔw Seir so no, kunkum wɔn nyinaa. Wowiee Seir asraafo no, wotwaa wɔn ho koe.
२३अम्मोनी आणि मवाबी लोक सेईर पर्वतातल्या लोकांशी लढू लागले. अम्मोन्यांनी आणि मवाब्यांनी त्यांचा पुरता संहार केला. सेईरातल्या लोकांचा बीमोड केल्यानंतर त्यांनी एकमेकांचा नाश केला.
24 Na Yuda asraafo no duu baabi a wogyina a wuhu sare no so no, wohuu sɛ afunu gugu fam kɔ akyiri. Atamfo no mu baako mpo antumi anguan.
२४यहूदी लोक वाळवंटातील टेहळणीच्या बुरुजापाशी आले. शत्रूचे विशाल सैन्य कुठे दिसते का हे ते पाहू लागले पण त्यांना फक्त जमिनीवर विखुरलेले मृतदेह तेवढे दिसले. कोणीही जिवंत राहिला नव्हता.
25 Ɔhene Yehosafat ne nʼakofo no kɔtasee asade. Wonyaa adwumayɛ nneɛma, ntade ne nneɛma a ɛsom bo a wontumi nsoa. Na asade no dɔɔso enti wɔde nnansa na ɛtase ne nyinaa.
२५यहोशाफाट आणि त्याचे सैन्य लुटीसाठी मृतदेहापाशी आले. त्यामध्ये त्यांना खूप, धन, आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या. त्या त्यांनी स्वत: ला घेतल्या. लूट एवढी होती की ती यहोशाफाट आणि त्याचे लोक यांना नेता येईना. ती प्रेतांमधून काढून न्यायला त्यांना तीन दिवस लागले.
26 Nnaanan so no, wɔboaa wɔn ho ano wɔ Nhyira Bon mu. Wɔtoo obon no din saa da no, efisɛ ɛhɔ na nnipa no kamfoo Awurade, daa no ase. Wɔda so frɛ no Nhyira Bon nnɛ yi.
२६चौथ्या दिवशी यहोशाफाट आणि त्याचे सैन्य बराखाच्या खोऱ्यात जमले. याठिकाणी त्यांनी परमेश्वरास धन्यवाद दिले. म्हणून आजही या खोऱ्याचे नाव आशीर्वादाचे खोरे असे आहे.
27 Afei, Yehosafat dii wɔn anim ne wɔn san kɔɔ Yerusalem anigye so sɛ, Awurade ama wɔadi wɔn atamfo so nkonim.
२७मग यहोशाफाटाने समस्त यहूदा आणि यरूशलेम लोकांस यरूशलेम येथे माघारी नेले. परमेश्वराने त्यांच्या शत्रूंचा पाडाव केल्यामुळे त्यांच्यात आनंदी आनंद पसरला होता.
28 Wɔbɔɔ mmɛnta, asankuten ne ntorobɛnto tuu nten kɔhyɛn Yerusalem na wɔkɔɔ Awurade Asɔredan no mu.
२८यरूशलेमेला येऊन ते सतारी, वीणा व कर्णे घेऊन परमेश्वराच्या मंदिरात गेले.
29 Bere a ahenni a atwa hɔ ahyia no tee sɛ Awurade no ankasa ako atia Israel atamfo no, Awurade ho suro baa wɔn so.
२९परमेश्वराने इस्राएलाच्या शत्रू सैन्याशी लढा दिला हे ऐकून सर्व देशांमधल्या सर्व राज्यांमध्ये परमेश्वराविषयी धाक निर्माण झाला.
30 Na ɛmaa asomdwoe baa Yehosafat ahenni mu, efisɛ ne Nyankopɔn maa no ahomegye wɔ afanan nyinaa.
३०त्यामुळे यहोशाफाटाच्या राज्यात शांतता नांदली. देवाने यहोशाफाटाला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले.
31 Na Yehosafat dii hene wɔ Yuda asase so. Bere a odii hene no, na wadi mfe aduasa anum. Ɔtenaa Yerusalem dii hene mfe aduonu anum. Na ne na din de Asuba a ɔyɛ Silhi babea.
३१यहोशाफाटाने यहूदा देशावर राज्य केले. राज्यावर आला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर पंचवीस वर्षे राज्य केले. यहोशाफाटाच्या आईचे नाव अजूबा ही शिल्हीची कन्या.
32 Na Yehosafat yɛ ɔhene a oye. Ɔyɛɛ nea nʼagya Asa yɛe. Ɔyɛɛ nea ɛsɔ Awurade ani.
३२आपले पिता आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला. त्याने मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटाने केले.
33 Nanso nʼahenni mu no, wammubu abosonsomfo nsɔree so no, na ɔmanfo no nso amfa wɔn koma nyinaa amma wɔn agyanom Nyankopɔn no.
३३पण उच्चस्थाने काढण्यात आली नव्हती. लोकांनीही आपले मन आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळवले नव्हते.
34 Yehosafat ahenni ho nsɛm nkae, fi mfiase kosi awiei no, wɔakyerɛw agu Hanani babarima Yehu nhoma a wɔde aka Israel Ahemfo nhoma no ho.
३४हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटाच्या बाकीच्या कृत्यांची संपूर्ण नोंद आहे. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात या गोष्टींचा समावेश करून त्यांची नोंद केली आहे.
35 Nanso ɛrekɔ nʼasetena awiei no, ɔhene Yehosafat ne Israelhene Ahasia a ne tirim yɛ den no kaa wɔn ho bɔɔ mu.
३५इस्राएलचा राजा अहज्या याच्याशी पुढे यहूदाचा राजा यहोशाफाट याने करार केला. यहोशाफाट ने हे वाईट केले.
36 Wɔyɛɛ Po so aguadi ahyɛn bebree wɔ Esion-Geber hyɛngyinabea.
३६तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन-गेबेर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली.
37 Na Dodafahu babarima Elieser a ofi Maresa hyɛɛ nkɔm, de tiaa Yehosafat. Ɔkae se, “Esiane sɛ wo ne ɔhene Ahasia ayɛ baako nti, Awurade bɛsɛe wʼadwuma.” Enti ahyɛn no bobɔe a wɔantumi amfa ankodi gua.
३७पुढे अलियेजर ने यहोशाफाटाविरुध्द भविष्य सांगितले. मारेशा नगरातला दोदावाहू याचा अलियेजर हा पुत्र. तो म्हणाला, “यहोशाफाट, तू अहज्याशी हातमिळवणी केलीस म्हणून परमेश्वर तुझ्या कामांचा विध्वंस करील.” आणि जहाजे फुटली. त्यामुळे यहोशाफाट आणि अहज्या यांना ती तार्शीशला पाठवता आली नाहीत.