< 1 Beresosɛm 10 >

1 Afei, Filistifo no bɛtow hyɛɛ Israel so, maa Israelfo no guanee. Wokunkum wɔn mu pii wɔ bepɔw Gilboa so.
आणि पलिष्टी इस्राएलाविरूद्ध लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्राएल मनुष्याने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले.
2 Filistifo no kaa Saulo ne ne mmabarima hyɛe. Wokunkum wɔn mu baasa a wɔne Yonatan, Abinadab ne Malki-Sua.
पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे पुत्र यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या त्याच्या पुत्रांना पलिष्ट्यांनी मारले.
3 Ɔko no ano yɛɛ den twaa Saulo ho hyiae, maa Filistifo agyantowfo no nyaa Saulo piraa no yiye.
शौलाविरूद्ध त्यांनी घनघोर युध्द केले आणि तिरंदाजानी त्यास गाठले. तो तिरंदाजामुळे असह्य यातनेत होता.
4 Saulo fi apinisi mu ka kyerɛɛ nʼakodekurafo no se, “Twe wʼafoa, fa wɔ me kum me na Filistifo abosonsomfo yi ammɛto me, angu mʼanim ase.” Nanso na nʼakodekurafo no suro nti, wanyɛ saa. Enti Saulo twee ɔno ara nʼafoa, de kum ne ho.
नंतर शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार काढ आणि तिने मला जोराने आरपार भोसक. नाहीतर हे बेसुंती येऊन माझ्याशी वाइट रीतीने वागतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करण्यास तयार झाला नाही, तो फार घाबरला होता. म्हणून शौलाने स्वत: ची तलवार काढली आणि तिच्यावर तो पडला.
5 Bere a nʼakodekurafo no huu sɛ Saulo awu no, ɔno nso de nʼafoa kum ne ho.
जेव्हा त्याच्या शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहिले, तेव्हा त्याचप्रमाणे त्यानेही तलवार उपसून त्यावर पडला व मेला.
6 Ɛno nti, Saulo ne ne mma mmarima baasa no wuwuu hɔ ara, maa nʼahenni nnidiso no baa awiei.
अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र व त्याच्या घरातील सर्व सदस्यांना एकत्र मरण आले.
7 Bere a Israelfo a wɔwɔ Yesreel bon no mu no huu sɛ wɔadi wɔn asraafo no so, na Saulo ne ne mmabarima baasa no awuwu no, woguan gyaa wɔn nkurow hɔ. Ɛno nti, Filistifo no kɔfaa wɔn nkurow no.
जेव्हा खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक इस्राएल मनुष्याने पाहिले की, शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत आणि त्यांनी पळ काढला. तेव्हा त्यांनीही आपली नगरे सोडून पळ काढला. नंतर पलिष्टी आले आणि त्यामध्ये राहू लागले.
8 Ade kyee a Filistifo no kɔɔ sɛ wɔrekoyiyi atɔfo no ho nneɛma no, wohuu sɛ Saulo ne ne mmabarima no amu gugu bepɔw Gilboa so.
मग असे झाले की, दुसऱ्या दिवशी पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे पुत्र यांचे मृतदेह सापडले.
9 Enti woyiyii Saulo akode fii ne ho, twaa ne ti. Afei wɔbɔɔ Saulo wu no ho dawuru maa wɔn ahoni ne nnipa a wɔwɔ Filistia nyinaa tee.
त्यांनी त्याचे कपडे आणि त्याचे मस्तक व चिलखत काढून घेतले. ही बातमी आपल्या मूर्तींना आणि लोकांस कळवायला त्यांनी पलिष्ट्यांच्या देशभर दूत पाठवले.
10 Wɔde nʼakode no guu wɔn anyame no abosonnan mu, na wɔkyekyeree ne ti no fam Dagon asɔredan no fasu ho.
१०त्यांनी त्याचे चिलखत आपल्या देवाच्या मंदिरात आणि शिर दागोनाच्या मंदिरात टांगले.
11 Nanso Yabes Gileadfo tee nea Filistifo ayɛ Saulo no,
११पलिष्ट्यांनी शौलाचे जे केले होते ते सर्व जेव्हा याबेश गिलाद नगरातील लोकांनी ऐकले.
12 wɔn akofo kɔfaa Saulo ne ne mmabarima baasa no amu baa Yabes. Na wosiee wɔn amu wɔ odum dua bi a ɛwɔ Yabes ase, na wodii mmuada nnanson.
१२तेव्हा त्यांच्यातील सर्व सैनिक शौल आणि त्याची अपत्ये यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश येथे आणले. याबेश येथे एका मोठ्या एला वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.
13 Na Saulo wui, efisɛ wanni Awurade nokware. Wanni Awurade ahyɛde so, na mpo, ɔkɔɔ asamanfrɛ
१३शौल परमेश्वराशी अविश्वासू होता म्हणून त्यास मरण आले. त्याने परमेश्वराने दिलेल्या सूचना यांचे पाळन केले नाही, परंतु भूतविद्या प्रवीण स्रिकडे सल्ला विचारण्यास गेला.
14 wɔ bere a anka ɛsɛ sɛ obisa Awurade nkyɛn akwankyerɛ. Ɛno nti, Awurade kum no, de nʼahenni hyɛɛ Yisai babarima Dawid nsa.
१४त्याने परमेश्वराकडून मार्गदर्शन घेतले नाही. म्हणून परमेश्वराने त्यास मारले आणि इशायाचा पुत्र दावीद याच्याकडे राज्य सोपवले.

< 1 Beresosɛm 10 >