< Markos 9 >

1 İsa, “Size doğrusunu söyleyeyim” diye devam etti, “Burada bulunanlar arasında, Tanrı Egemenliği'nin güçlü biçimde gerçekleştiğini görmeden ölümü tatmayacak olanlar var.”
येशू त्या लोकांस म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की, ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.”
2 Altı gün sonra İsa, yanına yalnız Petrus, Yakup ve Yuhanna'yı alarak yüksek bir dağa çıktı. Onların gözü önünde İsa'nın görünümü değişti.
सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले.
3 Giysileri göz kamaştırıcı bir beyazlığa büründü; yeryüzünde hiçbir çamaşırcının erişemeyeceği bir beyazlıktı bu.
त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शुभ्र करता येणार नाहीत, अशी झाली होती.
4 O anda Musa'yla İlyas öğrencilere göründü. İsa'yla konuşuyorlardı.
तेव्हा एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रकट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते.
5 Petrus İsa'ya, “Rabbî, burada bulunmamız ne iyi oldu! Üç çardak kuralım: Biri sana, biri Musa'ya, biri de İlyas'a” dedi.
पेत्र येशूला म्हणाला, “रब्बी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण तीन मंडप बनवू. एक आपणासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”
6 Ne söyleyeceğini bilmiyordu. Çünkü çok korkmuşlardı.
पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्यास समजेना कारण ते भयभीत झाले होते.
7 Bu sırada bir bulut gelip onlara gölge saldı. Buluttan gelen bir ses, “Sevgili Oğlum budur, O'nu dinleyin!” dedi.
तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”
8 Öğrenciler birden çevrelerine baktılar, ama bu kez yanlarında İsa'dan başka kimseyi göremediler.
अचानक, त्यांनी एकदम सभोवती पाहीले तेव्हा त्यांना येशूशिवाय कोणीही दिसले नाही.
9 Dağdan inerlerken İsa, İnsanoğlu ölümden dirilmeden orada gördüklerini hiç kimseye söylememeleri için onları uyardı.
ते डोंगरावरून खाली येत असता, येशूने त्यांना आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहीले आहे ते मनुष्याचा पुत्र मरण पावलेल्यातून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”
10 Bu uyarıya uymakla birlikte kendi aralarında, “Ölümden dirilmek ne demek?” diye tartışıp durdular.
१०म्हणून त्यांनीही गोष्ट त्यांच्यातच ठेवली, परंतु ते मरण पावलेल्यातून उठणे याचा अर्थ काय याविषयी आपसात चर्चा करीत होते.
11 İsa'ya, “Din bilginleri neden önce İlyas'ın gelmesi gerektiğini söylüyorlar?” diye sordular.
११त्यांनी येशूला विचारले, “प्रथम एलीया आला पाहिजे असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणातात?”
12 O da onlara şöyle dedi: “Gerçekten de önce İlyas gelir ve her şeyi yeniden düzene koyar. Ama nasıl oluyor da İnsanoğlu'nun çok acı çekeceği ve hiçe sayılacağı yazılmıştır?
१२तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही व्यवस्थितपणे करतो हे खरे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे?
13 Size şunu söyleyeyim, İlyas geldi bile, onun hakkında yazılmış olduğu gibi, ona yapmadıklarını bırakmadılar.”
१३मी तुम्हास सांगतो, एलीया आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे, त्यांना पाहिजे तसे त्यांनी त्याचे केले.”
14 Öteki öğrencilerin yanına döndüklerinde, onların çevresinde büyük bir kalabalığın toplandığını, birtakım din bilginlerinin onlarla tartıştığını gördüler.
१४नंतर ते शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांना त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय आहे आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्याच्याशी वाद करत आहेत असे त्यांना दिसले.
15 Kalabalık İsa'yı görünce büyük bir şaşkınlığa kapıldı ve koşup O'nu selamladı.
१५सर्व लोक येशूला पाहताच आश्चर्यचकित झाले आणि ते त्याचे स्वागत करण्यासाठी धावले.
16 İsa öğrencilerine, “Onlarla ne tartışıyorsunuz?” diye sordu.
१६येशूने शिष्यांना विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालीत आहात?”
17 Halktan biri O'na, “Öğretmenim” diye karşılık verdi, “Dilsiz bir ruha tutulan oğlumu sana getirdim.
१७तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले. त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही.
18 Ruh onu nerede yakalarsa yere çarpıyor. Çocuk ağzından köpükler saçıyor, dişlerini gıcırdatıyor ve kaskatı kesiliyor. Ruhu kovmaları için öğrencilerine başvurdum, ama başaramadılar.”
१८आणि जेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”
19 İsa onlara, “Ey imansız kuşak!” dedi. “Sizinle daha ne kadar kalacağım? Size daha ne kadar katlanacağım? Çocuğu bana getirin!”
१९येशू त्यांना म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? मी तुमच्याबरोबर कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.”
20 Çocuğu kendisine getirdiler. Ruh, İsa'yı görür görmez çocuğu şiddetle sarstı; çocuk yere düştü, ağzından köpükler saçarak yuvarlanmaya başladı.
२०नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला.
21 İsa çocuğun babasına, “Bu hal çocuğun başına geleli ne kadar oldu?” diye sordu. “Küçüklüğünden beri böyle” dedi babası.
२१नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?” वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे.
22 “Üstelik ruh onu öldürmek için sık sık ateşe, suya attı. Elinden bir şey gelirse, bize yardım et, halimize acı!”
२२पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा.”
23 İsa ona, “Elimden gelirse mi? İman eden biri için her şey mümkün!” dedi.
२३येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.”
24 Çocuğun babası hemen, “İman ediyorum, imansızlığımı yenmeme yardım et!” diye feryat etti.
२४तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका.”
25 İsa, halkın koşuşup geldiğini görünce kötü ruhu azarlayarak, “Sana buyuruyorum, dilsiz ve sağır ruh, çocuğun içinden çık ve ona bir daha girme!” dedi.
२५येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.”
26 Bunun üzerine ruh bir çığlık attı ve çocuğu şiddetle sarsarak çıktı. Çocuk ölü gibi hareketsiz kaldı, öyle ki oradakilerin birçoğu, “Öldü!” diyordu.
२६नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांस वाटले, तो मरण पावला.
27 Ama İsa elinden tutup kaldırınca, çocuk ayağa kalktı.
२७परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला.
28 İsa eve girdikten sonra öğrencileri özel olarak O'na, “Biz kötü ruhu neden kovamadık?” diye sordular.
२८नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्यास एकांतात विचारले, “आम्ही तो अशुद्ध आत्मा का काढू शकलो नाही?”
29 İsa onlara, “Bu tür ruhlar ancak duayla kovulabilir” yanıtını verdi.
२९येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचूनदुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही.”
30 Oradan ayrılmış, Celile bölgesinden geçiyorlardı. İsa hiç kimsenin bunu bilmesini istemiyordu.
३०ते तेथून निघाले आणि गालील प्रांतातून प्रवास करीत चालले होते. हे कोणालाही कळू नये अशी येशूची इच्छा होती.
31 Öğrencilerine öğretirken şöyle diyordu: “İnsanoğlu, insanların eline teslim edilecek ve öldürülecek, ama öldürüldükten üç gün sonra dirilecek.”
३१कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्यास ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.”
32 Onlar bu sözleri anlamıyor, İsa'ya soru sormaktan da korkuyorlardı.
३२पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याविषयी त्यास विचारण्यास ते भीत होते.
33 Kefarnahum'a vardılar. Eve girdikten sonra İsa onlara, “Yolda neyi tartışıyordunuz?” diye sordu.
३३पुढे ते कफर्णहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, “वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता?”
34 Hiç birinden ses çıkmadı. Çünkü yolda aralarında kimin en büyük olduğunu tartışmışlardı.
३४परंतु ते गप्प राहिले कारण वाटेत त्यांनी सर्वांत मोठा कोण याविषयी चर्चा चालली होती.
35 İsa oturup Onikiler'i yanına çağırdı. Onlara şöyle dedi: “Birinci olmak isteyen en sonuncu olsun, herkesin hizmetkârı olsun.”
३५मग येशू खाली बसला, त्याने बाराजणांना बोलावून त्यांना म्हटले, “जर कोणाला पहिले व्हावयाचे असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
36 Küçük bir çocuğu alıp orta yere dikti, sonra onu kucağına alarak onlara şöyle dedi: “Böyle bir çocuğu benim adım uğruna kabul eden, beni kabul etmiş olur. Beni kabul eden de beni değil, beni göndereni kabul etmiş olur.”
३६मग येशूने एक बालकास घेऊन त्यांच्यामध्ये उभे केले व त्यांना म्हणाला?
३७“जो कोणी या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठवले त्याचाही स्वीकार करतो.”
38 Yuhanna O'na, “Öğretmenim” dedi, “Senin adınla cin kovan birini gördük, ama bizi izleyenlerden olmadığı için ona engel olmaya çalıştık.”
३८योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भूते काढताना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आपल्यापैकी नव्हता.”
39 “Ona engel olmayın!” dedi İsa. “Çünkü benim adımla mucize yapıp da ardından beni kötüleyecek kimse yoktur.
३९परंतु येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो कोणी माझ्या नावाने चमत्कार करतो तो नंतर माझ्याविषयी वाईट बोलू शकणार नाही.
40 Bize karşı olmayan, bizden yanadır.
४०जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
41 Size doğrusunu söyleyeyim, Mesih'e ait olduğunuz için sizlere bir bardak su veren ödülsüz kalmayacaktır.”
४१मी तुम्हास खरे सांगतो, ख्रिस्ताचे म्हणून तुम्हास जो कोणी एक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही.”
42 “Kim bana iman eden bu küçüklerden birini günaha düşürürse, boynuna kocaman bir değirmen taşı geçirilip denize atılması kendisi için daha iyi olur.
४२माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी देवापासून परावृत्त करील, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे.
43 Eğer elin günah işlemene neden olursa, onu kes. Tek elle yaşama kavuşman, iki elle sönmez ateşe, cehenneme gitmenden iyidir. (Geenna g1067)
४३जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे. (Geenna g1067)
४४
45 Eğer ayağın günah işlemene neden olursa, onu kes. Tek ayakla yaşama kavuşman, iki ayakla cehenneme atılmandan iyidir. (Geenna g1067)
४५आणि जर तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे. (Geenna g1067)
४६
47 Eğer gözün günah işlemene neden olursa, onu çıkar at. Tanrı'nın Egemenliği'ne tek gözle girmen, iki gözle cehenneme atılmandan iyidir. (Geenna g1067)
४७जर तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नी विझत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे (Geenna g1067)
48 ‘Oradakileri kemiren kurt ölmez, Yakan ateş sönmez.’
४८
49 Çünkü herkes ateşle tuzlanacaktır.
४९कारण प्रत्येकाची अग्नीने परीक्षा घेतली जाईल.
50 Tuz yararlıdır. Ama tuz tuzluluğunu yitirirse, bir daha ona nasıl tat verebilirsiniz? İçinizde tuz olsun ve birbirinizle barış içinde yaşayın!”
५०“मीठ चांगले आहे. जर मीठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने रहा.”

< Markos 9 >