< Eyüp 37 >
1 “Yüreğim titrer buna, Yerinden oynar.
१“खरोखर हे ऐकूण माझे हृदय थरथरते, ते त्याच्या जागेवरून सरकले आहे.
2 Dinleyin, gürleyen sesini dinleyin, Ağzından çıkan sesi!
२ऐका! हो ऐका! देवाच्या आवाजाची गर्जना ऐका, देवाच्या मुखातून येणारा ध्वनी ऐका.
3 Şimşeğini göğün altındaki her yere, Yeryüzünün dört bucağına salar.
३देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. ती सर्व पृथ्वीभर चमकते.
4 Ardından bir ses gümbürder, Görkemli sesiyle gürler. Sesi duyulunca şimşekleri alıkoymaz.
४त्यानंतर आवाजाची गर्जना होते, देव त्याच्या वैभवी आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
5 Tanrı'nın sesi şaşılacak biçimde gürler, O, anlayışımızın ötesinde büyük işler yapar.
५देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न कळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
6 Çünkü kara, ‘Yere düş’ der, Sağanağa, ‘Bütün şiddetinle boşal.’
६तो हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो. ‘पावसास पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
7 Yarattığı bütün insanlar ne yaptığını bilsin diye, Herkese işini bıraktırır.
७देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांस तो काय करु शकतो हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.
8 Hayvanlar kovuklarına girer, İnlerinde otururlar.
८म्हणून पशू लपण्यास जातात, आणि त्यांच्या गूहेत राहतात.
9 Kasırga yuvasından kopar, Soğuk saçılan rüzgarlardan.
९दक्षिणेकडून चक्रीवादळ येते उत्तरेकडून थंड वारे येतात.
10 Tanrı'nın soluğu suları dondurur, Geniş sular buz tutar.
१०देवाच्या नि: श्वासाने बर्फ दिल्या जाते आणि पाण्याच्या विस्तार धातूसारखा गोठून जातो.
11 Bulutlara nem yükler, Şimşeğini her yana yayar.
११खरोखर, देव गडद ढगांना पाण्याने भरतो तो आपल्या विजेचा ढग चोहोकडे पसरवतो.
12 Yeryüzünde ne buyurursa yapmak üzere Bulutlar O'nun istediği yönde döner durur.
१२तो ढगांना सर्व पृथ्वीभर त्याच्या मार्गदर्शनाने पसरण्याची आज्ञा करतो देव जी आज्ञा देतो ती त्यांनी सर्व पृथ्वीच्या पाठीवर पाळावी.
13 Ya insanları cezalandırmak Ya da yeryüzünü sulayıp sevgisini göstermek için Yağmur gönderir.
१३काही वेळा हे सुधारणुक करण्यासाठी असते, काहीवेळा त्यांच्या भूमीसाठी, हे सर्व तो घडवून आणतो, आणि काहीवेळा विश्वासाच्या कराराची कृती असते
14 “Dinle, Eyüp, Dur da düşün Tanrı'nın şaşılası işlerini.
१४ईयोबा, याकडे लक्ष दे, थांब आणि देव ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्यांचा विचार कर.
15 Tanrı'nın bulutları nasıl düzenlediğini, Şimşeğini nasıl çaktırdığını biliyor musun?
१५देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का? तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?
16 Bulutların dengesini, Bilgisi kusursuz olanın şaşılası işlerini biliyor musun?
१६ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का? देव जो ज्ञानाने परिपूर्ण त्याचे आश्चर्यकर्म तू जाणतोस काय?
17 Dünyanın soluğu kesildiğinde Güneyin kavurucu rüzgarı altında Giysilerin seni terletmez mi?
१७तुझे कपडे गरम कसे होतात हे तुला समजते काय, दक्षिणेकडून वारे वाहते तेव्हा सगळे काही स्तब्ध असते.
18 Dökme tunç bir ayna kadar sert olan gökkubbeyi O'nunla birlikte yayabilir misin?
१८तो जसे आकाश पसरवतो तसे तू करू शकतो काय? जे आकाश ओतीव आरशाप्रमाणे अढळ आहे?
19 “O'na ne söyleyeceğimizi öğret bize, Çünkü karanlık yüzünden sözümüze düzen veremiyoruz.
१९देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग. अंधारामुळे आम्हास आमचे भाषण रचता येत नाही.
20 Konuşmak istediğim O'na söylenebilir mi? Kimse yutulmak ister mi?
२०मला त्याच्याशी बोलायचे आहे असे तो म्हणाला काय? तसे म्हणणे म्हणजे स्वत: चा नाश करून घेणे आहे.
21 Rüzgar geçip göğü temizlediğinde Gökte parıldayan ışığa kimse bakamaz.
२१आता, लोक सुर्य जेव्हा तापत असतो त्यावेळी लोक त्याकडे आकाशात बघू शकत नाही वाऱ्याने ढग पळवून लावले की तो स्वच्छ आणि चकचकीत दिसतो.
22 Altın parıltısı geliyor kuzeyden, Tanrı korkunç görkeme bürünmüş.
२२उत्तरेकडून सोनेरी वैभव येते, देवाच्या भोवती भितीदायक तेजोवलय असते.
23 Her Şeye Gücü Yeten'e biz ulaşamayız. Gücü yücedir, Adaleti ve eşsiz doğruluğuyla kimseyi ezmez.
२३जो सर्वशक्तिमान तो महान आहे आपणाला त्याचा शोध लागत नाही, तो सामर्थ्यवान आहे न्यायाने वागतो. तो लोकांस त्रास देत नाही.
24 Bu yüzden insanlar O'na saygı duyar, Çünkü O, bilgeleri dikkate almaz.”
२४म्हणूनच लोक त्याचे भय धरतात. परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांस मान देत नाही.”