< 2 Selanikliler 2 >
1 Rabbimiz İsa Mesih'in gelişine ve O'nunla birlikte olmak üzere toplanmamıza gelince: Kardeşler, size rica ediyoruz, Rab'bin gününün geldiğini ileri süren herhangi bir esin, bir söz ya da bizden gelmiş gibi gösterilen bir mektup hemen aklınızı karıştırmasın, sizi telaşlandırmasın.
१बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की,
२तुम्ही एकदम दचकून भांबावून जाऊ नका व घाबरू नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका;
3 Hiç kimse hiçbir şekilde sizi aldatmasın. Çünkü imandan dönüş başlamadıkça, mahvolacak olan o yasa tanımaz adam ortaya çıkmadıkça o gün gelmeyecektir.
३कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल;
4 Bu adam, tanrı diye anılan ya da tapılan her şeye karşı gelerek kendini hepsinden yüce gösterecek, hatta kendisini Tanrı ilan ederek Tanrı'nın Tapınağı'nda oturacaktır.
४तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे.
5 Daha yanınızdayken bunları size söylediğimi hatırlamıyor musunuz?
५मी तुमच्याबरोबर असतांना हे तुम्हास सांगत असे याची तुम्हास आठवण नाही काय?
6 Zamanı gelince ortaya çıkarılacak olan bu adamı şimdilik neyin engellediğini biliyorsunuz.
६त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हास ठाऊक आहे.
7 Evet, yasa tanımazlığın gizli gücü şu anda bile etkindir; ama bu gücü şimdilik engelleyen ortadan kaldırılıncaya dek görevini sürdürecektir.
७कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवीत आहे, परंतु जो आता अडथळा करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत अडथळा करीत राहील;
8 Sonra yasa tanımaz adam ortaya çıkacak. Rab İsa onu ağzının soluğuyla öldürecek, gelişinin görkemiyle yok edecek.
८मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील;
9 Yasa tanımaz adam, her türlü mucizede, yanıltıcı belirtilerle harikalarda ve mahvolanları aldatan her türlü kötülükte sergilenen Şeytan'ın etkinliğiyle gelecek. Mahvolanlar, gerçeği sevmeye ve böylece kurtulmaya yanaşmadıklarından mahvoluyorlar.
९सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अद्भूते करीत येईल
१०ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भूते आणि सर्वप्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
11 İşte bu nedenle Tanrı yalana kanmaları için onların üzerine yanıltıcı bir güç gönderiyor.
११त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्याठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो;
12 Öyle ki, gerçeğe inanmayan ve kötülükten hoşlananların hepsi yargılansın.
१२ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांचा न्यायनिवाडा व्हावा म्हणून असे होईल.
13 Ama biz, ey Rab'bin sevdiği kardeşler, sizler için her zaman Tanrı'ya şükran borçluyuz. Çünkü Tanrı, Ruh aracılığıyla kutsal kılınıp gerçeğe inanarak kurtulmanız için sizi ta başlangıçtan seçti.
१३प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे कारण पवित्र आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हास प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
14 Rabbimiz İsa Mesih'in yüceliğine kavuşmanız için, bildirdiğimiz Müjde'yle sizi bu kurtuluşa çağırdı.
१४त्यामध्ये त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.
15 Öyleyse dayanın, kardeşlerim! İster sözle ister mektupla, size ilettiğimiz öğretilere sımsıkı tutunun.
१५तर मग बंधूनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकविले ते बळकट धरून राहा.
16 Rabbimiz İsa Mesih'in kendisi ve bizi sevip lütfuyla bize sonsuz cesaret ve sağlam bir umut veren Babamız Tanrı sizi yüreklendirsin, her iyi eylem ve sözde pekiştirsin. (aiōnios )
१६आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकाळचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता, (aiōnios )
१७तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व गोष्टीत तुम्हास स्थिर करो.