< 2 Tarihler 26 >
1 Yahuda halkı Amatsya'nın yerine on altı yaşındaki oğlu Uzziya'yı kral yaptı.
१अमस्याचा पुत्र उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी अमस्याच्या गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता.
2 Babası Amatsya ölüp atalarına kavuştuktan sonra Uzziya Eylat Kenti'ni onarıp Yahuda topraklarına kattı.
२उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना.
3 Uzziya on altı yaşında kral oldu ve Yeruşalim'de elli iki yıl krallık yaptı. Annesi Yeruşalimli Yekolya'ydı.
३उज्जीया सोळा वर्षांचा असताना राजा झाला पुढे त्याने यरूशलेमेवर बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या ती यरूशलेमची होती.
4 Babası Amatsya gibi, Uzziya da RAB'bin gözünde doğru olanı yaptı.
४उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले पिता अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले.
5 Kendisine Tanrı korkusunu öğreten Zekeriya'nın günlerinde Tanrı'ya yöneldi. RAB'be yöneldiği sürece Tanrı onu başarılı kıldı.
५जखऱ्याच्या हयातीत उज्जीयाने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वरास मानणे त्यास जखऱ्याने शिकवले, उज्जीया असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने उज्जीयाचे कल्याण केले.
6 Uzziya Filistliler'e savaş açtı. Gat, Yavne ve Aşdot'un surlarını yıktırdı. Sonra Aşdot yakınlarında ve Filist bölgesinde kentler kurdu.
६उज्जीयाने पलिष्ट्यांबरोबर युध्द केले. गथ, यब्ने व अश्दोदचे कोट पाडून टाकले अश्दोद जवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जीयाने नगरे वसवली.
7 Filistliler'e, Gur-Baal'da yaşayan Araplar'a ve Meunlular'a karşı Tanrı ona yardım etti.
७पलिष्टे, गुरबालमधले अरब आणि मऊनी यांच्याशी झालेल्या लढायांमध्ये परमेश्वराने उज्जीयाला साहाय्य केले.
8 Ammonlular Uzziya'ya haraç vermeye başladılar. Gitgide güçlenen Uzziya'nın ünü Mısır sınırına dek ulaştı.
८अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. उज्जीयाचे सामर्थ्य इतके वाढले की त्याची कीर्ती मिसरच्या सीमेपर्यंत पोहोचली.
9 Uzziya Yeruşalim'de Köşe Kapısı, Dere Kapısı ve surun köşesi üzerinde kuleler kurup bunları sağlamlaştırdı.
९यरूशलेमामध्ये कोपऱ्यातली वेस, खोऱ्याची वेस आणि कोट वळसा घेतो तेथे उज्जीयाने बुरुज बांधून तटबंदीला बळकटी आणली.
10 Şefela'da ve ovada çok sayıda hayvanı olduğundan, kırda gözetleme kuleleri yaptırarak birçok sarnıç açtırdı. Dağlık bölgelerde, verimli topraklarda da ırgatları, bağcıları vardı; çünkü toprağı severdi.
१०वाळवंटातही त्याने टेहळणी बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरीच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या देखरेखेसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जीयाला शेतीची आवड होती.
11 Uzziya'nın savaşa hazır bir ordusu vardı. Kralın komutanlarından Hananya'nın denetiminde Yazman Yeiel'le görevli Maaseya'nın yaptığı sayımın sonuçlarına göre, bu ordu bölük bölük savaşa girerdi.
११उज्जीयाच्या सैन्यात चांगले लढवय्ये होते. ईयेल हा चिटणीस आणि मासेया हा कारभारी हे दोघे त्यांची गटागटात विभागणी करत. हनन्या या एका सेनानायकच्या हाताखाली हे दोघेजण होते. ईयेल आणि मासेया यांनी केलेल्या गणतीप्रमाणे सैन्य टोळी टोळीने लढाईवर जाई.
12 Yiğit savaşçıları yöneten boy başlarının sayısı 2 600'dü.
१२सैन्यात एकंदर दोन हजार सहाशे प्रमुख लढवय्ये नेतृत्व करीत.
13 Bunların komutası altında krala yardım etmek için düşmanla yiğitçe savaşacak 307 500 askerden oluşan bir ordu vardı.
१३शत्रूवर तुटून पडणाऱ्या तीन लाख सात हजार पाचशे वीरांच्या सैन्याचे ते प्रमुख होते. राजाच्या बाजूने ते शत्रूवर चालून जात.
14 Uzziya bütün ordu için kalkan, mızrak, miğfer, zırh, yay, sapan taşı sağladı.
१४या सर्व सेनेला उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली.
15 Yeruşalim'de becerikli adamlarca tasarlanmış gereçler yaptırdı. Okları, büyük taşları fırlatmak için bu gereçleri kulelere ve köşelere yerleştirdi. Uzziya'nın ünü uzaklara kadar yayıldı; çünkü gördüğü olağanüstü yardım sayesinde büyük güce kavuşmuştu.
१५काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरूशलेमामध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोपऱ्यावर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जीया फार प्रसिध्द झाला. उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला.
16 Ne var ki, güçlenince kendisini yıkıma sürükleyecek bir gurura kapıldı. Tanrısı RAB'be ihanet etti. Buhur sunağı üzerinde buhur yakmak için RAB'bin Tapınağı'na girdi.
१६पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
17 Kâhin Azarya ile RAB'bin yürekli seksen kâhini de ardısıra tapınağa girdiler.
१७तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी परमेश्वराचे ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले.
18 Kral Uzziya'ya karşı durarak, “Ey Uzziya, RAB'be buhur yakmaya hakkın yok!” dediler, “Ancak Harun soyundan kutsanmış kâhinler buhur yakabilir. Tapınaktan çık! Çünkü sen RAB'be ihanet ettin; RAB Tanrı da seni onurlandırmayacak!”
१८त्यांनी उज्जीयाची चूक दाखवून दिली. ते त्यास म्हणाले, “उज्जीया, परमेश्वरास धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. तू ते करु नकोस. अहरोनाचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”
19 Buhur yakmak için elinde buhurdan tutan Uzziya kâhinlere öfkelendi. Öfkelenir öfkelenmez de kâhinlerin önünde, RAB'bin Tapınağı'ndaki buhur sunağının yanında duran Uzziya'nın alnında deri hastalığı belirdi.
१९पण उज्जीयाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूपपात्र होते. याजकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले.
20 Başkâhin Azarya ile öbür kâhinler ona bakınca alnında deri hastalığı belirdiğini gördüler. Onu çabucak oradan çıkardılar. Uzziya da çıkmaya istekliydi, çünkü RAB onu cezalandırmıştı.
२०मुख्य याजक अजऱ्या आणि इतर याजक उज्जीयाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरचे कोड त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी उज्जीयाला तातडीने मंदिराबाहेर घालवले. परमेश्वराने शासन केल्यामुळे उज्जीयाही लगेचच चालता झाला.
21 Kral Uzziya ölünceye kadar deri hastalığından kurtulamadı. Bu yüzden ayrı bir evde yaşadı ve RAB'bin Tapınağı'na sokulmadı. Sarayı ve ülke halkını oğlu Yotam yönetti.
२१राजा उज्जीया कुष्ठरोगी झाला. परमेश्वराच्या मंदिरात त्यास मज्जाव होता. तो एका स्वतंत्र घरात राहू लागला. त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी बनला आणि लोकांचे शासन करु लागला.
22 Uzziya'nın yaptığı öbür işleri, başından sonuna dek, Amots oğlu Peygamber Yeşaya yazmıştır.
२२उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याने अथपासून इथपर्यंत लिहिलेली आहेत.
23 Uzziya ölüp atalarına kavuşunca, deri hastalığına yakalandığı için onu atalarının yanına, kral mezarlığının ayrı bir yerine gömdüler. Yerine oğlu Yotam kral oldu.
२३उज्जीया मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांजवळ त्याचे दफन झाले. राजासाठी असलेल्या दफनभूमीच्या शेजारच्या जागेत त्यास पुरले. कारण तो कुष्ठरोगी होता. उज्जीयाच्या नंतर त्याचा पुत्र योथाम राजा झाला.