< Psaltaren 96 >
1 Sjungen till HERRENS ära en ny sång, sjungen till HERRENS ära, alla länder.
१अहो, परमेश्वरास नवीन गीत गा; हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
2 Sjungen till HERRENS ära, loven hans namn. Båden glädje var dag, förkunnen hans frälsning.
२परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.
3 Förtäljen bland hedningarna hans ära, bland alla folk hans under.
३राष्ट्रात त्याचे गौरव, त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.
4 Ty stor är HERREN och högt lovad, fruktansvärd är han mer än alla gudar.
४कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.
5 Ty folkens alla gudar äro avgudar, men HERREN är den som har gjort himmelen.
५कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला.
6 Majestät och härlighet äro inför hans ansikte, makt och glans i hans helgedom.
६वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत. सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.
7 Given åt HERREN, I folkens släkter, given åt HERREN ära och makt;
७अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा.
8 given åt HERREN hans namns ära, bären fram skänker, och kommen i hans gårdar.
८परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.
9 Tillbedjen HERREN i helig skrud, bäven för hans ansikte, alla länder.
९पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
10 Sägen bland hedningarna: "HERREN är nu konung! Därför står jordkretsen fast och vacklar icke; han dömer folken med rättvisa."
१०राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो. जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.
11 Himmelen vare glad, och jorden fröjde sig; havet bruse och allt vad däri är.
११आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत.
12 Marken glädje sig och allt som är därpå, ja, då juble alla skogens träd.
१२शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत. मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील.
13 inför HERREN, ty han kommer, ty han kommer för att döma jorden. Han skall döma jordens krets med rättfärdighet och folken med sin trofasthet.
१३सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील.