< Josua 4 >

1 Och Herren sade till Josua:
सर्व लोक यार्देन पार करून गेले, तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
2 Tager eder tolf män, utaf hvart slägtet en;
प्रत्येक वंशातून एक असे बारा पुरुष तू लोकांमधून निवड,
3 Och bjuder dem, och säger: Lyfter upp utur Jordan tolf stenar, af det rummet der Presternas fötter stilla stå, och hafver dem öfver med eder, att I lefven dem i lägrena, der I eder i denna nattene lägren.
आणि त्यांना अशी आज्ञा देऊन सांग, “यार्देनेच्या मध्यभागी ज्या कोरड्या जमिनीवर याजक उभे होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या ठिकाणी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.”
4 Då kallade Josua tolf män, som tillskickade voro af Israels barn, utaf hvart slägte en;
मग यहोशवाने इस्राएलच्या प्रत्येक वंशातून एक असे जे बारा पुरुष निवडले होते त्यांना बोलावले.
5 Och sade till dem: Går fram för Herrans edars Guds ark midt i Jordan, och hvar lyfte en sten på sina axlar, efter talet af Israels barnas slägter;
यहोशवा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या कराराच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल वंशाच्या संख्येप्रमाणे एकएक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या.
6 Att de skola vara ett tecken ibland eder, när edor barn i framtiden fråga sina fäder, och säga: Hvad göra desse stenarna här?
म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, पुढच्या येणाऱ्या दिवसात जेव्हा तुमची मुले तुम्हाला विचारतील की, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’
7 Att I då mågen säga dem, huru Jordans vatten sig åtskiljde för Herrans förbunds ark, då han gick genom Jordan; så att desse stenarna skola vara Israels barnom till en evig åminnelse.
तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभागले गेले; कराराचा कोश यार्देन पार करून जात असताना यार्देनेचे पाणी दुतर्फा दुभागले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी सर्वकाळ स्मारक होतील.”
8 Då gjorde Israels barn såsom Josua böd dem; och båro tolf stenar midt utur Jordan, såsom Herren hade sagt Josua, efter talet af Israels barnas slägte; och båro dem med sig till det rummet, der de lägrade sig, och der lade de dem.
यहोशवाच्या या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून बारा धोंडे उचलून इस्राएल लोकांच्या वंशसंख्येप्रमाणे रचले. त्यांनी ते घेऊन त्या रात्री जिथे मुक्काम केला तिथे नेऊन ठेवले.
9 Och Josua reste upp tolf stenar midt i Jordan, der Presternas fötter ståndit hade, som förbundsens ark båro, och de äro der ännu intill denna dag.
तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा दगड उभे केले; आणि ते आजपर्यंत स्मारक म्हणून तेथे आहेत.
10 Ty Presterna, som arken båro, stodo midt i Jordan, tilldess allt bestäldt vardt, som Herren böd Josua säga folkena, och Mose Josua budit hade; och folket skyndade sig, och gick öfver.
१०मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांस सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक घाईघाईने पार उतरून गेले.
11 Då nu folket allt öfvergånget var, så gick ock Herrans ark öfver, och Presterna för folket.
११झाडून सर्व लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कराराचा कोश आणि याजक पलीकडे गेले.
12 Och de Rubeniter, och de Gaditer, och den halfva Manasse slägt, gingo väpnade för Israels barnom, såsom Mose dem sagt hade;
१२रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्राएल लोकांपुढे गेले,
13 Vid fyratiotusend väpnade till härs gingo för Herranom till strids på Jericho mark.
१३युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहोजवळच्या मैदानात पोहचले.
14 På den dagen gjorde Herren Josua stor för hela Israel; och de fruktade honom, såsom de fruktade Mose, medan han lefde.
१४त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली. जसे ते मोशेचे भय धरीत होते तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्यांच्या सगळ्या हयातीत धरले.
15 Och Herren sade till Josua:
१५तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
16 Bjud Presterna, som bära vittnesbördsens ark, att de träda upp utur Jordan.
१६“कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर.”
17 Alltså böd Josua Prestomen, och sade: Stiger upp utur Jordan.
१७त्याप्रमाणे, यहोशवाने याजकांना यार्देनेतून बाहेर येण्याची आज्ञा केली.
18 Och då Presterna, som Herrans förbunds ark båro, stego upp utur Jordan, och trädde med deras fotbjelle på torra landet, kom Jordans vatten återigen i sin stad, och flöt såsom tillförene till alla sina brädder.
१८मग परमेश्वराचा कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्य भागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि चार दिवसांपूर्वी जसे होते त्याप्रमाणे पुन्हा दुथडी भरून वाहू लागले.
19 Och det var den tionde dagen i den första månadenom, då folket uppsteg utur Jordan, och lägrade sig i Gilgal, östan för Jericho.
१९पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे तळ दिला.
20 Och de tolf stenar, som de utur Jordan tagit hade, reste Josua upp i Gilgal;
२०यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे रचले.
21 Och sade till Israels barn: När nu i framtiden edor barn fråga sina fäder, och säga: Hvad skola desse stenarna?
२१तो इस्राएल लोकांस म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपल्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’
22 Så skolen I undervisa dem, och säga: Israel gick torr igenom Jordan,
२२तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल लोक ह्या यार्देनेच्या कोरड्या भूमीतून पार गेले.
23 Då Herren edar Gud förtorkade Jordans vatten för eder, så länge I gingen deröfver, lika som Herren edar Gud gjorde i röda hafvet, hvilket han torrt gjorde för oss, så att vi ginge derigenom;
२३आम्ही तांबडा समुद्र पार करेपर्यंत, तुमचा देव परमेश्वर याने जसे तांबड्या समुद्राचे पाणी आटवून कोरडे केले, तसेच परमेश्वर तुमचा देव ह्याने यार्देनेचे पाणी आम्ही तिच्यातून चालत पार आलो तोपर्यंत आमच्यापुढून हटवले.
24 På det all folk på jordene skola känna Herrans hand, huru mägtig hon är; och att I skolen frukta Herran edar Gud alltid.
२४ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व लोक जाणतील आणि तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे निरंतर भय बाळगाल.”

< Josua 4 >