< Esra 8 >
1 Desse äro hufvuden för deras fäder, som räknade vordo, och med mig uppdrogo ifrå Babel, i den tiden, då Konung Arthahsasta regerade.
१आणि बाबेलहून माझ्याबरोबर अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीत पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख त्यांची नावे ही आहेत.
2 Af Pinehas barn: Gersom. Af Ithamars barn: Daniel. Af Davids barn: Hattus.
२फिनहासाच्या वंशातला गर्षोम, इथामारच्या वंशातला दानीएल, दावीदाच्या वंशातला हट्टूश,
3 Af Sechania barn, Paros barn: Zacharia, och med honom räknade hundrade och femtio män.
३शखन्याच्या वंशातील परोशाच्या वंशातला जखऱ्या, आणि त्याच्याबरोबर पुरुषातले एकशे पन्नास.
4 Af PahathMoabs barn: Eljoenai, Seraja son, och med honom tuhundrad män.
४पहथ-मवाबाच्या वंशातला जरह्या याचा मुलगा एल्यहोवेनय आणि त्याच्याबरोबरचे दोनशे पुरुष,
5 Af Sechania barn: Jahasiels son, och med honom trehundrad män.
५शखन्याच्या वंशतला यहजोएलचा मुलगा आणि त्याच्याबरोबर तीनशे पुरुष,
6 Af Adins barn: Ebed, Jonathans son, och med honom femtio män.
६आदीनच्या वंशतला योनाथानाचा मुलगा एबद आणि त्याच्याबरोबचे पन्नास पुरुष,
7 Af Elams barn: Jesaia, Athalia son, och med honom sjutio män.
७एलामाच्या वंशातला अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्याबरोबरचे सत्तर पुरुष.
8 Af Sephatja barn: Sebadja, Michaels son, och med honom åttatio män.
८शफाट्याच्या वंशातला मीखाएलचा मुलगा जबद्या आणि त्याच्याबरोबरचे ऐंशी पुरुष,
9 Af Joabs barn: Obadja, Jehiels son, och med honom tuhundrad och aderton män.
९यवाबाच्या वंशातील यहीएलचा मुलगा ओबद्या आणि त्याच्याबरोबर दोनशे अठरा पुरुष,
10 Af Selomiths barn: Josiphia son, och med honom hundrade och sextio män.
१०बानीच्या वंशातला योसिफ्याचा मुलगा शलोमिथ आणि त्याच्याबरोबरचे एकशे साठ पुरुष,
11 Af Bebai barn: Zacharia, Bebai son, och med honom åtta och tjugu män.
११बेबाईच्या वंशातील बेबाईचा मुलगा जखऱ्या आणि त्याच्याबरोबरचे अठ्ठावीस पुरुष.
12 Af Asgads barn: Johanan, Katans son, och med honom hundrade och tio män.
१२अजगादच्या वंशातला हक्काटानाचा मुलगा योहानान आणि त्याच्याबरोबरचे एकशेदहा पुरुष,
13 Af de sista Adonikams barn; och heto alltså: Eliphelet, Jehiel och Semaja, och med dem sextio män.
१३अदोनीकामच्या वंशातले शेवटचे म्हणजे अलीफलेट, येऊएल, शमाया आणि त्यांच्याबरोबरचे साठ पुरुष,
14 Af Bigvai barn: Uthai och Sabbud, och med dem sjutio män.
१४आणि बिग्वईच्या वंशातले उथई, जब्बूद त्यांच्याबरोबरचे सत्तर पुरुष.
15 Och jag församlade dem till älfvena, som kommer till Ahava; och blefvom der i tre dagar. Och då jag gaf akt uppå folket och Presterna, fann jag der inga Leviter.
१५मी त्यांना अहवाकडे वाहणाऱ्या कालव्याजवळ जमवले. त्याठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मी लोकांची व याजकांची तपासणी केली पण तेथे लेवीचे कोणीही वंशज सापडले नाहीत.
16 Då sände jag till Elieser, Ariel, Semaja, Elnathan, Jarib, Elnathan, Nathan, Zacharia och Mesullam, öfverstar; och Jojarib och Elnathan, lärare;
१६तेव्हा, अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखऱ्या, आणि मशुल्लाम या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान या शिक्षकांना मी निरोप पाठवून बोलवून आणले.
17 Och sände dem ut till Iddo öfverstan, till Casiphja, att de skulle hemta oss tjenare uti vår Guds hus. Och jag gaf dem in hvad de tala skulle med Iddo och hans bröder, de Nethinim i Casiphja.
१७कासिफ्याचा मुख्य इद्दो याच्याकडे मी त्यांना पाठवले. त्यास आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी त्यांना सांगितले. जे मंदिरात सेवाचाकरी करणारे कासिफ्यात राहत होते त्यांनी देवाच्या घरात सेवाचाकरी करण्यासाठी आमच्याकडे माणसे पाठवावीत.
18 Och de hade till oss, efter Guds goda hand öfver oss, en klok man utaf Maheli barn, Levi sons, Israels sons, Serebia, med hans söner och bröder, aderton;
१८देवाचा आमच्यावर चांगला हाथ असल्यामुळे इद्दोच्या नातलगांनी आमच्याकडे इस्राएलाचा मुलगा लेवी याचा मुलगा महली याच्या वंशातला एक शहाणा मनुष्य आणला, आणि शेरेब्याचे पुत्र आणि त्याचे भाऊ असे एकंदर अठराजण आले.
19 Och Hasabia, och med honom Jesaia af Merari barn, med hans bröder och deras söner, tjugu;
१९मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व त्यांचे मुले असे एकंदर वीस जण आणले.
20 Och af de Nethinim, hvilka David och Förstarna gåfvo till att tjena Leviterna, tuhundrad och tjugu, alle nämnde vid namn.
२०शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवा चाकरीसाठी दोनशे वीस जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दावीदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवीचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिलेली होती.
21 Och jag lät der vid älfvena, vid Ahava, utropa ena fasto, att vi skulle ödmjuka oss för vårom Gud, till att söka af honom en rättan väg för oss, och vår barn, och alla våra håfvor.
२१तिथे अहवा कालव्याजवळ मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलेबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा.
22 Ty jag skämdes bedas ledsagare och resenärar af Konungenom, att de skulle hjelpa oss för fienderna på vägenom; förty vi hade sagt Konungenom: Vår Guds hand är till det bästa öfver alla de honom söka; och hans starkhet och vrede öfver alla dem, som honom öfvergifva.
२२प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाकडे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. कारण आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.”
23 Alltså fastade vi, och sökte detta af vårom Gud, och han hörde oss.
२३म्हणून आम्ही उपवास आणि देवाची प्रार्थना केली. देवाने आमचा धावा ऐकला.
24 Och jag afskiljde tolf af de öfversta Presterna, Serebia och Hasabia, och med dem tio deras bröder;
२४तेव्हा मी याजकांमध्ये जे प्रमुख होते अशा बारा जणांची निवड केली. मी शेरेब्या, हशब्या आणि त्यांचे आणखी दहा भाऊ यांची निवड केली.
25 Och vog dem till silfver, och guld, och tyg till häfoffer i vår Guds hus, hvilka Konungen, och hans rådherrar, och Förstar, och hele Israel, som för handene var, till häfoffer gifvit hade;
२५मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर वस्तू देवाच्या घरासाठी जे अर्पण राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि इस्राएल लोकांनी स्वखुशीने अर्पिले होते ते तोलून दिले.
26 Och vog dem till i deras hand sexhundrad och femtio centener silfver, och i silfvertyg hundrade centener, och i guld hundrade centener;
२६मी त्यांच्याकडे सहाशे किक्कार चांदी, शंभर किक्कार चांदीची तबके, शंभर किक्कार सोने.
27 Tjugu gyldene skålar, de höllo tusende gylden, och tu god kostelig kopparkäril, klar såsom guld;
२७शिवाय एक हजार दारिकांचे सोन्याच्या वीस वाट्या व चांगली चकचकीत पितळेची सोन्याएवढी मोलवान दोन पात्रे ही तोलून दिली.
28 Och sade till dem: I ären helige Herranom; så äro ock kärilen helig; dertill det frigifna silfver och guld Herranom edra fäders Gud.
२८मग मी त्यांना म्हणालो, “तुम्ही तसेच या वस्तू देखील परमेश्वर देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने व चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी स्वखुशीचे अर्पण आहे.
29 Så vaker, och bevarer det, tilldess I vägen det inför öfversta Presterna, och Leviterna, och öfversta fäderna i Israel i Jerusalem, uti Herrans hus kistor.
२९या गोष्टी यरूशलेममधील परमेश्वराच्या मंदिराच्या प्रमुखांच्या हवाली करेपर्यंत त्यांची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुम्ही या वस्तू मुख्य लेवी आणि इस्राएलाच्या वडिलांच्या घराण्यांच्या हाती सोपवा. त्यांचे वजन करून त्या गोष्टी यरूशलेमेमधील मंदिराच्या खोल्यांमध्ये ठेवतील.”
30 Då togo Presterna och Leviterna det vägna silfret, och guldet, och kärilen, att de skulle föra det till Jerusalem, till vår Guds hus.
३०यावर, एज्राने वजन करून दिलेल्या खास भेटवस्तू आणि सोने व चांदी याजकांनी व लेवींनी ताब्यात घेतल्या. यरूशलेमेमधील देवाच्या घरात त्यांना घेऊन जाण्यास सांगण्यात आले.
31 Alltså fore vi ifrån älfvene Ahava, på tolfte dagen i första månadenom, att vi skulle draga till Jerusalem; och vår Guds hand var öfver oss, och bevarade oss ifrå fiendernas hand och försåt på vägenom.
३१पहिल्या महिन्याच्या बाराव्या दिवशी आम्ही अहवा कालव्यापासून यरूशलेमेला जायला निघालो. देवाची आमच्यावर कृपा असल्यामुळे त्याने वैरी आणि वाटमारे यांच्यापासून आमचे संरक्षण केले.
32 Och vi komme till Jerusalem, och blefvom der i tre dagar.
३२आम्ही यरूशलेमेला पोहचलो. तेथे तीन दिवस विश्रांती घेतली.
33 På fjerde dagenom vardt väget silfret och guldet, och kärilen uti vår Guds hus, under Meremoths hand, Uria sons Prestens, och med honom var Eleazar, Pinehas son; och med dem Josabath, Jesua son, och Noadja, Binnui son, de Leviter;
३३चौथ्या दिवशी देवाच्या मंदिरात ते सोने, चांदी व इतर वस्तू वजन करून उरीया याजकाचा मुलगा मरेमोथ यांच्याकडे देण्यात आल्या. तेव्हा फिनहासचा मुलगा एलाजार तसेच येशूवाचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा नोअद्या हे लेवी, एवढे जण मरेमोथ बरोबर होते.
34 Efter hvars tal och vigt; och vigten vardt på den tiden all beskrifven.
३४आम्ही प्रत्येक गोष्टीची मोजणी, वजन केले आणि एकंदर वजनाची नोंद केली.
35 Och fängelsens barn, som utu fängelset komne voro, offrade bränneoffer Israels Gudi, tolf stutar för hela Israel, sex och niotio vädrar, sju och sjutio lamb, tolf bockar till syndoffer; alltsammans till bränneoffer Herranom.
३५त्यानंतर बंदिवासातून परत आलेल्या यहूद्यांनी इस्राएलाच्या देवाला होमार्पणे वाहिली. सर्व इस्राएलाकरीता बारा बैल, शहाण्णव मेंढे, सत्याहत्तर नर कोकरे, पापार्पणासाठी बारा बोकड एवढे सगळे त्यांनी परमेश्वरास होमार्पण केले.
36 Och de antvardade Konungens befallning Konungens ämbetsmän och landshöfdingom på denne sidon älfven; och de upphöjde folket, och Guds hus.
३६मग या लोकांनी राजाने दिलेला आदेश राजाच्या अधिकाऱ्यांना तसेच नदीच्या अलीकडे भागावरच्या अधिकाऱ्यांना दिले. तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांनी इस्राएल लोकांस आणि देवाच्या घराला सहाय्य केले.