< 2 Mosebok 8 >
1 Herren sade till Mose: Gack in till Pharao, och säg till honom: Detta säger Herren: Släpp mitt folk, att de måga tjena mig.
१मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “जा आणि फारोला सांग, परमेश्वर असे म्हणतो की, ‘माझ्या लोकांस माझी उपासना करण्याकरता जाऊ दे.
2 Hvar du icke vill, si, så vill jag plåga alla dina landsändar med paddor;
२जर तू त्यांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझा सारा देश बेडकांनी पीडीन.
3 Så att älfven skall uppvälla paddor; de skola uppstiga, och komma in i din hus, in i din kammar, in i ditt lägre, in i din säng, och in i dina tjenares hus, ibland ditt folk, in uti dina bakugnar, och uti din deg.
३नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत, अंथरुणात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत येतील.
4 Och paddor skola stiga uppå dig, och uppå ditt folk, och uppå alla dina tjenare.
४तुझ्या, तुझ्या सेवकांच्या व लोकांच्या अंगावर बेडूक चढतील.”
5 Och Herren sade till Mose: Säg till Aaron: Räck ut dina hand med din staf öfver älfver, och strömmar, och sjöar, och låt paddor komma öfver Egypti land.
५मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्या जलावर लांब कर म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.”
6 Och Aaron räckte sina hand öfver vattnen i Egypten; och paddor kommo derut, så att Egypti land vardt öfvertäckt.
६मग अहरोनाने आपला हात मिसराच्या जलाशयावर लांब केला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला.
7 Då gjorde ock trollkarlarne sammalunda med deras besvärjningar; och läto komma paddor öfver Egypti land.
७तेव्हा जादूगारांनी मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले आणि मिसर देशावर आणखी बेडूक आणले.
8 Då kallade Pharao Mose och Aaron, och sade: Beder Herren för mig, att han tager paddorna ifrå mig, och ifrå mitt folk; så vill jag släppa folket, att de måga offra Herranom.
८मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वरास विनंती करा. मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांस जाऊ देईन.”
9 Mose sade: Haf du den ärona, och lägg mig före, när jag skall bedja för dig, för dina tjenare, och för ditt folk; att paddorna skola fördrefna varda ifrå dig, och ifrå ditt hus, och allenast blifva i älfvene.
९मोशे फारोला म्हणाला, “मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील आणि फक्त नदीत राहतील. मी तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी कोणत्या वेळी प्रार्थना करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो.”
10 Han sade: I morgon. Han sade: Såsom du sagt hafver, på det du skall förnimma, att ingen är såsom Herren vår Gud;
१०फारोने उत्तर दिले, “उद्या.” तेव्हा मोशे म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल अशा प्रकारे तुम्हास समजेल की आमच्या परमेश्वरासारखा कोणीच देव नाही.
11 Så skola paddorna varda tagna ifrå dig, ifrå ditt hus, ifrå dina tjenare, ifrå ditt folk, och allena blifva i älfvene.
११बेडूक तुम्हापासून, तुमच्या घरातून, तुमचे सेवक व तुमचे लोक यांच्यापासून निघून जातील; ते फक्त नदीत राहतील.”
12 Så gingo Mose och Aaron ifrå Pharao. Och Mose ropade till Herran för paddornas skull, såsom han Pharao tillsagt hade.
१२मग मोशे व अहरोन फारोपासून निघून गेले आणि फारोवर बेडूक आणले होते त्याविषयी मोशेने परमेश्वरास प्रार्थना केली.
13 Och Herren gjorde, som Mose sagt hade. Och paddorna blefvo döda i husen, i gårdarna, och på markene.
१३मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात, अंगणात व शेतात होते ते सर्व बेडूक मरून गेले.
14 Och de kastade dem tillsamman, här en hop, och der en hop, och marken luktade derutaf.
१४लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले आणि त्यामुळे सर्व देशात घाण वास येऊ लागला.
15 Då Pharao såg, att han hade fått rolighet, vardt hans hjerta förhärdadt, och hörde dem intet, såsom Herren sagt hade.
१५बेडकांची पीडा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने त्यांचे ऐकले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
16 Och Herren sade till Mose: Säg till Aaron: Räck ut din staf, och slå i stoftet på jordene, att löss varda i hela Egypti lande.
१६मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.”
17 De gjorde ock så. Och Aaron räckte ut sina hand med sin staf, och slog i stoftet uppå jordene, och der vordo löss på menniskom, och på boskapen. Allt stoft på markene vardt löss i hela Egypti lande.
१७त्याने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगळ्या मिसर देशात धुळीच्या उवाच उवा बनल्या; त्या पशूंवर व मनुष्यांवर चढल्या.
18 Trollkarlarne gjorde ock sammalunda med deras besvärjningar, att de skulle göra löss, men de kunde icke. Och lössen voro på menniskom, och på boskapen.
१८जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर उवा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना धुळीतून उवा बनविता आल्या नाहीत; पशू व मनुष्य उवांनी भरून गेले.
19 Då sade trollkarlarne till Pharao: Detta är Guds finger. Men Pharaos hjerta vardt förstockadt, och han hörde dem intet, såsom Herren sagt hade.
१९तेव्हा जादूगारांनी फारोला सांगितले की, “यामध्ये देवाचा हात आहे.” परंतु फारोने मन कठीण केले व त्यांने त्यांचे ऐकायचे नाकारले. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच तसे झाले.
20 Och Herren sade till Mose: Statt upp bittida om morgonen, och gack för Pharao. Si, han varder utgångandes till vattnet, och säg till honom: Detta säger Herren: Släpp mitt folk, att de måga tjena mig.
२०मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्यापुढे उभा राहा. त्यास असे सांग की परमेश्वर म्हणतो, माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांस जाऊ दे.
21 Hvar icke, si, så vill jag låta komma allehanda ohyra öfver dig, dina tjenare, ditt folk, och ditt hus, så att all de Egyptiers hus, och marken, och hvad deruppå är, skola varda full af ohyro.
२१जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील.
22 Och vill jag på den dagen göra ett besynnerligit med den landsändan Gosen, der mitt folk uti är, att der skall ingen ohyra komma, på det du skall förnimma, att jag är Herren öfver hela jordena;
२२तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात, तो मी त्या दिवशी वेगळा करीन, तेथे गोमाश्यांचे थवे जाणार नाहीत. यावरुन पृथ्वीवर मीच परमेश्वर आहे हे तुला समजेल.
23 Och vill en förlösning sätta emellan mitt folk och ditt. I morgon skall det tecknet ske.
२३तेव्हा उद्या माझ्या लोकांशी वागताना आणि तुमच्या लोकांशी वागताना मी भेद करीन. उद्या हा चमत्कार होईल.”
24 Och Herren gjorde så. Och der kom mycken ohyra uti Pharaos hus, i hans tjenares hus, och öfver hela Egypti land, och landet vardt förderfvadt af den ohyrone.
२४अशा रीतीने परमेश्वराने केले. मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. ते फारोच्या घरात व त्याच्या सेवकांच्या घरात व सगळ्या मिसर देशात गोमाशाचे थवेच्या थवे आले. गोमाश्यांच्या या थव्यांनी मिसर देशाची नासाडी केली.
25 Då kallade Pharao Mose och Aaron, och sade: Går åstad, och offrer edrom Gud här i landena.
२५म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.”
26 Mose sade: Det betämmer sig icke, att vi så göre; förty vi offre Herranom vårom Gud de Egyptiers styggelse. Si, när vi nu de Egyptiers styggelse offrade för deras ögon, månde de icke skola stena oss?
२६परंतु मोशे म्हणाला, “तसे करणे योग्य होणार नाही, कारण आमचा देव परमेश्वर ह्याला आम्ही जो यज्ञ करणार आहो तो यज्ञ तुम्हा मिसरी लोकांच्या दृष्टीने किळसवाणा असेल, त्यामुळे आम्ही तो मिसरी लोकांसमोर केला तर ते आम्हांवर दगडफेक करायचे नाहीत काय?
27 Tre dagsresor vilje vi gå in uti öknena, och offra Herranom vårom Gud, såsom han oss sagt hafver.
२७तर आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्या. आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला सांगेल त्याप्रमाणे त्यास यज्ञ करू.”
28 Pharao sade: Jag vill släppa eder, att I må offra Herranom edrom Gud i öknene, allenast att I icke fjerran faren; och bedjen för mig.
२८तेव्हा फारो म्हणाला, “मी तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्याकरिता रानात जाऊ देण्याची परवानगी देतो. पण तुम्ही फार दूर जाऊ नका. माझ्यासाठी प्रार्थना करा.”
29 Mose sade: Si, när jag härut ifrå dig kommer, så vill jag bedja Herran, att denna ohyran må blifva borttagen ifrå Pharao, och hans tjenare, och hans folke, i morgon; allenast förhala mig icke länger, att du icke släpper folket till att offra Herranom.
२९मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि फारो व त्याचे सेवक या सर्वांपासून उद्या गोमाशांचे थवे दूर करण्याकरिता परमेश्वरास विनंती करतो. परंतु परमेश्वरासाठी यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांस तुम्ही पुन्हा फसवू नये.”
30 Och Mose gick ut ifrå Pharao, och bad Herran.
३०तेव्हा मोशे फारोपासून निघून गेला आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
31 Och Herren gjorde, såsom Mose sagt hade, och tog de ohyrona bort ifrå Pharao, ifrå hans tjenare, och ifrå hans folke, så att icke en blef qvar.
३१या प्रकारे परमेश्वराने मोशेची विनंती मान्य केली व त्याने फारो, त्याचे सेवक व त्याचे लोक यांच्यापासून सर्व गोमाशाचे थवे दूर केले. तेथे एकही गोमाशी राहिली नाही.
32 Men Pharao förhärdade sitt hjerta ännu i denna resone, och ville icke släppa folket.
३२परंतु फारोने पुन्हा आपले मन कठोर केले आणि त्याने इस्राएली लोकांस जाऊ दिले नाही.