< Predikaren 7 >

1 Ett godt rykte är bättre än god salva, och dödsens dag bättre än födelsedagen.
किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे, आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे.
2 Bättre är gå i sorgahus än i gästabådshus; uti det ena är alla menniskors ändalykt, och den lefvande lägger det uppå hjertat.
मेजवाणीच्या घरी जाण्यापेक्षा, शोक करण्याऱ्याच्या घरी जाणे उत्तम आहे, जिवंतांनी हे मनात बिंबवून ठेवावे. म्हणून जिवंत हे मनात ठसवून राहील.
3 Sörja är bättre än le; ty genom sorg varder hjertat förbättradt.
हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे. कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो.
4 De visas hjerta är i sorgahuset, och dårars hjerta i glädjehuset.
शहाण्याचे मन शोक करणाऱ्याच्या घरात असते, पण मूर्खाचे मन मेजवाणीच्या घरात असते.
5 Bättre är höra dens visas straff, än att höra dårars sång.
मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेध वाणी ऐकणे उत्तम आहे.
6 Ty dårars löje är såsom sprakande af törne under grytone; och det är ock fåfängelighet.
भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे मूर्खाचे हसणे आहे. हे सुद्धा व्यर्थच आहे.
7 En genvördig gör en visan oviljog, och förderfvar ett mildt hjerta.
पिळवणूक खात्रीने शहाण्या मनुष्यास मूर्ख करते आणि लाच मन भ्रष्ट करते.
8 Änden på ett ting är bättre än dess begynnelse; en tålig ande är bättre än en hög ande.
एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट उत्तम आहे. आणि आत्म्यात गर्विष्ठ असलेल्या लोकांपेक्षा आत्म्यात सहनशील असलेला उत्तम आहे.
9 Var icke hastig till vrede; ty vreden hvilar uti ens dåras hjerta.
तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको. कारण राग हा मूर्खाच्या हृदयात वसतो.
10 Säg icke: Hvad är det, att de förra dagar voro bättre än denne? Ty du frågar sådant icke visliga.
१०या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको. कारण याविषयी तू शहाणपणाने हा प्रश्न विचारत नाही.
11 Vishet är god mild arfvedelen, och hjelper, att en kan glädja sig af solene.
११आमच्या पूर्वजापासून आम्हास वतनाबरोबर मिळालेल्या मौल्यवान वस्तूपेक्षा शहाणपण असल्यास अति उत्तम आहे. ज्या कोणाला सूर्य दिसतो त्यांचा फायदा होतो.
12 Ty vishet beskärmar; penningar beskärma ock; men visheten gifver lif honom, som henne hafver.
१२कारण जसा पैसा रक्षणाची तरतूद करतो तसेच ज्ञानपण रक्षणाची तरतूद करू शकते. परंतु जो कोणी शहाणपणाने ज्ञान मिळवतो त्याचा फायदा हा आहे की, ते जीवन वाचविते.
13 Se på Guds verk; ty ho kan rätta det han gör krokot?
१३देवाच्या कृत्यांचा विचार कराः जे काही त्याने वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल?
14 I goda dagar var glad, och den onda dagen tag ock till godo; ty denna skapade Gud jemte den andra, att menniskan icke skall veta hvad tillkommande är.
१४जेव्हा समय चांगला असतो, तेव्हा त्या समयात आनंदाने राहा. परंतु जेव्हा समय वाईट असतो, तेव्हा हे समजाः देवाने एकाच्या बरोबर तसेच त्याच्या बाजूला दुसरेही करून ठेवले आहे. या कारणामुळे भविष्यात त्यानंतर काय घडणार आहे ते कोणालाही कळू नये.
15 Jag hafver allahanda sett i mine fåfängelighets tid: Det är en rättfärdig, och förgås i sine rättfärdighet; och det är en ogudaktig, som länge lefver i sine ondsko.
१५मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत. तेथे नीतिमान लोक जे त्यांच्या नीतीने वागत असताना देखील नष्ट होतात, आणि तेथे वाईट लोक वाईटाने वागत असतानाही खूप वर्षे जगतात.
16 Var icke allt för mycket rättfärdig, ej heller för mycket vis, att du icke förderfvar dig.
१६स्वनीतिमान होऊ नका, स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका. तू आपल्या स्वतःचा नाश का करून घेतो?
17 Var icke allt för mycket ogudaktig, och galnas icke, att du icke dör i otid.
१७दुष्टतेचा किंवा मूर्खतेचा अतिरेक करू नका, तुमची वेळ येण्या आधीच तुम्ही का मरावे?
18 Det är godt att du detta fattar, och att du ock icke släpper det andra utu dina hand; ty den der Gud fruktar, han undkommer det allt.
१८तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे, आणि नीतीपासून आपला हात मागे काढून घेऊ नकोस. जो देवाचे भय धरतो तो त्याच्या सर्व बंधनातून निभावेल.
19 Vishet stärker den visa, mer än tio väldige, som i stadenom äro.
१९एका शहरातील दहा अधिकाऱ्यांपेक्षा ज्ञान शहाण्या मनुष्यास अधिक बलवान करते,
20 Ty det är ingen menniska på jordene, som godt gör, och icke syndar.
२०जो कोण चांगले करतो आणि कधीही पाप करत नाही. असा या पृथ्वीवर एकही नीतिमान मनुष्य नाही.
21 Lägg ock icke på hjertat allt det man säger; på det du icke skall höra din tjenare banna dig.
२१बोललेले प्रत्येक शब्द ऐकू नका. कारण तुमचा नोकर कदाचित तुम्हास शाप देताना ऐकाल.
22 Ty ditt hjerta vet, att du ock ofta androm bannat hafver.
२२त्याचप्रमाणे, तुझ्या स्वतःच्या मनास तुला माहित आहे तुम्ही सुध्दा इतरांना वारंवार शाप दिले आहेत.
23 Sådant allt hafver jag försökt visliga. Jag tänkte: Jag vill vara vis; men visheten kom långt ifrå mig.
२३मी हे सर्व माझ्या ज्ञानाने सिद्ध केले. मी म्हणालो, मी ज्ञानी होईन, परंतु ते माझ्यापासून दूरच राहिले होते.
24 Det är fjerran, hvad skall det varda? Och det är fast djupt, ho kan finnat?
२४ज्ञान जे आहे ते दूर व फारच खोल आहे. ते कोण शोधू शकेल?
25 Jag vände mitt hjerta till att förfara, och uppspörja, och uppsöka vishet och konst, till att förfara de ogudaktigas dårhet, och de galnas villfarelse;
२५मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले. आणि ज्ञान आणि वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण शोधले, आणि मला हे कळाले की, दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुद्ध वेडेपणा आहे.
26 Och fann, att en sådana qvinna, hvilkens hjerta är nät och snara, och hennes händer bojor äro, är bittrare än döden. Den Gudi täck är, han undkommer henne; men syndaren varder genom henne fången.
२६मला मृत्यूपेक्षाही अधिक कडू अशी पाशरूप असलेली स्त्री सापडली, तिचे हृदय पूर्ण पाश व जाळी आहे, आणि तिचे बाहू साखळ्यांसारखे आहेत. जो कोणी देवाला प्रसन्न करतो तो तिच्यापासून निसटतो. पण पापी मात्र तिच्याकडून पकडला जातो.
27 Si, det hafver jag funnit, säger Predikaren, hvart efter det andra, att jag måtte finna konst.
२७मी काळजीपूर्वक काय शोधून काढले, उपदेशक म्हणतो, मी वास्तविकतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी एका मागून एक गोळाबेरीज शोधून एकत्र केल्या.
28 Och min själ söker ännu, och hafver intet funnit. Ibland tusende hafver jag funnit en man; men ingen qvinno hafver jag funnit ibland alla.
२८मी माझ्या मनात अजूनही त्याचा शोध करीत आहे, परंतु मला हे मात्र सापडले नाही. मला हजारात एक नीतिमान मनुष्य मिळाला. पण मला सर्व स्त्रियात एकही सापडली नाही.
29 Allena skåda härtill: Jag hafver funnit, att Gud hafver gjort menniskona rätta; men de söka många konster.
२९मला यातून सापडले की, देवाने मनुष्यास सरळ असे निर्माण केले पण तो अनेक योजनांच्या मागे गेले आहे.

< Predikaren 7 >