< Predikaren 2 >

1 Jag sade i mitt hjerta: Nu väl, jag vill lefva väl, och göra mig goda dagar; men si, det var ock fåfängelighet.
मी आपल्या मनात म्हटले, “आता ये, मी आनंदाद्वारे तुझी पारख करतो. म्हणून आनंदाचा उपभोग घे पण पाहा, हे सुद्धा केवळ तात्पुरत्या हवेच्या झुळकेसारखे आहे.”
2 Jag sade till löjet: Du äst galet; och till glädjena: Hvad gör du?
मी हास्याविषयी म्हटले, ते वेडेपण आहे. आणि आनंदाविषयी म्हटले, त्याचा काय उपयोग आहे?
3 Då tänkte Jag i mitt hjerta att hålla mitt kött ifrå vin, och hålla mitt hjerta till vishet, att jag måtte klok varda, tilldess jag måtte lära, hvad menniskomen nyttigt vore till att göra, så länge de lefva under himmelen.
जे मनुष्यास चांगले, जे त्यांनी आकाशाखाली आपल्या आयुष्याचे सर्व दिवस करावे ते मी शोधून पाहीपर्यंत माझे मन मला ज्ञानाच्या योगाने वाट दाखवीत घेऊन जात असताही, मी आपली इच्छा द्राक्षरसाने कशी पुरी करावी आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला.
4 Jag gjorde stor ting; jag byggde hus, planterade vingårdar;
नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी स्वतःसाठी घरे बांधली, आणि स्वत: साठी द्राक्षाचे मळे लावले.
5 Jag gjorde mig örtagårdar och trägårdar, och planterade deruti allehanda fruktsam trä;
मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगीचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे त्यामध्ये लावली.
6 Jag gjorde mig dammar, till att vattna skogen af de gröna trä;
झाडे लावलेल्या वनास पाणी पुरवावे म्हणून मी आपणासाठी तलाव निर्माण केले.
7 Jag hade tjenare och tjenarinnor, och tjenstefolk; jag hade större ägodelar i fä och får, än alle de som för mig voro i Jerusalem;
मी पुरुष आणि स्त्री गुलाम विकत घेतले. माझ्या महालातही गुलामांचा जन्म झाला. माझ्यापूर्वी यरूशलेमेत राज्य केलेल्या कोणाही राजाजवळ नव्हते एवढे अधिक गुरांचे आणि शेरडामेंढरांच्या कळपाचे मोठे धन मजजवळ होते.
8 Jag församlade mig ock silfver och guld, och en skatt af Konungom och landom; jag beställde mig sångare och sångerskor, och menniskors vällust, allahanda strängaspel;
मी माझ्यासाठी सोने आणि चांदी, राजे व राष्ट्रे यांच्या संपत्तीचा संग्रह केला. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री-पुरुष माझ्याजवळ होते आणि मानवजातीस आनंदीत करणारे सर्व होते जसे पुष्कळ स्त्रिया ठेवल्या.
9 Och förkofrade mig öfver alla de som för mig varit hade i Jerusalem; blef ock vishet när mig;
जे माझ्यापूर्वी यरूशलेमेत होते त्या सर्वापेक्षा अधिक धनवान व महान झालो आणि माझे ज्ञान माझ्याबरोबर कायम राहिले.
10 Och allt det min ögon önskade, lät jag dem få, och förtog mino hjerta ingen glädje, så att det gladdes af allt mitt arbete. Och det höll jag för min del af allt mitt arbete.
१०जे काही माझ्या डोळ्यांनी इच्छिले, ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी माझे मन कोणत्याही आनंदापासून आवरले नाही, कारण माझ्या सर्व कष्टांमुळे माझे मन आनंदीत होत असे; आणि माझ्या सर्व परिश्रमाचे फळ आनंद हेच होते.
11 Men då jag såg på all min verk, som min hand gjort hade, och den mödo, som jag haft hade; si, då var det allt fåfängelighet och jämmer, och intet annat under solene.
११नंतर मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे जी मी पार पाडली होती, आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पाहिले, परंतु पुन्हा सर्वकाही व्यर्थ होते आणि वायफळ प्रयत्न करणे असे होते; भूतलावर त्यामध्ये तेथे काही लाभ नाही.
12 Då vände jag mig till att se vishet ( och klokhet ), galenskap och dårskap; ty hvilken är den menniska, som det göra kan efter Konungenom, den henne gjort hafver?
१२मग मी ज्ञान, वेडेपणा व मूर्खपणा याकडे लक्ष देण्यास वळलो. कारण जो राजा आल्यानंतर त्याच्या मागून येणारा राजा काय करील? जे काही त्याने यापूर्वी केले तेच तो करणार.
13 Då såg jag, att visheten öfvergick dårskapen, såsom ljuset mörkret;
१३नंतर मला समजायला लागले जसा अंधारापेक्षा प्रकाश जितका उत्तम आहे तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान हितकारक आहे.
14 Så att den vise hafver sin ögon i hufvudet, men de dårar gå i mörkret; och märkte dock, att dem ena går som dem andra.
१४ज्ञानी मनुष्य काय करतो हे त्याचे डोळे पाहत असतात, पण मूर्ख अंधारात चालतो, असे असून सर्वांची एक सारखीच गती असते. असेही मी समजलो.
15 Då tänkte jag i mitt hjerta: Medan dem galnom går såsom mig, hvarföre hafver jag då farit efter vishet? Då tänkte jag i mitt hjerta, att sådant är ock fåfängelighet.
१५मग मी आपल्या मनात म्हणालो, मूर्खाविषयी जे काय घडते, ते माझ्याही बाबतीत घडेल, मग जर मी फार ज्ञानी झालो तरी त्याच्यात काय फरक पडेल? मी आपल्या मनात अनुमान काढले, हे सुद्धा व्यर्थच आहे.
16 Ty man tänker icke på den visa evinnerliga, såsom icke heller på den galna; och de tillkommande dagar förgäta allt; och såsom den vise dör, så ock den galne.
१६मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण सर्वकाळपर्यंत राहणार नाही. कारण पुढे येणाऱ्या दिवसात सर्वकाही अगदी विसरून जातील म्हणून शहाणा मनुष्य मूर्खासारखाच मरतो.
17 Derföre leddes mig lefva; ty det behagade mig illa allt det under solene sker, att det så allstings fåfängeligit och mödosamt är.
१७यामुळे मला जीवनाचा तिरस्कार वाटला. जे काम भूतलावर करण्यात येते त्याचे मला वाईट वाटले. सर्व गोष्टी व्यर्थ आहेत आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहेत.
18 Och mig leddes vid allt mitt arbete som jag under solene hade, att jag måste lefva det ene mennisko, som efter mig komma skulle;
१८माझे अपार कष्ट, जे मी भूतलावर केले त्याचा मी तिरस्कार करू लागलो. कारण जो मनुष्य माझ्यामागून येईल त्याच्याकडे ते सोडून मला जावे लागणार.
19 Ty ho vet, om han skall varda vis eller galen; och skall dock råda öfver allt mitt arbete, det jag hafver visliga gjort under solen. Det är ock fåfängelighet.
१९आणि तो मनुष्य शहाणा असेल की मूर्ख असेल कोणाला माहित? परंतु माझे सर्व श्रम, जे मी भूतलावर केले आहेत आणि ज्यात मी आपणास ज्ञान दाखवले आहे, त्यावर तो अधिकार चालवील. हेही व्यर्थ आहे.
20 Derföre vände jag mig, att mitt hjerta skulle aflåta af allo arbete, som jag gjorde under solene.
२०म्हणून जे माझे श्रम भूतलावर केले होते त्याविषयी माझे मन निराश झाले.
21 Ty en menniska, som sitt arbete med vishet, förnuft och skickelighet gjort hafver, det måste hon låta enom androm till arfs, den deruppå intet arbetat hafver; det är ock fåfängelighet, och en stor olycka.
२१कारण ज्याचे श्रम ज्ञानाने, विद्येने आणि कौशल्याने होतात असा मनुष्य कोण आहे? तरी त्यासाठी ज्याने काही श्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेऊन सोडून जावे हेही व्यर्थच आहे आणि मोठी शोकांतिका आहे.
22 Ty hvad får menniskan af allt sitt arbete, och hjertans bekymmer, hon hafver under solene;
२२कारण मनुष्य सूर्याच्या खाली जे सर्व श्रम करतो आणि आपल्या मनाने जे प्रयत्न करतो त्याकडून त्यास काय फायदा होतो?
23 Utan sveda, grämelse och sorg, i alla sina lifsdagar; så att ock hennes hjerta icke kan hafva ro om nattena? Det är ock fåfängelighet.
२३कारण मनुष्याच्या कामाचा प्रत्येक दिवस दुःखदायक आणि तणावपूर्ण असतो. रात्रीदेखील त्याच्या मनास विसावा मिळत नाही. हेही वायफळच आहे.
24 Är då nu menniskone icke bättre äta och dricka, och göra sine själ goda dagar i sitt arbete? Men det såg jag ock, att det kommer af Guds hand.
२४मनुष्याने खावे, प्यावे आणि श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्यास काहीही उत्तम नाही. हे ही देवाच्या हातून घडते असे मी पाहिले.
25 Ty ho hafver gladare ätit, och kräseligare lefvat, än jag?
२५कारण माझ्यापेक्षा कोण उत्तम भोजन करील अथवा कोण देवापासून वेगळे राहून कोणत्या प्रकारचा सुखाचा उपभोग घेईल?
26 Ty den menniska, som honom täck är, gifver han vishet, förnuft och glädje; men syndarenom gifver han olycko, att han församlar och lägger tillhopa, och det varder dock dem gifvet, som Gudi täck är; ty är det ock icke annat än jämmer.
२६जो मनुष्य देवासमोर चांगला आहे त्यास तो ज्ञान, विद्या आणि आनंद देतो. परंतु तो पाप्याला कष्ट देतो, अशासाठी की त्याने संग्रह करावा व साठवून ठेवावे आणि जो देवासमोर चांगला आहे त्यास ते द्यावे. हेही व्यर्थ आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.

< Predikaren 2 >