< 1 Kungaboken 4 >
1 Alltså vardt Salomo Konung öfver hela Israel.
१राजा शलमोन सर्व इस्राएलाचा राजा होता.
2 Och desse voro hans Förstar: AsarJa, Zadoks son, Prestens,
२त्यास शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांची नावे अशी: सादोकाचा पुत्र अजऱ्या, हा याजक होता.
3 Elihoreph och AhiJa, Sisa söner, voro skrifvare; Josaphat, Ahiluds son, var canceller.
३शिशाचे पुत्र अलिहोरेफ आणि अहीया. न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा बखरकार होता.
4 Benaja, Jojada son, var härhöfvitsman; Zadok och AbJathar voro Prester.
४बनाया हा यहोयादाचा पुत्र सेनापती होता सादोक आणि अब्याथार याजक होते
5 AsarJa, Nathans son, var öfver ämbetsmännerna; Sabud, Nathans son, Prestens, var Konungens vän.
५नाथानचा पुत्र अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता, नाथानाचा पुत्र जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता.
6 Ahisar var hofmästare; Adoniram, Abda son, var räntomästare.
६अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता, अब्दाचा पुत्र अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.
7 Och Salomo hade tolf befallningsmän öfver hela Israel, som försörjde Konungen och hans hus; hvar hade en månad om året till att försörja.
७इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागातून अन्नधान्य गोळा करून राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई.
8 Och de heto alltså: Hurs son på Ephraims berg;
८त्या बारा कारभाऱ्याची नावे अशी: बेन-हूर, हा एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता.
9 Dekers son i Makaz, och i Saalbim, och i BethSemes, och i Elon BethHanan;
९माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी.
10 Heseds son i Aruboth, och hade dertill Socho, och hela landet Hepher;
१०अरुबोथ, सोखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभारी होता.
11 AbiNadabs son hela landet Dor; och hade Taphath, Salomos dotter, till hustru;
११बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची कन्या टाफाथ ही याची पत्नी.
12 Baana, Ahiluds son, i Taanach, och i Megiddo, och öfver hela BethSean, hvilket ligger vid Zarthana under Jisreel, ifrå BethSean intill den planen Mehola, intill hinsidon Jokmeam;
१२तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेलच्या खाली बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता.
13 Gibers son i Ramoth i Gilead; och hade de städer Jairs, Manasse sons, i Gilead; och hade den ängden Argob, som i Basan ligger, sextio stora städer murade, och med kopparbommar;
१३रामोथ-गिलादावर बेन-गेबेर; हा प्रमुख होता. गिलाद येथील मनश्शेचा पुत्र याईर याची सर्व गावे, बाशानातले अर्गोब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि पितळेची अडसर असणारी साठ मोठी नगरे होती.
14 Ahinadab, Iddo son, i Mahanaim;
१४इद्दोचा पुत्र अहीनादाब महनाईम प्रांतावर होता.
15 Ahimaaz i Naphthali; och han tog också Basmath, Salomos dotter, till hustru;
१५नफतालीवर अहीमास होता. (ज्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी लग्न केले होते.)
16 Baana, Husai son, i Asser och i Aloth;
१६हूशयाचा पुत्र बाना, हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता.
17 Jasaphat, Paruahs son, i Isaschar;
१७पारुहाचा पुत्र, यहोशाफाट इस्साखारवर होता.
18 Simei, Ela son, i BenJamin;
१८एलाचा पुत्र शिमी बन्यामीनचा कारभारी होता.
19 Geber, Uri son, i Gileads land, i Sihons, de Amoreers Konungs land; och Ogs, Konungens i Basan; en befallningsman var i de samma landena.
१९उरीचा पुत्र गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग हे या प्रांतात राहत होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.
20 Men Juda och Israel voro månge, såsom sanden i hafvet, och de åto och drucko, och voro glade.
२०यहूदा आणि इस्राएलमध्ये समुंद्रातील वाळूसारखी बहुसंख्य माणसे होती. ती खात, पीत व मजा करत आनंदाने जगत होती.
21 Alltså var Salomo en herre öfver all rike, ifrån älfvene intill de Philisteers land, och allt intill de Egyptiers gränso; hvilke honom förde skänker, och tjente honom i hans lifstid.
२१नदीपासून ते पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत व मिसराच्या सीमेपर्यंत शलमोनाची सत्ता होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.
22 Och Salomo måste dagliga hafva till spisning tretio corer semlomjöl, sextio corer annat mjöl,
२२शलमोनाला एका दिवसास जेवणाऱ्या सर्वांसाठी खालील अन्नपदार्थ लागत: तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ,
23 Tio gödda oxar, och tjugu oxar af betene, och hundrade får; förutan hjort och rå, stengetter, och hvad man på stall höll.
२३दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरीण, सांबरे, भेकर, खाण्यायोग्य पक्षी.
24 Ty han var rådandes i hela landena, på denna sidon älfven, ifrå Tiphsah allt intill Gasa, öfver alla de Konungar på denna sidon älfven; och hade frid med alla sina grannar allt omkring;
२४महानदाच्या अलीकडील सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या सर्व देशांवर व जितके राजे होते त्यावर त्याची सत्ता होती. या प्रदेशात सर्वत्र शांतता नांदत होती.
25 Så att Juda och Israel bodde trygge, hvar och en under sitt vinträ, och under sitt fikonaträ, ifrå Dan allt intill BerSeba, så länge Salomo lefde.
२५शलमोनाच्या दिवसात दानपासून बैर-शेबापर्यंत, यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहत होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते.
26 Och Salomo hade fyratiotusend vagnhästar, och tolftusend resenärar.
२६रथाच्या चार हजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार स्वार होते.
27 Och befallningsmännerna försörjde Konung Salomo, och allt det som till Konungens bord hörde, hvar och en i sin månad; och läto intet fattas.
२७शिवाय ते बारा कारभारी प्रत्येक महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते.
28 Sammalunda ock korn, och halm för hästar och mular, förde de dit som han var, hvar och en efter som honom befaldt var.
२८रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभारी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी.
29 Och Gud gaf Salomo ganska stor visdom och förstånd, och ett fritt mod, såsom sanden som ligger på hafsens strand;
२९देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण व बुध्दी दिली होती. आणि समुद्राच्या वाळूप्रमाणे विशाल मन दिले.
30 Så att Salomos visdom var större, än alla österländningabarnas, och alla Egyptiers visdom;
३०पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते.
31 Och var visare än alla menniskor, och visare än Ethan den Esrahiten, Heman, Chalchol och Darda, Mahols söner; och var namnkunnig ibland alla Hedningar allt omkring.
३१पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची पुत्र, हेमान व कल्यकोल व दर्दा, यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र पसरले होते.
32 Och han talade tretusend ordspråk; och hans visor voro tusende och fem.
३२आपल्या आयुष्यात त्याने तीन हजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली.
33 Och han talade om trä, ifrå ceder, som är i Libanon, allt intill isop, som växer utu väggene; desslikes talade han om djur, om foglar, om matkar, om fiskar.
३३निसर्गाविषयी ही त्यास ज्ञान होते. लबानोनातल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्यास ज्ञान होते. प्राणी, पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे.
34 Och utaf all folk kommo till att höra Salomos visdom, ifrån alla Konungar på jordene, som af hans visdom hört hade.
३४देशोदेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार मनुष्यांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.