< Zekaria 10 >
1 Mwombeni Yahwe mvua nyakati za kipupwe - Yahwe afanyaye mvua ya radi - naye hufanya mvua inyeshe kwa kila mmoja na uoto kondeni.
१वीज व वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील, मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील.
2 Kwani sanamu za wenye nyumba husema uongo; waganga hunena uongo; wanasema ndoto za udanganyifu na hutoa faraja tupu, hivyo wapotea kama kondoo na wanaumia kwa sababu hakuna mchungaji.
२कारण तेराफिम मुर्तींनी निरर्थक गोष्टी केल्या आहेत, दैवज्ञांनी लबाडीचा दृष्टांत पाहिला आहे; ते आपली फसवणारी स्वप्ने सांगतात आणि खोटा धीर देतात; म्हणून लोक मेंढरांसारखे भटकत आहेत आणि त्यांचा कोणी मेंढपाळ नसल्याने त्यांच्यावर संकटे आली आहेत.
3 Gadhabu yangu inawaka dhidi ya wachungaji; ni mabeberu - viongozi - nitakao waadhibu. Yahwe wa majeshi atalihudumia pia kundi la kondoo wake, nyumba ya Yuda, na kuwafanya kama farasi wake wa vita!
३परमेश्वर म्हणतो, “माझा राग मेंढपाळांवर पेटला आहे; त्यांच्यातील बोकडांना, पुढाऱ्यांना मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वर आपल्या कळपाची, यहूदाच्या घराण्याची, काळजी वाहील, आणि त्याच्या लढाईच्या घोड्यासारखे त्यांना बनवेल.”
4 Kutoka kwao litatoka jiwe kuu la pembeni; kutoka kwao kitatoka kigingi cha hema; kutoka kwao utatoka upinde wa vita; kutoka kwao watakuja viongozi wote kwa pamoja.
४“त्यांच्यातूनच कोनशिला उत्पन्न होईल; त्यांच्यापासूनच खुंट्या तयार होतील; त्यांच्यातूनच युध्दात वापरावयाची धनुष्यही येईल; त्यांच्यातूनच प्रत्येक पुढारी निघेल.
5 Watakuwa kama mashujaa wawakanyagao adui zao katika matope ya mitaani vitani; watafanya vita, kwa maana Yahwe yu pamoja nao, nao watawaabisha wapanda farasi wa vita.
५ते आपल्या शत्रूचा पराभव, जणू काही रस्त्यातून चिखल तुडवीत जावे, तसा तुडवीत करतील; परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि घोडेस्वारांना अपमानीत करतील.”
6 Nitaitia nguvu nyumba ya Yuda na kuiokoa nyumba ya Yusufu; kwani nitawarejesha na kuwahurumia. Watakuwa kama nilikuwa sijawaondoa, kwani mimi ni Yahwe Mungu wao, nami nitawaitikia.
६“मी यहूदाच्या घराण्याला बळकट करीन आणि योसेफाच्या घराचा बचाव करीन; कारण मी त्यांना पुनःस्थापित करीन आणि त्यांच्यावर दया करीन. आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना प्रतिसाद देईल.
7 Ndipo Efraimu atakapokuwa kama shujaa, na mioyo yao itafurahi kama kwa mvinyo; wana wao wataona na kufurahi. Mioyo yao itanifurahia!
७एखाद्या योद्ध्याप्रमाणे एफ्राईम खूश होईल, त्यांचे हृदय द्राक्षरसाने हर्षित होते तसे हर्षित होईल; त्यांचे लोक हे पाहतील आणि ते आनंदीत होतील. परमेश्वराच्याठायी त्यांचे हृदय आनंदीत होईल.”
8 Nitawanong'oneza na kuwakusanya, kwani nitawaokoa, nao watakuwa wakuu kama walivyokuwa mwanzo!
८“मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन कारण मी त्यांना वाचवीन आणि त्यांची संख्या पूर्वी होती तशीच असंख्य होईल.
9 Niliwapanda kati ya watu, lakini watanikumbuka katika nchi ya mbali, hivyo wao na wana wao wataishi na kurejea.
९होय! मी माझ्या लोकांस राष्ट्रां-राष्ट्रांत पांगवीत आलो आहे, पण त्या दूरदूरच्या ठिकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुलेबाळे जगतील, वाचतील आणि परत येतील.
10 Kwa maana nitawarejesha kutoka nchi ya Misri na kuwakusanya kutoka Ashuru. Nitawaleta katika nchi ya Gileadi na Lebanoni mpaka kutakapokuwa hakuna nafasi tena kwa ajili yao.
१०मी त्यांना मिसरमधून परत आणीन व अश्शूरमधून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना गिलादाच्या व लबानोनाच्या नगरात आणीन. ते त्या जागेत मावणार नाहीत तोपर्यंत मी त्यांना आणीन.”
11 Nitapita katika bahari ya mateso yao; nitayapiga mawimbi ya bahari hiyo na nitavikausha vilindi vyote vya Nile. Utukufu wa Ashuru utashushwa chini, na fimbo ya Misri itakwenda mbali kutoka kwa Wamisri.
११ते जाचजुलूमाच्या समुद्रातून जातील; ते गर्जनाऱ्या समुद्राला दबकावतील, ते नाईल नदीला सुकवतील व तिचे सर्व तळ उघडे पाडतील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसराच्या सत्तेचा राजदंड त्यांच्यापासून काढून घेतला जाईल.
12 Nitawatia nguvu katika mimi mwenyewe, nao watatembea katika jina langu - asema Yahwe.
१२मी त्यांना सामर्थ्यवान करीन, ते देवासाठी व त्याच्या नावासाठी चालतील, हे परमेश्वराचे वचन होय.