< Zaburi 89 >
1 Nitimba sifa za matendo ya uaminifu wa agano milele. Nitatangaza kweli yako kwa vizazi vijavyo.
१एथानाचे स्तोत्र मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन. मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन.
2 Maana nimesema, “Uaminifu wa agano umeimarishwa milele; na kweli yako umeiimarisha mbinguni.”
२कारण मी म्हणालो आहे की, विश्वासाचा करार सर्वकाळासाठी स्थापित होईल; तुझी सत्यता स्वर्गात तूच स्थापन केली आहेस.
3 “Nimefanya agano na wateule wangu, nimeapa kiapo kwa Daudi mtumishi wangu.
३मी माझ्या निवडलेल्याशी करार केला आहे, मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे.
4 Nitauimarisha uzao wako milele, na nitauimarisha utawala wako vizazi vyote.” (Selah)
४मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन, आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन.
5 Mbingu husifu maajabu yako, Yahwe; kweli yako inasifiwa katika kusanyiko la watakatifu.
५हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील, तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल.
6 Maana ni nani katika mbingu aweza kulinganishwa na Yahwe? Ambaye kati ya wana wa miungu ni kama Yahwe?
६कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे? देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे?
7 Ni Mungu anaye heshimiwa sana katika baraza la watakatifu naye ni wakutisha kati ya wote wanao mzunguka.
७पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे; आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे.
8 Yahwe, Mungu wa majeshi, ni nani aliye na nguvu kama wewe, Yahwe? Kweli yako inakuzunguka.
८हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?
9 Wewe huitawala bahari yenye nguvu; mawimbi yainukapo, wewe huyatuliza.
९समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस; जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस.
10 Ulimwangamiza Rahabu kama mmoja aliye uliwa. Uliwatawanya adui zako kwa mkono wako wenye nguvu.
१०तू राहाबाला ठेचून त्याचा चुराडा केलास. तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस.
11 Mbingu ni zako wewe, na nchi pia. Uliiumba dunia na vyote vilivyomo.
११आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे. तू जग आणि त्यातले सर्वकाही निर्माण केलेस.
12 Uliumba kaskazini na kusini. Tabori na Hermoni hulifurahia jina lako.
१२उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या. ताबोर आणि हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
13 una mkono wa uweza na mkono wenye nguvu, na mkono wako wa kuume uko juu.
१३तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे व तुझा उजवा हात उंचावला आहे.
14 Haki na hukumu ni msingi wa kiti chako. Uaminifu wa agano lako na uaminifu huja mbele zako.
१४निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत. कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत.
15 Wamebarikiwa watu wakuabuduo wewe! Yahwe, wanatembea katika nuru ya uso wako.
१५जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
16 Siku zote wanafurahia katika jina lako, na katika haki yako wanakutukuza wewe.
१६ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात, आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात.
17 Wewe ni fahari ya nguvu zao, na kwa nguvu zako tu washindi.
१७त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस, आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत.
18 Maana ngao zetu ni za kwako Yahwe; mfalme wetu ni wa Mtakatifu wa Israeli.
१८कारण आमची ढाल परमेश्वराची आहे; इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे.
19 Muda mrefu uliopita ulizungumza na waaminfu wako katika maono; ulisema, “Nimeweka taji juu ya mwenye nguvu; nimemuinua aliyechaguliwa kutoka kati ya watu.
१९पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.
20 Nimemchagua Daudi mtumishi wangu; kwa mafuta yangu matakatifu nimempaka yeye.
२०मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे; मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.
21 Mkono wangu utamsaidia yeye; mkono wangu utamtia nguvu.
२१माझा हात त्यास आधार देईल; माझा बाहू त्यास बलवान करील.
22 Hakuna adui atakaye mdanganya; hakuna mwana wa uovu atakaye muonea.
२२कोणी शत्रू त्यास फसवणार नाही. दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत.
23 Nitawaangamiza adui zake mbele yake; nitawaua wale wamchukiao.
२३मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन; जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकीन.
24 Kweli yangu na uaminifu wa agano vitakuwa pamoja naye; kupitia jina langu atakuwa mshindi.
२४माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील; माझ्या नावाने ते विजयी होतील.
25 Nitaweka mkono wake juu ya bahari na mkono wake wa kuume juu ya mito.
२५मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.
26 Yeye ataniita, 'Wewe ni Baba yangu, Mungu wangu, na mwamba wa wokovu wangu.'
२६तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.
27 Nitamjalia kuwa kama mzaliwa wangu wa kwanza, aliye inuliwa zaidi juu ya wafalme wa nchi.
२७आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.
28 Nitaongeza uaminifu wa agano langu kwake milele; na agano langu pamoja naye litakuwa salama.
२८मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील, आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल.
29 Nitaufanya uzao wake kudumu milele na kiti chake cha enzi kitadumu kama mbingu zilizo juu.
२९त्याचे वंश सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल.
30 Ikiwa watoto wake wataziacha sheria zangu na kutokutii amri zangu,
३०जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला.
31 na kama watazivunja sheria zangu na kutokuzishika amri zangu,
३१जर त्यांनी माझे नियम मोडले आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.
32 ndipo nitauadhiu uasi wao kwa fimbo na uovu wao kwa makofi.
३२मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने, आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन.
33 Lakini sitauondoa kwake upendo wangu thabiti wala kutokuwa mwaminifu kwa ahadi yangu.
३३परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही; मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन.
34 Sitavunja agano langu wala kubadilisha maneno ya midomoni mwangu.
३४मी माझा करार मोडणार नाही, किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही.
35 Mara moja na kwa yote, nimeapa kwa utakatifu wangu sitamdanganya Daudi:
३५एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.
36 uzao wake utaendelea milele na kiti chake cha enzi kama vile jua mbele yangu.
३६त्याची संतती सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.
37 Kitaimarishwa milele kama mwezi, shahidi mwaminifu mawinguni.” (Selah)
३७ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल. आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत.
38 Lakini wewe umemtupa na kumkataa; umemkasirikia mfalme mpakwa mafuta wako.
३८पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.
39 Wewe umelikataa agano la mtumishi wako. Umeinajisi taji yake ardhini.
३९तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.
40 Umevunja kuta zake zote. Umeharibu ngome yake.
४०तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
41 Wapita njia wote wamemuibia, amekuwa kitu chenye kinyaa kwa majirani zake.
४१सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात. तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे.
42 Umeinua mkono wa kuume wa adui zake; umewafurahisha adui zake wote.
४२तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे. तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस.
43 Umeyageuza makali ya upanga wake. Na hukumfanya asimame awapo vitani.
४३तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे. आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस.
44 Umeimaliza fahari yake; umekitupa ardhini kiti chake cha enzi.
४४तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला; तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस.
45 Umefupisha siku za ujana wake. Umemfunika kwa aibu. (Selah)
४५तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत. तू त्यास लज्जेने झाकले आहेस.
46 Mpaka lini, Yahwe? utajificha, milele? Mpaka lini hasira yako itawaka kama moto?
४६हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय? तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल?
47 Oh, fikiria jinsi muda wangu ulivyo mfupi, na ni kwa ajili gani umewaumba wana wote wa wanadamu wasio na manufaa!
४७माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर, तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय?
48 Ni nani aweza kuishi na asife, au atakaye iokoa nafsi yake dhidi ya mkono wa kuzimu? (Selah) (Sheol )
४८कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील? (Sheol )
49 Bwana, yako wapi matendo yako ya zamani ya uaminifu wa agano ambayo ulimwapia Daudi katika kweli yako?
४९हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली, ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत?
50 Kumbuka, Bwana, watumishi wako walivyodhihakiwa na vile nilivyo vumilia moyoni mwangu matusi mengi dhidi ya mataifa.
५०हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे; आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण.
51 Maadui zako wanavurumiza matusi, Yahwe; wanadhihaki nyayo za mpakwa mafuta wako.
५१हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात; ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात.
52 Atukuzwe Yahwe milele. Amina na Amina. Kitabu cha Nne
५२परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो. आमेन आणि आमेन.