< Zaburi 60 >

1 Mungu, wewe umetutupa; umeuvunja ulinzi wetu; wewe umekuwa hasirani; utuwezeshe tena.
दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आम्हास टाकून दिले आहेस; तू आम्हास फाडून खाली टाकले आहे; आमच्यावर रागावला आहेस; तू आम्हांस पुन्हा पूर्वस्थितीवर आण.
2 Wewe umeifanya nchi kutetemeka; umeipasua pasua; uiponye nyufa zake, maana zinatikisika.
तू भूमी कंपित केली आहेस; तू ती फाडून वेगळी केली; तिचे खिंडार बरे कर, कारण ती हादरत आहे.
3 Wewe umewafanya watu wako kuona mambo magumu; umetufanya tunywe mvinyo wenye kutufanya kupepesuka.
तू तुझ्या लोकांस कठीण गोष्टी दाखवल्या आहेत; तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षरस पाजला आहे.
4 Kwa wale wanao kuheshimu wewe, wewe umeweka bandera ionekane dhidi ya wale wabebao upinde. (Selah)
तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे, यासाठी की, त्यांनी सत्याकरता तो उभारावा.
5 Ili kwamba wale uwapendao waweze kuokolewa, utuokoe sisi kwa mkono wako wa kuume na unijibu.
ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी, म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे.
6 Mungu ameongea katika utakatifu wake, “Nitashangilia; nitaigawanya Shekemu na kuligawa bonde la Sukothi.
देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन; मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
7 Gileadi ni yangu, na Manase ni yangu na Ephraimu pia ni kofia yangu ya chuma; Yuda ni fimbo yangu ya kifalme.
गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे; एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझा राजदंड आहे.
8 Moabu ni bakuli langu la kunawia; juu ya Edomu nitatupa kiatu changu; nitapiga kelele za ushindi kwa sababu ya Filisti.”
मवाब माझे धुण्याचे पात्र आहे; अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन; मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
9 Ni nani atakaye nileta kwenye mji imara? Ni nani ataniongoza kwenda Edomu?
मला बळकट नगरात कोण नेईल? मला अदोमात कोण नेईल?
10 Lakini wewe, Mungu, je, haukutukataa? Wewe hauendi vitani pamoja na jeshi letu.
१०हे देवा, तू आम्हास नाकारले नाही? परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
11 Utusaidie dhidi ya adui yetu, maana msaada wa mwanadamu ni bure.
११तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर, कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.
12 Kwa msaada wa Mungu tutashinda; yeye atawakanyaga chini adui zetu.
१२आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ; तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.

< Zaburi 60 >