< Nehemia 8 >
1 Watu wote walikusanyika kama mtu mmoja katika eneo la wazi mbele ya lango la maji. Wakamwomba Ezra mwandishi akilete Kitabu cha Sheria ya Musa, ambacho Bwana aliwaamuru Israeli.
१सर्व इस्राएल लोक पाणीवेशीच्या समोरच्या मोकळया जागेत एकत्र जमले. त्या सर्वांनी शास्त्री एज्राला परमेश्वराने इस्राएल लोकांस दिलेले मोशेचे नियमशास्त्राचे पुस्तक आणावयास सांगितले.
2 Siku ya kwanza ya mwezi wa saba, Ezra, kuhani, akaleta sheria mbele ya mkutano, wanaume na wanawake, na wote waliokuwa na uwezo wa kusikia na kuelewa.
२तेव्हा एज्राने तेथे जमलेल्या लोकांसमोर नियमशास्त्र आणले. त्या वर्षाच्या सातव्या महिन्याचा तो पहिला दिवस होता. या सभेला स्त्री-पुरुष आणि ज्यांना वाचलेले ऐकून समजत होते असे सर्वजण होते.
3 Akatizama eneo lililo wazi mbele ya lango la Maji, na akasoma toka asubuhi hadi adhuhuri, mbele ya wanaume na wanawake, na yeyote ambaye angeweza kuelewa. Na wote wakasikiliza kwa makini kitabu cha Sheria.
३एज्राने या नियमशास्त्रातून पहाटेपासून दुपारपर्यंत मोठया आवाजात वाचून दाखवले. एज्रा पाणीवेशीसमोरच्या मोकळया चौकाकडे तोंड करून उभा होता. समस्त स्त्रीपुरुषांना आणि वाचलेले ऐकून समजत होते इतपत मोठे असलेल्या सर्वापुढे त्याने वाचले. सर्व लोकांनी नियमशास्त्राचे हे पठण काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकले.
4 Na Ezra, mwandishi, alisimama juu ya jukwaa la mbao ambalo watu walikuwa wametengeneza kwa kusudi hilo. Pembeni yake walisimama Matithia, Shema, Anaya, Uria, Hilkia na Maaseya, upande wake wa kuume; na Pedaya, Misbaeli, Malkiya, Hashumu, Hashbadani, Zekaria na Meshulamu walikuwa wamesimama upande wake wa kushoto.
४एज्रा शास्त्री एका उंच लाकडी मंचावर उभा होता. खास या प्रसंगाकरताच तो करवून घेतला होता. मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे एज्राच्या उजव्या बाजूला उभे होते तर पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम, हश्बद्दाना, जखऱ्या, आणि मशुल्लाम हे डावीकडे होते.
5 Ezra alifungua kitabu mbele ya watu wote, kwa kuwa alikuwa amesimama juu ya watu, na alipoufungua watu wote wakasimama.
५आणि एज्राने ग्रंथ उघडला. एज्रा उंच मंचावर सर्वांसमोर उभा असल्यामुळे सगळयांना तो दिसत होता. एज्राने नियमशास्त्राचा ग्रंथ उघडल्याबरोबर लोक उभे राहिले.
6 Ezra akamshukuru Bwana, Mungu mkuu; na watu wote wakainua mikono yao, wakajibu, “Amina! Amina!” Wakainamisha vichwa vyao, wakamwabudu Bwana kwa nyuso zao zikiwa chini.
६एज्राने थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” म्हणून उत्तर दिले. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वरास वंदन केले.
7 Yeshua, Bani, Sherebia, Yamini, Akubu, Shabethai, Hodai, Maaseya, Kelita, Azaria, Yozabidi, Hanania, Pelaya nao ni Walawi, waliwasaidia watu kuelewa sheria, watu wakakaa mahali pao.
७बाजूला उभे असलेले लेवी घराण्यातील लोक समुदायाला नियमशास्त्र समजावून सांगत होते. त्या लेवीची नावे अशी: येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजऱ्या, योजाबाद, हानान व पेलाया,
8 Wao walisoma katika kitabu, Sheria ya Mungu, wakaeleza wazi kwa tafsiri na kutoa maana ili watu waelewe yaliyosomwa.
८या लेवींनी देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचला. त्याचा अर्थ स्पष्टकरून लोकांस समजेल असा उलगडून सांगितला आणि ज्याचे पठण चालले होते ते लोकांस समजावे म्हणून त्यांनी हे विवरण केले.
9 Nehemia, gavana, na Ezra kuhani, na mwandishi, na Walawi waliokuwa wakitafsiri kwa watu, wakawaambia watu wote, Siku hii ni takatifu kwa Bwana, Mungu wenu. Msiomboleze au kulia. Kwa kuwa watu wote walilia wakati waliposikia maneno ya sheria.
९यानंतर नहेम्या हा राज्यपाल, याजक व शिक्षक एज्रा आणि लोकांस स्पष्टीकरण करून सांगणारे लेवी हे लोकांस बोलले. ते म्हणाले, “तुमचा परमेश्वर देव याचा हा पवित्र दिवस आहे. आज दु: खी राहू नका किंवा शोक करु नका.” कारण नियमशास्त्रातील देवाची वचने ऐकत असताना लोक रडू लागले होते.
10 Nehemia akawaambia, 'Nendeni, mle kilichonona, mkate na maji ya kunywa, na mpelekeni mtu asiye na kitu, kwa maana siku hii ni takatifu kwa Bwana wetu. Msiwe na huzuni, kwa kuwa furaha ya Bwana ni nguvu zenu.
१०नहेम्या म्हणाला, “आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु: खी राहू नका, कारण परमेश्वराचा आनंदच तुमचे सामर्थ्य आहे.”
11 Basi Walawi wakawafanya watu kuwa na utulivu, wakisema, “Nyamazeni! kwa maana siku hii ni takatifu. Msiwe na huzuni.”
११लेवी घराण्यातील लोकांनी जमलेल्या लोकांस शांत केले. आणि म्हणाले, “शांत व्हा, आजचा दिवस पवित्र आहे. शोक करु नका.”
12 Watu wote wakaenda kula na kunywa na kugawana chakula na kusherehekea kwa furaha kubwa kwa sababu walielewa maneno waliyohubiriwa.
१२मग सर्व लोक मेजवानी घ्यायला गेले. खाद्यपेयात त्यांनी इतरांना सहभागी करून घेतले. अतिशय आनंदात त्यांनी हा विशेष दिवस साजरा केला. परमेश्वराची वचने त्यांना अखेर समजली.
13 Siku ya pili viongozi wa nyumba za mababu kutoka kwa watu wote, makuhani na Walawi, wakakusanyika kwa Ezra, mwandishi ili kupata ufahamu kutoka kwenye maneno ya sheria.
१३यानंतर त्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व घराण्यांचे प्रमुख एज्रा शास्त्रीला तसेच याजकांना व लेवींना भेटायला गेले. नियमशास्त्राची वचने लक्षपूर्वक ऐकण्यासाठी ते जमले.
14 Wakaona imeandikwa katika sheria namna Bwana alivyomuamuru Musa kwamba wana wa Israeli waishi katika hema wakati wa sikukuu ya mwezi wa saba.
१४परमेश्वराने मोशेद्वारे लोकांस हे नियमशास्त्र दिले. त्यामध्ये यांना अभ्यासातून असे सापडले की, वर्षाच्या सातव्या महिन्यात इस्राएल लोकांनी या सणा दरम्यान तात्पुरत्या तंबूत रहावे.
15 Wanapaswa kutoa tamko katika miji yao yote, na huko Yerusalemu, wakisema, 'Nendeni nje kwenye nchi ya vilima, na mkalete matawi kutoka kwenye mzeituni mwitu, na matawi ya mihadsi, na matawi ya mitende na matawi ya miti minene ili kufanya vibanda vya muda kama ilivyoandikwa.”
१५लोकांनी सर्व नगरांमध्ये आणि यरूशलेमभर फिरुन अशी घोषणा करावी की, “डोंगराळ भागामध्ये जाऊन वेगवेगळया प्रकारच्या जैतून वृक्षांच्या फांद्या आणाव्या. देवदारू, खजुरी आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या फांद्या आणाव्या आणि त्यांचे तात्पुरते मांडव उभारावेत. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करावे.”
16 Basi watu wakatoka na kuleta matawi, wakajifanyia mahema, kila mmoja juu ya paa zao, katika ua zao, katika mahakama za nyumba ya Mungu, mahali pa wazi pa lango la Maji, na katika mraba wa lango la Efraimu.
१६तेव्हा लोक बाहेर पडले आणि त्यांनी फांद्या आणल्या आणि त्यापासून स्वत: साठी आपल्या धाब्यावर आणि स्वतःच्या अंगणात, देवाच्या मंदिराच्या अंगणात, पाणीवेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशी जवळही त्यांनी मांडव घातले.
17 Kisha kusanyiko lote la wale waliorudi kutoka kifungoni wakafanya mahema na kukaa ndani yake. Kwa kuwa tangu siku za Yoshua, mwana wa Nuni hata siku hiyo, watu wa Israeli hawakuadhimisha sikukuu hii. Na furaha ilikuwa kubwa sana.
१७बंदिवासातून परत आलेल्या सर्वांनी मांडव उभारले व त्यामध्ये ते राहिले. नूनचा पुत्र येशूवा याच्या काळापासून ते त्या काळापर्यंत इस्राएलींनी हा मंडपाचा सण साजरा केला नव्हता. सर्वांना अतिशय आनंद झाला होता.
18 Pia siku kwa siku, tangu siku ya kwanza hadi mwisho, Ezra alisoma kutoka Kitabu cha Sheria ya Mungu. Walifanya sikukuu kwa siku saba na siku ya nane kilikuwa na kusanyiko zuri, kwa utiifu wa amri.
१८प्रतिदिवशीही, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचीत होता. त्यांनी सात दिवस हा सण साजरा केला आणि नियमानुसार विधीपूर्वक आठव्या दिवशी सभा भरून पाळला.