< Ayubu 8 >

1 Kisha Bildadi huyo Mshuhi akajibu na kusema,
नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 “hata lini wewe utasema mambo haya? Kwa muda gani maneno ya kinywa chako yatakuwa kama upepo wenye nguvu?
“तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे किती वेळेपर्यंत उडत राहतील.
3 Je Mungu hupotosha hukumu? Je Mwenyezi hupotosha haki?
देव नेहमीच न्यायी असतो का? सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या धार्मिक गोष्टी कधीच बदलत नाही काय?
4 Watoto wako wametenda dhambi dhidi yake; tunalifahamu hili, kwa kuwa amewatia mkononi kwa makosa yao.
तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून देवाने त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा केली.
5 Lakini wewe unaonaje ukimtafuta Mungu kwa bidii na kufikisha haja yako kwa huyo Mwenyezi.
परंतु आता तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर.
6 Ukiwa wewe ni msafi na mkamilifu, hakika angeamka mwenyewe kwa niaba yako na kukurudisha kwenye makazi ya haki yako.
तू जर चांगला आणि सरळ असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरीत येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल.
7 Japokuwa huo mwanzo wako ulikuwa ni mdogo, hata hivyo hali yako ya mwisho itaongezeka sana.
जरी तुझी सुरुवात लहान असली, तरी तुझी अंतिम स्थिती अधिक मोठी असेल.
8 Tafadhari uwaulize vizazi vya zamani, na utie bidii katika hayo mababu zetu waliyojifunza.
मी तुला विनंती करतो वडिलांच्या वेळेची माहिती विचार, त्यांनी जो शोध लावला तो तुझ्यासाठी लागू करून घे.
9 (Sisi ni wa jana tu na hatujui chochote kwa kuwa siku zetu duniani ni kivuli).
आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत आणि काहीच माहित नाही, कारण छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस आहेत.
10 Je hawatakufunza wao na kukuambia? Je hawatatamka maneno yatokayo mioyoni mwao?
१०ते काय तुला शिकविणार आणि सांगणार नाहीत काय? काय ते त्याच्या अंतकरणातून बोलणार नाही का?
11 Je hayo mafunjo yaota pasipo matope? Je mafunjo yaota pasipo maji?
११लव्हाळी चिखलाशिवाय उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का?
12 Wakati yakiwa bado ya kijani na hayajakatwa, hunyauka kabla ya mmea mwingine.
१२ते अजूनही हिरवे आहेत आणि कापले नाही, ते दुसऱ्या झाडापेक्षा लवकर सुकून जातात.
13 Hivyo pia njia ya wote wamsahauo Mungu, na matumaini ya asiyeamini Mungu yatatoweka.
१३म्हणून नास्तिक मनुष्याची आशा, जे सर्व देवाला विसरतात त्याचा मार्ग सुद्धा नष्ट होईल.
14 Ujasiri wake utavunjika, na matumaini yake ni dhaifu kama utando wa buibui.
१४ज्याचा भरवसा नष्ट होतो. आणि ज्याचा विश्वास कोळ्याच्या जाळ्यासारखा तकलादु आहे.
15 Ataitegemea nyumba yake, lakini haitamsaidia; atashikamana nayo, lakini isidumu.
१५तो आपल्या घरावर टेकला असता परंतू ते त्यास आधार देऊ शकणार नाही, त्याने ते पकडून धरले असता ते स्थिर राहायचे नाही.
16 Yeye huwa mti mbichi chini ya jua, na machipukizi yake huenea katika bustani yake yote.
१६तो सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा हिरवागार आहे, तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात.
17 Mizizi yake hujifunga funga kwenye rundo la mawe; huangalia mahali pazuri katikati ya mawe;
१७तिची मुळे खडकाभोवती आवळली जातात आणि खडकावरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
18 Lakini mtu huyu aking'olewa mahali pake, kisha mahali pale patamkana, na kusema, 'mimi sikukuona.'
१८परंतु जर हा व्यक्ती त्या जागेवरून हलवला गेला तर तो नष्ट होतो, मग ती जागा त्यास नाकारुन म्हणेल ‘मी तुला कधी पाहिले नाही.’
19 Tazama, hii ni “furaha” ya mtu mwenye tabia hiyo; mimea mingine itachipuka toka katika udongo ule ule mahali pake.
१९पाहा अशा रीतीने वागणाऱ्या वक्तीबद्दल हाच आनंद आहे की तिच्याच जागी धुळीतून दुसरे उगवतील.
20 Tazama, Mungu hatamtupa mtu asiye na kosa; wala hatawathibitisha watendao uovu.
२०पाहा, देव निरागस लोकांस सोडून देत नाही. तसेच तो वाईट मनुष्यांना मदतही करत नाही.
21 Yeye atakijaza kinywa chako na kicheko, midomo yako na shangwe.
२१देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदाने ओरडतील!
22 Wale ambao wanakuchukia wewe watavishwa aibu; nayo hema yake mwovu haitakuwepo tena.
२२जे तुझा द्वेष करतात ते लज्जेची वस्त्रे घालतील, दुष्ट मनुष्यांची राहूटी नष्ट होइल.”

< Ayubu 8 >