< Ayubu 5 >
1 Ita sasa; je kuna yeyote ambaye atakujibu? Utamrudia yupi katika watakatifu hao?
१“आता आरोळी मार, तुला उत्तर देईल असा कोण आहे? असा कोण एक धार्मिक आहे का ज्याच्याकडे तू जावे?
2 Kwa kuwa hasira huua mtu mpumbavu; wivu huua mjinga.
२मूर्ख मनुष्याचा राग त्यास मारुन टाकतो, जळफळाट मुर्खाला ठार मारतो.
3 Nimemuona mtu mpumbavu akishika mzizi, lakini ghafla niliyalaani makazi yake.
३मी मूर्ख व्यक्तीस मुळावलेले पाहीले, परंतु अचानक मी त्याच्या घराचा तिरस्कार केला.
4 Watoto wake wako mbali na uzima; wameangamia langoni mwa mji. Hakuna yeyote atakaye waponya.
४त्याची मुले सुरक्षिततेपासून फार दूर आहेत, ते शहराच्या वेशीत चिरडले जातील. त्यांना तारणारा कोणीही राहणार नाही
5 Mwenye njaa hula mavuno yao; hata huyachukua katikati ya miiba. Wenye kiu huzihemea mali zao.
५भुकेल्या मनुष्यांनी त्याची उभी पिके खाऊन टाकली, काट्याकुटयात वाढलेले धान्यही लोकांनी सोडले नाही, लोभी मनुष्यांनी सर्वकाही नेले.
6 Kwa kuwa magumu hayatoki udongoni; wala taabu haichipuki katika nchi.
६अडचणी मातीतून येत नाहीत, किंवा संकटे रानातून उगवत नाहीत.
7 Badala yake, wanadamu huzaliwa kwaajili ya taabu, kama tu cheche za moto zirukavyo juu.
७परंतू जशा ठिणग्या वर उडतात, तसा मनुष्य स्वतःहा विघ्न निर्माण करतो.
8 Lakini kwa mimi, ningemrudia Mungu mwenyewe; kwake ningeaminisha kusudi langu -
८परंतू माझ्यासाठी, मी स्वतःह देवाकडेच वळलो असतो, त्याच्याकडे मी माझे गाऱ्हाने कबूल केले असते.
9 yeye afanyae makuu na mambo yasiyochunguzika, mambo ya ajabu yasiyo na hesabu.
९तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो, त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही.
10 Hutoa mvua juu ya nchi, na huyapeleka maji mashambani.
१०तो पृथ्वीवर पाऊस देतो. आणि शेतांवर पाणी पाठवतो.
11 Hufanya haya kwaajili ya kuwainua juu hao walio chini; huwapandisha sehemu salama hao waombolezao.
११तो नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो आणि जे राखेत बसून शोक करतात त्यांना तो सुरक्षीत उठवतो.
12 Yeye huharibu mipango ya watu wenye hila, ili mikono yao isipate mafanikio.
१२तो धूर्तांचे कार्य निष्फळ करतो, म्हणजे त्यांच्या हांताचे कट सिध्दीस जाणार नाहीत.
13 Yeye huwanasa watu wenye hekima katika matendo ya hila zao wenyewe; mipango ya watu waliogeuzwa huharibika haraka.
१३तो शहाण्यास त्याच्याच धुर्ततेच्या जाळ्यात अडकवितो, तो हूशार लोंकाच्या मसलती लवकर संपुष्टात आणतो.
14 Wao hupatwa na giza wakati wa mchana, na hupapasa mchana kama vile ni usiku.
१४त्यांचा भर दिवसाच अंधराशी सामना होतो, दिवसा मध्यान्ह्यात ते रात्र असल्यासारखे चाचपडतात.
15 Lakini yeye huokoa maskini kwa upanga wa vinywa vyao na mhitaji kwa mkono wa mtu mwenye nguvu.
१५त्यांच्या मुखांतील तलवारीपासून तो दरीद्री मनुष्यास, आणि बलंवताच्या हातातून गरजवंत मनुष्यास सोडवतो
16 Hivyo mtu maskini ana matumaini, na udhalimu hufumba kinywa chake mwenyewe.
१६म्हणून दरिद्री मनुष्यास आशा आहे, आणि अन्याय आपले तोंड बंद करते.
17 Tazama, amebarikiwa mtu ambaye hutiwa adabu na Mungu; kwa sababu hiyo, usidharau uongozi wa Mwenyezi.
१७पाहा, ज्या मनुष्याला देव दुरूस्त करतो तो सुखी आहे, म्हणून सर्वशक्तिमानाच्या शिक्षेचा अवमान करु नकोस.
18 Kwa kuwa yeye hujeruhi na kisha huuguza; yeye hutia jeraha na kisha mikono yake huponya.
१८तोच जखम करतो आणि नंतर तोच पट्टी बांधतो. तो जखमा करतो आणि नंतर त्याच्याच हाताने बरे करतो.
19 Yeye atakuokoa na mateso sita; kweli, katika mateso saba, hakuna uovu utakao kugusa.
१९सहा संकटामधून तो तुझा बचाव करील, खरोखर, सातही संकटात, दुष्ट तुला स्पर्श करणार नाही.
20 Wakati wa njaa atakukomboa na kifo, na kwa uwezo wa upanga wakati wa vita.
२०दुष्काळात (अवर्षण) तो तुला मृत्यूपासून आणि लढाईत तलवारीपासून वाचवेल.
21 Wewe utafichwa na mateso ya ulimi; na usitishike na uharibifu utakapokuja.
२१जिभेच्या दुःखदायी वाऱ्यापासून तू झाकला जाशील, आणि विनाश तूझ्यावर येईल तेव्हा तू त्यास भिणार नाहीस.
22 Wewe utaufurahia uharibifu na njaa, na hutatishika na wanyama wakali wa nchi.
२२तू विनाशात व दुष्काळात (अवर्षण) हसशील. आणि तुला रानपशूंची भीती वाटणार नाही.
23 Kwa kuwa wewe utakuwa na mapatano na mawe ya shambani mwako, na wanyama wa mwituni watakuwa na amani na wewe.
२३तुझ्या भूमीतील पाषाणाशीही तुझा करार होईल, जंगली पशूशीही तू शांतीने राहशील
24 Wewe utajua kwamba hema lako lina usalama; utatembelea zizi la kondoo wako na hutakosa kitu chochote.
२४तुला समजेल तुझा तंबू त्याच्यामध्ये सुरक्षित आहे, तू तुझ्या कळपाची पाहणी करशील आणि तुला काही कमतरता आढळणार नाही.
25 Pia utafahamu kwamba uzao wako utakuwa mwingi, na vizazi vyako vitakuwa kama nyasi ardhini.
२५तुझे घराणे समृध्द होईल. वनातील कुरणासारखी तुझी संतती वाढेल असे तू पाहाशील.
26 Wewe utafika kaburini kwako mwenye umri kamili, kama vile rundo la mashuke ya nafaka liendavyo juu wakati wake.
२६जशी कापणीच्या वेळी वाळलेली गव्हाची पेंढी मळणीसाठी आणतात तसा तू वयोवृध्द होऊन कबरेत येशील.
27 Tazama, tumelipeleleza jambo hili; ndivyo lilivyo; lisikie, na ulifahamu kwa ajili yako mwenyewe.”
२७पाहा, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे. म्हणून तू आमचे ऐक. आणि त्यातून स्वत: साठी काही शिक.”