< Isaya 40 >
1 ''Faraja, faraja watu wangu,'' amesema Mungu.
१तुमचा देव म्हणतो, सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा.
2 ''Ongea kwa upole kwa Yerusalemu; na tangaza vita vimeisha, maana maovu yao yamesamehewa, maana alipokea mara mbili kutoka kwa mkono wa Yahwe kwa dhambi zao.''
२यरूशलेमेशी प्रेमळपणाने बोला; आणि तिला घोषणा करून सांगा की तुझे युद्ध संपले आहे, तिच्या अन्यायाची क्षमा झाली आहे, तिने आपल्या सर्व पापांसाठी परमेश्वराच्या हातून दुप्पट स्विकारले आहे.
3 Sauti inalia nje, ''Katika jangwa tengeneza njia ya Yahwe; njoosha njia ya Araba katika njia kuu ya Mungu.''
३घोषणा करणाऱ्याची वाणी म्हणते, अरण्यात परमेश्वराचा मार्ग तयार करा; आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.
4 Kila bonde litanyanyuliwa juu, kila mlima na kilima kitasawazishwa; na aridhi ya mwinuko itasawazishwa, mahali palipokwaruzwa patakuwa na usawa;
४प्रत्येक दरी उंच होईल, आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट होईल; आणि खडबडीत जमीन सपाट होईल आणि उंचसखल जागा मैदान होईल.
5 na utukufu wa Mungu utafunuliwa, na watu wote wataona kwa pamoja; maana mdomo wa Yahwe umezungumza.
५आणि परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व लोक ते एकत्रित पाहतील; कारण परमेश्वराच्या मुखातील हे शब्द आहेत.
6 Sauti inasema, ''Lia.'' Jibu lingine, ''Kwa nini nilie?'' ''Mwili wote ni nyasi na maagano yaliyoaminika ni kama ua kwenye shamba.
६एक वाणी म्हणाली, “घोषणा कर” दुसरे उत्तर आले, “मी काय घोषणा करू?” सर्व देह गवत आहे आणि त्यांचा सर्व विश्वासूपणाचा करार वनातील फुलासारखा आहे.
7 Nyasi zinanyauka na maua yanaperuka pale Yehwe atakapo puliza punzi yake juu yake; hakika ubinadamu ni nyasi.
७गवत सुकते व फुल कोमजते, जेव्हा परमेश्वराच्या श्वासाचा फुंकर त्यावर पडतो; खात्रीने मानवजात गवत आहे.
8 Nyasi hunyauka, maua hupepea, lakini neno la Yahwe litasimama daima.''
८“गवत सुकते आणि फुल कोमेजते पण आमच्या देवाचे वचन सदासर्वकाळ उभे राहते.”
9 Nenda juu ya mlima mrefu, Sayuni, mbeba taarifa njema. waambie miji ya Yuda, ''Hapa ni Mungu wako!''
९सियोनेस, सुवार्ता घेऊन येणारे जाणारे, उंच डोंगरावर चढ; यरूशलेमेस सुवार्ता सांगणाऱ्ये, आपला आवाज जोराने उंच कर. मोठ्याने आरोळी मार; घाबरू नकोस. यहूदातील नगरांना सांग, येथे तुझा देव आहे!
10 Angalia, Bwana Yahwe anakuja kama mpiganaji shujaa na jeshi imara linatawa juu yake. Ona, zawadi yako iko kwake, na wale walikombolewa wataenda mbele yake.
१०पाहा, प्रभू परमेश्वर, विजयी वीरासारखा येत आहे आणि त्याचे बलवान बाहू त्यासाठी सत्ता चालवील. पाहा, त्याचे बक्षीस त्याच्याबरोबर आहे आणि त्याचा मोबदला त्याच्यापुढेच आहे.
11 Atalilisha kundi lake kama mchungaji, Atawakusanya kondoo katika jeshi lake, na kulichukua karibu na moyo wake, kwa upole atawongoza wake kuwauuguza watoto wao.
११मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपास तो चारील, तो कोकरास आपल्या बाहूत एकवटून त्यांना आपल्या उराशी धरून वाहील आणि तान्ह्या पिल्लांना पाजणाऱ्या मेंढ्याना तो जपून नेईल.
12 Ni nani aliyepima maji ya mashimo kwa mkono wake, anayepima anga kwa urefu wa mkono wake, na kuweka vumbi za nchi katika kikapu, kupima milima kwa mizani, au vilima kwa usawa?
१२आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले आहे, आकाशाचे माप आपल्या वतीने, पृथ्वीवरची धूळ पाटीत धरली, डोंगराचे वजन तागडीत किंवा टेकड्या तराजूत तोलल्या आहेत?
13 Ni nani aliyeelewa akili za Yahwe, au kumuelekeza yeye kama mshauri?
१३परमेश्वराचे मन कोणाला समजले आहे किंवा त्याचा सल्लागार म्हणून कोणी सूचना दिल्या आहेत?
14 Ni kutka kwa nani alipokea maelekezo milele? Nani alikufundisha njia sahihi ya kufanya vitu, kumfundisha yeye maarifa, au kumuonyesha njia ya ufahamu?
१४त्याने कोणापासून कधी सूचना स्विकारली? कोणी त्यास योग्य गोष्टी करण्याचा मार्ग शिकवला, आणि त्यास कोणी ज्ञान शिकवले किंवा सुज्ञतेचा मार्ग दाखवला?
15 Tazama, Mataifa ni kama tone katika ndoo, na kama mavumbi kwenye mizani; ona, na alipima kisiwa kama tundu.
१५पाहा, राष्ट्रे बादलीतल्या एका थेंबासमान आहेत आणि तराजूतल्या धुळीच्या कणासारखी मोजली आहे; पाहा तो बेटही धुळीच्या कणासारखे उचलतो.
16 Lebanoni sio mafuta ya kutosha, wala wanyama pori wake hawatoshi kwa dhabihu ya kuteketezwa.
१६लबानोन जळणास पुरेसा नाही, किंवा त्यातले वनपशू होमार्पणासाठी पुरेसे नाहीत.
17 Mataifa yote hayatochelezi mbele yake; wanachukuliwa na yeye kama hakuna kitu.
१७त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे अपुरे आहेत; त्याच्या दृष्टीने ती काही नसल्यासारखीच आहेत.
18 Ni nanibasi utayemlingalisha na Mungu? Ni kwa sanamu ipi utakayomfananisha nayo?
१८तर मग तुम्ही देवाची तुलना कशाशी कराल? तर त्याची तुलना कोणत्या प्रतिमेशी करणार?
19 Sanamu! ambayo fundi ameitupa: Mfua dhahabu ameka pamoja na mikufu bandi ya fedha.
१९मूर्ती! कारागीराने ओतून केली आहेः सोनार तिला सोन्याने मढवतो आणि तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या ओततो.
20 Kuafanya sadaka hii mtu atachagua kuni ambayo haiozi; anamtafuta fundi mwenye ujuzi wa kutengeneza sanamu ambayo haitaanguka.
२०जो अर्पण देण्यास असमर्थ असा गरीब तो न कुजणारे लाकूड निवडतो; न पडणारी मूर्ती बनविण्यासाठी तो निपूण कारागीर शोधतो.
21 Je hamkujua? Je hamjasikia? Je hamkuambiwa tokea mwanzo? Je hamkuelewa toka misingi ya nchi?
२१तुम्हास माहीत नाही काय? तुम्ही ऐकले नाही काय? तुम्हास सुरवातीपासून सांगितले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हास समजले नाही काय?
22 Yeye ndiye aketie juu ya upeo wa macho ya nchi? na wenyeji wake ni kama panzi mbele yake. Akijinyoosha nje ya mbingu ni kama pazia na kutawnya nje kama hema la kuishi.
२२जो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर बसतो तो हाच आहे आणि त्याच्यापुढे रहिवासी टोळासारखे आहेत. तो आकाश पडद्याप्रमाणे ताणतो आणि त्यामध्ये राहण्यासाठी तंबूप्रमाणे पसरतो.
23 Anawapunguza viongozi kuwa si kitu na amewafanya viongozi wa nchi kwa sio wenye umuhimu.
२३तो अधिपतींना काहीही नसल्यासारखे कमी करतो आणि पृथ्वीच्या अधिपतींना अर्थशून्य करतो.
24 Tazama wamekuwa wagumu kuotesha; tazama wamekuwa wagumu kupanda; imekuwa ni vigumu kuchukua mzizi katika nchi, kabla ajapuliza juu yao, na wakanyauka, na upepo unawaondosha mbali kama majani.
२४पाहा, ते केवळ लावले आहेत; पाहा, ते केवळ पेरले आहेत; पाहा त्यांनी केवळ भूमीत मूळ धरले आहे, तो त्यांच्यापुढे त्यावर फुंकर घालतो आणि ते सुकून जातात व वादळ त्यांना धसकटासारखे उडवून नेते.
25 Ni nani tena utakayemfananisha na mimi, ni nani ninayefanan nae?'' amesema mtakatifu.
२५“तर तुम्ही माझी तुलना कोणाशी कराल? माझ्यासारखा कोण आहे? असे तो पवित्र प्रभू म्हणतो.
26 Tazama juu kwenye anga! Nani aliyeziumba nyota hizi zote? Analileta nje jeshi na anawaita kwa majina yote. Kwa ukuu wa nguvu zake na kwa uimara wa nguvu zake, hakuna hata mmoja atakayekosa.
२६आकाशाकडे वर पाहा! हे सर्व तारे कोणी निर्माण केले आहेत? तो त्याच्या निर्मीतीचे मार्गदर्शन करून बाहेर नेतो आणि त्या सर्वांना नावाने बोलावतो. त्याच्या सामर्थ्याच्या महानतेमुळे आणि प्रबळ सत्ताधीश आहे म्हणून, त्यातला एकही उणा नाही.
27 Kwa nini unasema, Yakobo, na kutangaza, Israeli, ''Njia yangu imefichwa Yahwe asione, na Mungu wangu hakuwekwa wazi kuhusiana na uthibitisho wangu''?
२७हे याकोबा, तू असे का म्हणतोस, आणि इस्राएलास जाहीर करतोस, माझे मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहेत आणि माझा देव माझ्या समर्थनाविषयी लक्ष देत नाही?
28 Je hakufahamu? Mungu wa milele, Yahwe, Muumbaji wa miisho ya nchi, apatwi na uchovu wala hachoki; hakuna mipaka katika ufahamu wake.
२८तुला माहीत नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, पृथ्वीच्या सीमा निर्माण करणारा, थकत किंवा दमत नाही; त्याच्या बुद्धीला मर्यादा नाही.
29 Anawapa nguvu waliochoka; na atawapa nguvu mpya waliowadhaifu.
२९तो थकलेल्यांना शक्ती देतो; आणि निर्बलांस नवचैतन्य देऊन ताकद देतो.
30 Hata vijana wadogo watapatwa na uchovu na kuchoka, vijana wadogo watapata mashaka na kuanguka:
३०तरुण लोकही थकतात आणि दमतात, आणि तरुण माणसे अडखळतात आणि पडतात.
31 Lakini wale watakao mngojea Yahwe watapewa nguvu mpya; na watapaa kwa mbawa kama malaika; watakimbia wala hawatachoka; watatembea wala hawatazimia.
३१पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी गळून जाणार नाहीत.