< Kutoka 7 >
1 Yahweh akasema na Musa, “Ona, nimekufanya kama mungu kwa Farao. Aruni kaka yako atakuwa nabii wako.
१परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी तुला फारोच्या नजरेत देवासमान महान करतो; आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल;
2 Utasema kila kitu nitacho kuamuru kusema. Aruni kaka yako ata sema na Farao iliawaachie watu wa Israeli watoke kwenye nchi yake.
२ज्या आज्ञा मी तुला करीन त्या सर्व तू अहरोनाला सांग; मग तू इस्राएल लोकांस हा देश सोडून जाऊ दे, असे तू फारोला सांग.
3 Lakini nitaufanya moyo wa Farao mgumu, na nitaonyesha ishara nyingi za nguvu zangu, maajabu mengi, katika nchi ya Misri.
३परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसर देशामध्ये आपल्या सामर्थ्याची अनेक चिन्हे व अनेक आश्चर्ये दाखवीन.
4 Lakini Farao hata kusikiliza, kwahiyo nitaueka mkono wangu juu ya Misri na kutoa makundi yangu ya wanaume wapiganaji, watu wangu, wazao wa Israeli, watoke nchi ya Misri kwa matendo makubwa ya hukumu.
४तरीही फारो तुमचे काही ऐकणार नाही. तेव्हा मग मी आपला हात मिसरावर चालवीन आणि त्यास जबर शिक्षा करून मी आपली सेना, माझे लोक, इस्राएल वंशज यांना मिसर देशातून काढून आणीन.
5 Wamisri watajua kuwa mimi ni Yahweh nitapo nyoosha mkono wangu kwa Misri na kuwatoa Waisraeli kutoka miongoni mwao.”
५आणि मिसरावर मी हात उगारून त्यांच्यातून इस्राएली लोकांस काढून आणीन, तेव्हा मिसऱ्यांना कळेल की मी परमेश्वर आहे.”
6 Musa na Aruni wakafanya hivyo; walifanya kama Yahweh alivyo waamuru.
६मग मोशे व अहरोन यांनी तसे केले. परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले.
7 Musa alikuwa na miaka themanini, na Aruni miaka themanini na tatu walipo ongea na Farao.
७ते फारोबरोबर बोलले तेव्हा मोशे ऐंशी वर्षांचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षांचा होता.
8 Yahweh akamwambia Musa na Aruni,
८नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला,
9 “Wakati Farao atakapo waambia, 'Fanya muujiza,' utamwambia Aruni, 'Chukuwa gongo lako na ulirushe chini mbele ya Farao, ililigeuke nyoka.”'
९“फारो तुम्हास एखादा चमत्कार दाखविण्याविषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी फारोच्या देखत जमिनीवर टाकावयास सांग म्हणजे तिचा साप होईल.”
10 Kisha Musa na Aruni wakaenda kwa Farao, na wakafanya kama Yahweh alivyo waamuru. Aruni akarusha chini gongo lake mbele ya Farao na watumishi wake, na likageuka nyoka.
१०तेव्हा मोशे व अहरोन फारोकडे गेले आणि परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्यापुढे टाकली आणि त्या काठीचा साप झाला.
11 Kisha naye Farao akawaita wazee wenye hekima na wachawi. Wakafanya jambo hilo hilo kwa uchawi wao.
११तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसाच प्रकार केला.
12 Kila mtu akarusha chini gongo lake, na magongo yakawa nyoka. Lakini gongo la Aruni lilimeza nyoka zao.
१२त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले, परंतु अहरोनाच्या काठीने त्यांचे साप गिळून टाकले.
13 Moyo wa Farao ulikuwa mgumu, na akusikiliza, kama Yahweh alivyo tabiri.
१३तरी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोचे मन कठोर झाले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही व इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही.
14 Yahweh akasema na Musa, “Moyo wa Farao ni mgumu, na anakataa kuacha watu waende.
१४मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोचे मन कठीण झाले आहे; तो इस्राएल लोकांस जाऊ देत नाही.
15 Nenda kwa Farao asubui anapoenda kwenye maji. Simama kwenye chanzo cha mto kukutana naye, na uchukuwe mkononi mwako gongo ambalo liligeuka nyoka.
१५उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नदीच्या काठी त्यास भेटण्यास उभा राहा.
16 Mwambie, 'Yahweh, Mungu wa Waebrania, amenituma kwako, “Acha watu wangu waende, iliwaniabudu nyikani. Mpaka sasa haujanisikiliza.”
१६त्यास असे सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर याने मला तुझ्याकडे पाठवले आहे व त्याच्या लोकांस त्याची उपासना करावयास रानात जाऊ दे, पण आतापर्यंत तू ऐकले नाहीस.
17 Yahweh anasema hili: “Kwa hili utajua kuwa mimi ni Yahweh. Ninaenda kupiga maji ya mto wa Misri kwa gongo langu lililo mikono mwangu, na mto utageuzwa kuwa damu.
१७परमेश्वर म्हणतो, की मी परमेश्वर आहे हे त्यास यावरुन कळेल: मी नदीच्या पाण्यावर माझ्या हातातील काठीने मारीन तेव्हा त्याचे रक्त होईल.
18 Samaki walio kwenye mto watakufa, na mto utanuka. Wa Misri Hawataweza kunywa maji yalio kwenye mto.”'''
१८मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.
19 Kisha Yahweh akasema na Musa, “Mwambie Aruni, 'Chukuwa gongo lako na unyooshe mkono kwenye maji ya Misri, na juu ya mito yake, mifereji, visima, na madimbwi yote, ili maji yao ya damu. Fanya hivi ilikuwe na damu nchi nzima ya Misri, hadi kwenye vyombo vyote vya mbao na mawe.”'
१९परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अहरोनाला सांग की, आपली काठी घेऊन मिसर देशामधील नद्यांवर, नाल्यावर, त्यांच्या तलावावर व त्यांच्या सर्व पाण्याच्या तळ्यावर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात रक्तच रक्त होईल.”
20 Musa na Aruni walifanya kama Yahweh alivyo waamuru. Aruni alinyanyua gongo na kupiga maji ya mto, machoni pa Farao na watumishi wake. Maji yote kwenye mto yaligeuga damu.
२०तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उचलून फारोच्या व त्याच्या अधिकाऱ्यासमोर पाण्यावर मारली. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले.
21 Samaki kwenye mto wakafa, na mto ukaanza kunuka. Wamisri hawakuweza kunywa maji kwenye mto, na damu ilikuwa kila mahali katika nchii ya Misri.
२१नदीतले मासे मरण पावले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसरी लोकांस नदीतील पाणी पिववेना. अवघ्या मिसर देशात रक्तच रक्त झाले.
22 Lakini wachawi walifanya vivyo hivyo na uchawi wao. Kwaiyo moyo wa Farao ukawa mgumu, na akakataa kuwasikiliza Musa na Aruni, kama Yahweh alivyo sema itatokea.
२२तेव्हा मिसराच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले. तेव्हा परमेश्वराने संगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले.
23 Kisha Farao akarudi na kwenda nyumbani kwake. Wala hakutilia maanani hili.
२३नंतर फारो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला. त्याने याकडे लक्ष देखील दिले नाही.
24 Wamisri wote walichimba pembeni ya mto kwa ajili ya maji ya kunywa, lakini hawakuweza kunywa maji ya mto.
२४मिसराच्या लोकांस नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले.
25 Siku saba zilipita baada ya Yahweh kushambulia mto.
२५परमेश्वराने नदीला दिलेल्या तडाख्याला सात दिवस होऊन गेले.