< Kutoka 17 >

1 Jamii yote ya Israeli ili safiri kutoka nyikani ya Sinu, wakifuata maelekezo ya Yahweh. Walieka kambi Refidimu, lakini hapakuwa na maji ya watu kunywa.
सर्व इस्राएल लोकांचा समुदाय सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेला, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदिम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी मिळेना.
2 Hivyo watu wakamlaumu Musa kwa hali yao na kusema, “Tupe maji ya kunywa.” Musa akasema, “Kwanini mnagombana na mimi? Kwanini mnajaribu Yahweh?”
तेव्हा इस्राएल लोक मोशेविरूद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हांला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही मजशी का भांडता? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहत आहात?”
3 Watu walikuwa na kiu sana, na waka mlalamikia Musa. Wakasema, “Kwanini umetutoa Misri? Ili utuue sisi na watoto wetu na mifugo yetu kwa kiu?”
परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हांला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुले, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हांला तू येथे आणलेस काय?”
4 Kisha Musa akamlilia Yahweh, “Nini ni fanya kwa hawa watu? Wako tayari ata kunipiga mawe.”
तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी या लोकांस काय करू? ते तर मला दगडमार करावयास उठले आहेत.”
5 Yahweh akamwambia Musa, “Nenda mbele yao, na uchukuwe baadhi ya wazee wa Israeli. Chukuwa gongo ulilo piga nalo mto, na uende.
परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडील माणसे तुजबरोबर घे. नील नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल.
6 Nitasimama mbele yako pale kwenye mwamba wa Horebu, na utaupiga mwamba. Maji yatatoka ya watu kunywa.” Kisha Musa akafanya hivyo mbele ya wazee wa Israeli.
पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन, त्या खडकावर ती काठी आपट, त्यातून पाणी निघेल. म्हणजे ते हे लोक पितील,” मोशेने हे सर्व इस्राएलांच्या वडिलासमोर केले.
7 Aliita ile sehemu Massa na Meriba kwasababu ya malalamishi ya Waisraeli, na kwasababu walimjaribu Bwana kwa kusema, “Je Yahweh yupo miongoni mwetu au hapana?”
मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा व मरीबा ठेवले; कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी तेथे कलह केला आणि “परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही” असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली.
8 Kisha jeshi la watu wa Ameleki wakaja na kushambulia Israeli huko Refidimu.
रफीदिम येथे अमालेकी लोक इस्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली.
9 Hivyo Musa akamwambia Yoshua, “Chagau wanaume kadha na uende nje. Pigana na Ameleki. Kesho nitasimama juu ya kilima na gongo la Mungu mkononi mwangu.”
तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांस निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात घेऊन मी डोंगराच्या माथ्यावर उभा राहीन.”
10 Hivyo Yoshua akapigana na Ameleki kama Musa alivyo elekeza, wakati Musa, Aruni, na Huri walienda juu ya kilima.
१०यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरूद्ध लढावयास गेला, त्या वेळी मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले.
11 Wakati Musa alipo kuwa ameshikilia mikono yake juu, Israeli ilikuwa yashinda; alipo acha mikono yake ipumzike, Ameleki alianza kushinda.
११जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा अमालेकी लोकांची सरशी होई.
12 Mikono ya Musa alipo kuwa mizito, Aruni na Huri walichukuwa jiwe na kuweka chini yake alikalie. Muda huo huo, Aruni na Huri walinyanyua mikono yake juu, mtu mmoja upande mmoja, na mtu mmoja upande mwingine. Hivyo mikono ya Musa ilishikiliwa tuli mpaka jua lilipo zama.
१२काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर स्थिर धरून ठेवले.
13 Hivyo Yoshua akawashinda watu wa Ameleki kwa upanga.
१३तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकी लोकांचा पराभव केला.
14 Yahweh akamwambia Musa, “Andika haya kwenye kitabu na umsomee Yoshua, kwasababu nitaondoa kumbukumbu ya Ameleki kutoka chini ya mbingu.”
१४नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “लढाई विषयीच्या या सर्व गोष्टी एका ग्रंथात लिहून ठेव आणि यहोशवाला सांग. कारण मी अमालेकी लोकांस पृथ्वीतलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन.”
15 Kisha Musa akajenga madhabahu na kuiita “Yahweh ni bendera yangu.”
१५मग मोशेने तेथे एक वेदी बांधून तिला “परमेश्वर माझा झेंडा” असे नाव दिले.
16 Alisema, “Kwa kuwa mkono ulinyanyuliwa juu kuelekea kiti cha enzi cha Yahweh - kwamba Yahweh ata fanya vita na Ameleki vizazi na vizazi.”
१६आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासनावर अमालेकी लोकांनी हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यानपिढ्या युध्द होईल.”

< Kutoka 17 >