< Amosi 2 >

1 Hivi ndivyo Yahwe asemavyo: “Kwa dhambi tatu za Moabu, hata kwa nne, sintobadilisha adhabu, kwa sababu amechoma moto mifupa ya mfalme wa Edomu hadi kuwa chokaa.
परमेश्वर असे म्हणतो, “मवाबाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी अदोमाच्या राजाची हाडे जाळून त्यांचा चुना केला.
2 Nitatuma moto juu ya Moabu, na utaangamiza ngome za Keriothi. Moabu atakufa katika gasia, pamoja na kelele na sauti ya tarumbeta.
म्हणून मी मवाबावर अग्नी पाठवीन, आणि तो करोयोथचे किल्ले खाऊन टाकील. आणि मवाब गोंधळात, आरडाओरड करत आणि रणशिंगाचा आवाज होत असता मरेल.
3 Nitamuharibu mwamuzi kati yake, na nitawaua wana wa mfalme pamoja na yeye,” asema Yahwe.
मी तिच्यातील न्यायकरणाऱ्यांना नष्ट करीन, आणि त्याच्यातील सरदारांनाही त्याच्याबरोबर मारून टाकीन.” असे परमेश्वर म्हणतो.
4 Hivi ndivyo Yahwe asemavyo: “Kwa dhambi tatu za Yuda, hata kwa nne, sintobadilisha adhabu, kwa sababu wameikataa sheria ya Yahwe na hawakuzishika amri zake. Uongo wao umesababisha kupotea, ambao baba zao pia waliufuata.
परमेश्वर म्हणतो, “यहूदाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र नकारले आहे, आणि त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांची लबाडी त्यांच्या पापाला कारणीभूत ठरली अशाच प्रकारे त्यांचे पुर्वजसुद्धा वागत होते.
5 Nitatuma moto juu ya Yuda, na utaimeza ngome ya Yerusalemu.”
म्हणून मी यहूदात आग लावीन. त्या आगीत यरूशलेमचे उंच मनोरे भस्मसात होतील.”
6 Hivi ndivyo Yahwe asemavyo: “Kwa dhambi tatu za Israeli, hata kwa nne, sintobadilisha adhabu, kwa sababu wamewauza wasio na hatia kwa fedha na maskini kwa jozi moja ya makubadhi.
परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएलच्या तिन्ही अपराधांमुळे, तर अगदी चारहींमुळे, मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी चांदीसाठी निरपराध आणि पायातील वाहाणांच्या एका जोड्यासाठी गरिबास विकले आहे.
7 Nao hukanyaga juu ya vichwa vya maskini kama kukanyaga kwenye mavumbi juu ya aridhi; wanasukuma kukandamiza. Mtu mmoja na baba yake walilala na msichana mmoja na hivyo kukufuru jina langu takatifu.
जसे लोक माती पायाखाली तुडवतात तसेच ते गरीबांची मस्तके मातीत तुडवतात; आणि मुलांनी व त्यांच्या वडीलांनी एकाच स्त्रीशी संबंध ठेवले, अशासाठी की माझे नाव धुळीस मिळावे.
8 Nao hulala chini karibu na kila madhabahu kwenye nguo zilizowekwa dhamana, na katika nyumba ya Mungu wao hunywa divai ya wale ambao walitozwa faini.
आणि ते प्रत्येक वेदीजवळ गहाण घेतलेल्या कपड्यांवर पडतात, आणि आपल्या दैवतांच्या मंदिरात ज्याच्याकडून दंड घेतला त्यांचा द्राक्षरस पितात.
9 Bado nimemwangamiza Mwamori mbele yao, ambaye urefu wake ulikuwa kama urefu wa mierezi; alikuwa na nguvu kama mialoni. Kisha nikaharibu matunda yake juu na mizizi yake chini.
मी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोऱ्यांचा नाश केला, ज्यांची उंची गंधसरूप्रमाणे उंच होती; ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते. परंतु मी त्यांच्यावरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.
10 Pia, niliwapandisha kutoka nchi ya Misri na kuwaongoza miaka arobaini nyikani ili mmiliki nchi ya Wamori.
१०तुम्हास मिसरमधून आणणारा मीच आणि चाळीस वर्षे मीच तुम्हास वाळवंटातून पार नेले ह्यासाठी की अमोरींचा प्रदेश तुम्ही काबीज करावा.
11 Nimewainua manabii kutoka miongoni mwa watoto wanu wawe Wanadhiri kutoka vijana wenu. Je sio hivyo, watu wa Israeli? -hivi ndivyo Yahwe asemavyo.
११मी तुमच्यापैकी काही मुलांना संदेष्टे होण्यासाठी आणि तुमच्यातील काही तरुणांना नाजीर होण्यास वाढवले, इस्राएल लोकांनो, हे असे नाही काय?” असे परमेश्वरा म्हणतो.
12 Lakini mmewashawishi Wanadhiri kunywa mvinyo na kuwaamuru manabii wasifanye unabii.
१२“पण तुम्ही नाजीरांचे मन वळवून त्यांना मद्य प्यायला लावले, आणि संदेष्ट्यांना भविष्य सांगण्यास मनाई केली.
13 Tazama, nitawakanyaga kama mkokoteni uliojaa miganda inayoweza kumkanyaga mtu.
१३पाहा, जसा पेंढ्यांनी भरलेली गाडी एखाद्याला दाबून टाकेल, त्याच प्रकाराने मी तुम्हास दाबून टाकीन.
14 Mtu akimbiaye hatapata kimbilio; mwenye nguvu hatoongeza nguvu zake mwenyewe; wala shujaa kujiokoa mwenyewe.
१४चपळ व्यक्ती सुटणार नाही; बलवान आहे त्यास आपली शक्ती लावता यायची नाही, आणि वीराला स्वत: चा जीव वाचवता येणार नाही.
15 Apindaye upinde hatasimama; mkimbiaji sana hatakimbia; mwendesha farasi hatajiokoa mwenyewe.
१५धनुर्धाऱ्याला उभे राहता येणार नाही. आणि जोरात धावणारे सुटणार नाही; घोडेस्वार आपला जीव वाचवणार नाही.
16 Hata wapiganaji shujaa watakimbia uchi katika siku hiyo -hivi ndivyo Yahwe asemavy.”
१६वीरांमध्ये जो धैर्यवान तो त्या दिवशी नागवा होऊन पळून जाईल” असे परमेश्वर म्हणतो.

< Amosi 2 >