< 1 Timotheo 2 >
1 Kwa hiyo awali ya yote, nahitaji maombi, na dua, na maombezi, na shukrani vifanyike kwa ajili ya watu wote,
१तर सर्वांत प्रथम मी हा बोध करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या.
2 kwa ajili ya wafalme na wote ambao wako kwenye mamlaka, ili kwamba tuweze kuishi maisha ya amani na utulivu katika utauwa wote na heshima.
२आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्या सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे.
3 Hili ni jema na lenye kukubalika mbele za Mungu Mwokozi wetu.
३कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,
4 Yeye hutamani kuwa watu wote waokolewe na wapate kuijua kweli.
४त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे.
5 Kwa kuwa kuna Mungu mmoja, na kuna mpatanishi mmoja kati ya Mungu na mwanadamu ambaye ni Kristo Yesu.
५कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.
6 Alijitoa mwenyewe kama fidia kwa wote, kama ushuhuda kwa wakati muafaka.
६त्याने सर्वांच्या खंडणीकरिता स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्यवेळी देणे आहे.
7 Kwa sababu hii, mimi mwenyewe nilifanywa kuwa mjumbe wa injili na mtume. Nasema kweli. Sisemi uongo. Mimi ni mwalimu watu Mataifa katika imani na kweli.
७आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित मी खरे सांगतो; खोटे सांगत नाही, असा परराष्ट्रीय लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.
8 Kwa hiyo, nataka wanaume kila mahali waombe na kuinua mikono mitakatifu bila ghadhabu na mashaka.
८म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व भांडण सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी.
9 Vivyo hivyo, nataka wanawake wajivike mavazi yanayokubalika, kwa heshima na kujizuia. Wasiwe na nywele zilizosukwa, au dhahabu, au Lulu, au mavazi ya gharama kubwa.
९त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे.
10 Pia nataka wavae mavazi yanayowastahili wanawake wanaokiri uchaji kwa kupitia matendo mema.
१०तसेच देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे.
11 Mwanamke na ajifunze katika hali ya utulivu na kwa utii wote.
११स्त्रीने शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे.
12 Simruhusu mwanamke kufundisha, au kuwa na mamlaka juu ya mwanaume bali aishi katika hali ya ukimya.
१२मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत रहावे.
13 Kwa kuwa Adamu aliumbwa kwanza, kisha Eva.
१३कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला त्यानंतर हव्वा.
14 Adamu hakudanganywa, lakini mwanamke alidanganywa kabisa katika uasi.
१४आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली.
15 Hata hivyo, ataokolewa kwa kupitia kuzaa watoto, kama wataendelea katika imani na upendo na katika utakaso na akili njema.
१५तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.