< Zaburi 106 >
1 Msifuni Bwana. Mshukuruni Bwana, kwa kuwa ni mwema; upendo wake wadumu milele.
१परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्यास धन्यवाद द्या. कारण त्याची कराराची विश्वसनीयता सर्वकाळ टिकून राहते.
2 Ni nani awezaye kusimulia matendo makuu ya Bwana au kutangaza kikamilifu sifa zake?
२परमेश्वराच्या पराक्रमाची कृत्ये कोण कथन करू शकेल? किंवा त्याची सर्व स्तुत्य कृत्ये कोण पूर्ण जाहीर करील?
3 Heri wale wanaodumisha haki, ambao daima wanafanya yaliyo mema.
३जे काही योग्य आहे ते करतात आणि ज्याची कृत्ये न्याय्य आहेत ते आशीर्वादित आहेत.
4 Ee Bwana, unikumbuke unapowatendea mema watu wako, uwe msaada wangu unapowaokoa,
४हे परमेश्वरा, तू जेव्हा आपल्या लोकांवर कृपा दाखवतोस तेव्हा माझी आठवण कर; तू त्यांना जेव्हा तारशील मला मदत कर.
5 ili niweze kufurahia mafanikio ya wateule wako, niweze kushiriki katika furaha ya taifa lako, na kuungana na urithi wako katika kukusifu.
५मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा, तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन, आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन.
6 Tumetenda dhambi, kama vile baba zetu walivyotenda, tumekosa na tumetenda uovu.
६आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले; आम्ही चूक केली आणि आम्ही दुष्कृत्ये केली.
7 Wakati baba zetu walipokuwa Misri, hawakuzingatia maajabu yako, wala hawakukumbuka wingi wa fadhili zako, bali waliasi kando ya bahari, Bahari ya Shamu.
७आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही; त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले; तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली.
8 Hata hivyo aliwaokoa kwa ajili ya jina lake, ili apate kudhihirisha uweza wake mkuu.
८तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले, यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे.
9 Alikemea Bahari ya Shamu, nayo ikakauka, akawaongoza katika vilindi vyake kama vile jangwani.
९त्याने लाल समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला. मग त्याने त्यांना मैदानातून चालावे तसे खोल पाण्याच्या जागेतून नेले.
10 Aliwaokoa mikononi mwa adui; kutoka mikononi mwa adui aliwakomboa.
१०त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातातून त्याने त्यास वाचवले, आणि त्यांना त्यांच्या शत्रूंच्या शक्तीपासून सोडवले.
11 Maji yaliwafunika adui zao, hakunusurika hata mmoja.
११परंतु त्यांच्या शत्रूंना पाण्याने झाकून टाकले. त्यापैकी एकही जण वाचला नाही.
12 Ndipo walipoamini ahadi zake, nao wakaimba sifa zake.
१२नंतर त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याची स्तुती गाइली.
13 Lakini mara walisahau aliyowatendea, wala hawakungojea shauri lake.
१३परंतु ते लवकरच त्याने जे केले ते विसरले; त्यांनी त्याच्या सूचनेची वाट पाहिली नाही.
14 Jangwani walitawaliwa na tamaa zao, walimjaribu Mungu nyikani.
१४रानात त्यांची अतृप्त हाव अनावर झाली, आणि त्यांनी देवाला आव्हान दिले.
15 Kwa hiyo aliwapa kile walichoomba, lakini akatuma juu yao ugonjwa wa kudhoofisha.
१५त्याने त्यांना त्यांच्या विनंतीप्रमाणे दिले, पण त्याने रोग पाठवला तो त्यांचे शरीर नष्ट करू लागला.
16 Kambini walimwonea wivu Mose, na pia Aroni aliyekuwa amewekwa wakfu kwa Bwana.
१६त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र याजक अहरोन यास चिडीस आणले.
17 Ardhi ilifunguka ikawameza Dathani, ikawazika Abiramu na kundi lake.
१७जमीन दुभंगली आणि तिने दाथानाला गिळून टाकले, आणि अबीरामाच्या अनुयांना झाकून टाकले.
18 Moto uliwaka katikati ya wafuasi wao, mwali wa moto uliwateketeza waovu.
१८त्यांच्यात अग्नीने पेट घेतला; अग्नीने त्या दुष्टांना खाऊन टाकले.
19 Huko Horebu walitengeneza ndama, na kuabudu sanamu ya kusubu kwa chuma.
१९त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले. आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली.
20 Waliubadilisha Utukufu wao kwa sanamu ya fahali, ambaye hula majani.
२०त्यांनी गवत खाणाऱ्या बैलाच्या मूर्तीसाठी आपल्या वैभवी देवाची अदलाबदल केली.
21 Walimsahau Mungu aliyewaokoa, aliyekuwa ametenda mambo makuu huko Misri,
२१ते आपल्या तारणाऱ्या देवाला विसरले, ज्याने मिसरात महान कृत्ये केली होती.
22 miujiza katika nchi ya Hamu na mambo ya kutisha huko Bahari ya Shamu.
२२त्याने हामाच्या देशात आश्चर्यकारक गोष्टी केल्या आणि लाल समुद्राजवळ पराक्रमी कृत्ये केली.
23 Kwa hiyo alisema kwamba angewaangamiza: kama Mose mteule wake, asingesimama kati yao na Mungu kuizuia ghadhabu yake kuwaangamiza.
२३म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू. जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला, त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते.
24 Kisha waliidharau ile nchi nzuri, hawakuiamini ahadi yake.
२४नंतर त्यानीं फलदायी देश तुच्छ मानला; त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही,
25 Walinungʼunika ndani ya mahema yao, wala hawakumtii Bwana.
२५पण आपल्या तंबूत त्यांनी कुरकुर केली, आणि परमेश्वराचा शब्द मानिला नाही.
26 Kwa hiyo akaapa kwa mkono ulioinuliwa kwamba atawafanya waanguke jangwani,
२६म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात मरू देईन.
27 kuwatawanya wazao wao waanguke miongoni mwa mataifa, na kuwatawanya katika nchi zote.
२७त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन, आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.
28 Walijifunga nira na Baali wa Peori, wakala dhabihu zilizotolewa kwa miungu isiyo na uhai.
२८त्यांनी बआल-पौराची पूजा केली, आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले.
29 Waliichochea hasira ya Bwana, wakamkasirisha kwa matendo yao maovu, nayo tauni ikazuka katikati yao.
२९त्यांनी त्यांच्या कृतीने त्यास कोपविले, आणि त्यांच्यात मरी पसरली.
30 Lakini Finehasi alisimama na kuingilia kati, nayo tauni ikazuiliwa.
३०पण फिनहास मध्यस्थी उठला; आणि मरी बंद झाली.
31 Hili likahesabiwa kwake haki, kwa vizazi visivyo na mwisho vijavyo.
३१हे त्यास नितीमत्व असे सर्व पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले.
32 Kwenye maji ya Meriba, walimkasirisha Bwana, janga likampata Mose kwa sababu yao;
३२त्यांनी मरीबा येथील जलाजवळही त्यास संताप आणला, आणि त्यांमुळे मोशेला दुःख सोसावे लागले.
33 kwa maana walimwasi Roho wa Mungu, na maneno yasiyofaa yakatoka midomoni kwa Mose.
३३त्यांनी त्याच्यात कडवटपणा आणला, आणि तो अविचाराने बोलला.
34 Hawakuyaangamiza yale mataifa kama Bwana alivyowaagiza,
३४परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रांचा नाश केला नाही.
35 bali walijichanganya na mataifa na wakazikubali desturi zao.
३५पण ते अन्यजाती लोकांच्या राष्ट्रात मिसळले, व त्यांचे मार्ग शिकले.
36 Waliabudu sanamu zao, zikawa mtego kwao.
३६आणि त्यांच्या मूर्तींची पूजा केली, ते त्यांच्यासाठी सापळा बनले.
37 Wakawatoa wana wao na binti zao dhabihu kwa mashetani.
३७त्यांनी आपली मुले आणि मुली यांचा भुतांना यज्ञ केला.
38 Walimwaga damu isiyo na hatia, damu za wana wao na binti zao, ambao waliwatoa dhabihu kwa sanamu za Kanaani, nayo nchi ikanajisika kwa damu zao.
३८त्यांनी निरपराध्यांचे रक्त पाडले, त्यांनी आपली मुले आणि मुली, ज्यांचा यज्ञ त्यांनी कनानाच्या मूर्तीस केला, त्यांचे रक्त पाडले आणि भूमी रक्ताने विटाळली गेली.
39 Wakajinajisi wenyewe kwa yale waliyotenda; kwa matendo yao wenyewe wakajifanyia ukahaba.
३९ते आपल्या कृत्यांनी अशुद्ध झाले, आणि आपल्या कृतींत अनाचारी बनले.
40 Kwa hiyo Bwana akawakasirikia watu wake na akauchukia sana urithi wake.
४०त्यामुळे परमेश्वर त्याच्या लोकांवर रागावला, त्यास आपल्या स्वतःच्या वतनाचा वीट आला.
41 Akawakabidhi kwa mataifa na adui zao wakawatawala.
४१त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले, आणि ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांनी त्यांच्यावर राज्य केले.
42 Adui zao wakawaonea na kuwatia chini ya mamlaka yao.
४२त्यांच्या शत्रूंनी त्यांना पीडीले, आणि ते त्यांच्या अधिकाराखाली ते अधीन झाले.
43 Mara nyingi aliwaokoa lakini walikuwa wamezama kwenye uasi, nao wakajiharibu katika dhambi zao.
४३अनेक वेळा तो त्यांना मदत करण्यास आला, पण ते त्याच्याविरुध्द बंड करीत राहीले, आणि ते आपल्या पापाने नीच करण्यात आले.
44 Lakini akaangalia mateso yao wakati aliposikia kilio chao;
४४तथापि त्याने त्यांची मदतीसाठीची आरोळी ऐकली, तेव्हा त्याने त्यांच्या क्लेशाकडे लक्ष दिले.
45 kwa ajili yao akakumbuka agano lake, na kutokana na upendo wake mkuu akapooza hasira yake.
४५त्यांच्यासाठी त्याने आपल्या कराराची आठवण केली, आणि आपल्या अपार दयेने सौम्यता धारण केली.
46 Akawafanya wahurumiwe na wote waliowashikilia mateka.
४६त्याने त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात त्यांच्यावर दया येईल असे केले.
47 Ee Bwana Mungu wetu, tuokoe. Tukusanye tena kutoka kwa mataifa, ili tuweze kulishukuru jina lako takatifu, na kushangilia katika sifa zako.
४७हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास तार. आम्हास राष्ट्रातून काढून एकत्र गोळा कर; म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करू.
48 Atukuzwe Bwana, Mungu wa Israeli, tangu milele na hata milele. Watu wote na waseme, “Amen!” Msifuni Bwana.
४८इस्राएलाचा देव, माझा परमेश्वर, ह्याचा अनादिकालापासून अनंतकालापर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोकांनी म्हणावे, “आमेन.” परमेश्वराची स्तुती करा.