< Mithali 7 >

1 Mwanangu, shika maneno yangu na kuzihifadhi amri zangu ndani yako.
माझ्या मुला, माझे शब्द जपून ठेव, आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव.
2 Shika amri zangu nawe utaishi; linda mafundisho yangu kama mboni ya jicho lako.
माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत रहा, आणि माझे शिक्षण डोळ्यातील बाहुलीप्रमाणे जप.
3 Yafunge katika vidole vyako; yaandike katika kibao cha moyo wako.
ती आपल्या बोटांस बांध; ती आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.
4 Mwambie hekima, “Wewe ni dada yangu,” uite ufahamu jamaa yako;
“तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण, आणि सुज्ञतेला आपले नातेवाईक म्हण,
5 watakuepusha na mwanamke mzinzi, kutokana na mwanamke mpotovu na maneno yake ya kubembeleza.
अशासाठी की, भुरळ घालणाऱ्या स्त्रीपासून, ते तुला व्यभिचारी स्त्रीच्या गोड शब्दांपासून वाचवतील.
6 Kwenye dirisha la nyumba yangu nilitazama nje kupitia upenyo kwenye mwimo wa dirisha.
माझ्या घराच्या खिडकीजवळील जाळ्यातून मी बाहेर पाहिले;
7 Niliona miongoni mwa wajinga, nikagundua miongoni mwa wanaume vijana, kijana asiye na akili.
आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, जो बुद्धिहीन मनुष्य होता.
8 Alikuwa akishuka njiani karibu na pembe ya kwake, akielekea kwenye nyumba ya huyo mwanamke
तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, आणि तो तिच्या घराकडे,
9 wakati wa machweo, jua likipungua nuru yake, giza la usiku lilipokuwa likiingia.
त्या दिवशी संध्याकाळी संधीप्रकाशात, रात्रीच्यावेळी आणि अंधकारात गेला.
10 Ndipo huyo mwanamke akatoka kumlaki, hali amevaa kama kahaba akiwa na nia ya udanganyifu.
१०आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते.
11 (Ni mwanamke mwenye makelele na mkaidi, miguu yake haitulii nyumbani;
११ती वाचाळ व स्वच्छंदी असून, तिचे पाय घरी राहत नाही;
12 mara kwenye barabara za mji, mara kwenye viwanja vikubwa, kwenye kila pembe huvizia.)
१२कधी रस्त्यात, कधी बाजारात, प्रत्येक नाक्याजवळ ती थांबून राहते.
13 Huyo mwanamke alimkumbatia kijana na kumbusu, na kwa uso usio na haya akamwambia:
१३मग तिने त्यास धरले आणि त्याची चुंबने घेतली; निर्लज्जपणे ती त्यास म्हणाली,
14 “Nina sadaka za amani nyumbani; leo nimetimiza nadhiri zangu.
१४“आज मी माझी शांत्यर्पणे केली; मी आपले नवस फेडले,
15 Kwa hiyo nimetoka nje kukulaki; nimekutafuta na nimekupata!
१५ह्यासाठी मी तुला भेटायला, तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस.
16 Nimetandika kitanda changu kwa kitani za rangi kutoka Misri.
१६मी आपल्या अंथरुणावर, मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे.
17 Nimetia manukato kitanda changu kwa manemane, udi na mdalasini.
१७मी आपले अंथरुण बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे.
18 Njoo, tuzame katika mapenzi mpaka asubuhi; tujifurahishe wenyewe kwa mapenzi!
१८ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ.
19 Mume wangu hayupo nyumbani; amekwenda safari ya mbali.
१९माझा पती घरी नाही; तो लांबच्या प्रवासास गेला आहे.
20 Amechukua mkoba uliojazwa fedha na hatakuwepo nyumbani karibuni.”
२०त्याने प्रवासासाठी पैश्याची पिशवीबरोबर घेतली आहे; तो पौर्णिमेच्या दिवशी परत घरी येईल.”
21 Kwa maneno laini yule mwanamke akampotosha; alimshawishi kwa maneno yake laini.
२१तिने आपल्या मोहक बोलण्याने त्याचे मन वळवले; आणि आपल्या गोड बोलण्याने तिने त्यास सक्ती केली.
22 Mara huyo kijana alimfuata yule mwanamke kama fahali aendaye machinjoni, kama kulungu aingiaye kwenye kitanzi,
२२तो तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, किंवा जसा हरीण सापळ्यात पकडला जातो,
23 mpaka mshale umchome ini lake, kama ndege anayenaswa kwenye mtego, bila kujua itamgharimu maisha yake.
२३जसा पक्षी, पाशाकडे धाव घेतो, तसा हे आपल्या जीवाची किंमत घेण्यासाठी आहे हे तो जाणत नाही, किंवा तिर त्याचे काळीज भेदून जाईपर्यंत तसा तो तिच्यामागे जातो.
24 Sasa basi wanangu, nisikilizeni; sikilizeni kwa makini nisemalo.
२४आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या.
25 Usiruhusu moyo wako ugeukie njia za huyo mwanamke, wala usitangetange katika mapito yake.
२५तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस; तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस.
26 Aliowaangusha ni wengi; aliowachinja ni kundi kubwa.
२६कारण तिने पुष्कळांना घायाळ करून पाडले आहे, त्यांची संख्या मोजू शकत नाही.
27 Nyumba yake ni njia kuu iendayo kaburini, ielekeayo chini kwenye vyumba vya mauti. (Sheol h7585)
२७तिचे घर म्हणजे अधोलोकाकडचा मार्ग आहे; तो मृत्यूच्या खोल्यांकडे खाली उतरून जातो. (Sheol h7585)

< Mithali 7 >