< Hesabu 14 >

1 Usiku ule watu wote wa jumuiya walipaza sauti zao na kulia kwa sauti kuu.
त्या रात्री सर्व मंडळीने गळा काढून जोरजोरात आक्रोश केला आणि रडले.
2 Waisraeli wote wakanungʼunika dhidi ya Mose na Aroni, nalo kusanyiko lote wakawaambia, “Laiti tungekuwa tumefia humo nchi ya Misri! Au humu kwenye hili jangwa!
इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रारी केल्या. सर्व मंडळी त्यांना म्हणाली “आम्ही मिसर देशामध्ये किंवा रानात मरण पावलो असतो तर बरे झाले असते.
3 Kwa nini Bwana anatuleta katika nchi hii ili tufe kwa upanga? Wake zetu na watoto wetu watachukuliwa kama nyara. Je, isingekuwa bora kwetu kurudi Misri?”
तलवारीने आमचा नाश व्हावा म्हणून या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हास इथे आणले का? शत्रू आम्हास मारून टाकील आणि आमच्या स्त्रिया मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”
4 Wakasemezana wao kwa wao, “Inatupasa kumchagua kiongozi na kurudi Misri.”
नंतर ते एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.”
5 Ndipo Mose na Aroni wakaanguka kifudifudi mbele ya kusanyiko lote la Kiisraeli lililokusanyika hapo.
तिथे जमलेल्या सर्व इस्राएलांच्या मंडळीसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.
6 Yoshua mwana wa Nuni na Kalebu mwana wa Yefune, waliokuwa miongoni mwa watu wale waliokwenda kuipeleleza nchi, wakararua nguo zao,
नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब, जे कोणी देश तपासणीसाठी पाठवले होते त्यामधील हे दोघे होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली.
7 wakasema na kusanyiko lote la Kiisraeli, wakawaambia, “Nchi tuliyopita katikati yake na kuipeleleza ni nzuri sana sana.
ते इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीशी बोलले. ते म्हणाले, आम्ही जो देश हेरायला येथून तेथे फिरलो तो देश खूप चांगला आहे.
8 Ikiwa Bwana anapendezwa nasi, atatuongoza kuingia katika nchi ile, nchi itiririkayo maziwa na asali, naye atatupa nchi hiyo.
जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या देशात नेईल आणि तो दूध व मध वाहणारा देश आपल्याला देईल.
9 Ila tu msimwasi Bwana. Wala msiwaogope watu wa nchi hiyo, kwa sababu tutawameza. Ulinzi wao umeondoka, lakini Bwana yupo pamoja nasi. Msiwaogope.”
“परंतु परमेश्वराविरूद्ध बंड करू नका आणि त्या देशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपल्या अन्नाप्रमाणे आपण त्यांना सहज भक्ष्य करू. त्यांचे संरक्षण त्यांच्यापासून काढले जाईल, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहे. त्यांना घाबरु नका.”
10 Lakini kusanyiko lote likazungumza juu ya kuwapiga kwa mawe. Ndipo utukufu wa Bwana ukaonekana katika Hema la Kukutania kwa Waisraeli wote.
१०पण सर्व मंडळी म्हणू लागली त्यांना दगडमार करा. परंतु परमेश्वराचे तेज दर्शनमंडपावर इस्राएल लोकांस दिसले.
11 Bwana akamwambia Mose, “Watu hawa watanidharau mpaka lini? Wataendelea kukataa kuniamini mimi mpaka lini, ingawa nimetenda ishara za miujiza miongoni mwao?
११परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक कोठवर मला तुच्छ लेखतील? ह्यांच्यामध्ये मी केलेली शक्तीशाली चिन्हे पाहूनही त्याची पर्वा न करता माझ्यावर विश्वास ठेवण्यास चुकत आहेत.
12 Nitawapiga kwa tauni na kuwaangamiza, lakini nitakufanya wewe kuwa taifa kubwa lenye nguvu kuliko wao.”
१२मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल, आणि मी तुझ्या स्वतःच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन.”
13 Mose akamwambia Bwana, “Ndipo Wamisri watasikia juu ya jambo hili! Kwa uweza wako uliwapandisha watu hawa kutoka miongoni mwao.
१३मोशे परमेश्वरास म्हणाला, जर तू असे केलेस तर ते मिसरी लोक ऐकतील कारण तू आपल्या सामर्थ्याने या लोकांस बाहेर आणले.
14 Nao watawaambia wenyeji wa nchi hii jambo hili. Wao tayari wameshasikia kwamba wewe, Ee Bwana, upo pamoja na watu hawa, na kuwa wewe, Ee Bwana, umeonekana uso kwa uso, nalo wingu lako hukaa juu yao. Tena wewe unawatangulia kwa nguzo ya wingu mchana na kwa nguzo ya moto usiku.
१४ते त्या देशातल्या राहणाऱ्यांना हे सांगतील, त्यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर या लोकांच्या मध्ये आहेस, कारण तू परमेश्वर प्रत्यक्ष दिसत आहेस तुझा ढग त्यांच्यावरती उभा राहतो, आणि दिवसा ढगाच्या खांबात रात्री त्या ढगाचा अग्नीच्या खांबात तू त्यांच्यापुढे चालतोस.
15 Ikiwa utawaua watu hawa wote mara moja, mataifa ambayo yamesikia taarifa hii kukuhusu wewe watasema,
१५आता जर तू या लोकांस एका मनुष्याप्रमाणे मारले, तर ज्या राष्ट्रांनी तुझी किर्ती ऐकली आहे ते बोलतील आणि म्हणतील,
16 ‘Bwana alishindwa kuwaingiza watu hawa katika nchi aliyowaahidi kwa kiapo; hivyo akawaua jangwani.’
१६परमेश्वराने त्यांना जो देश देण्याचे शपथपूर्वक सांगितले होते त्यामध्ये तो आणू शकला नाही म्हणून त्याने त्यांना रानात मारून टाकले.
17 “Basi sasa nguvu za Bwana na zionekane, sawasawa na vile ulivyosema:
१७“म्हणून आता मी विनंती करतो, तुझ्या महान सामर्थ्याचा उपयोग कर. तू, म्हणाला होतास,
18 ‘Bwana si mwepesi wa hasira, ni mwingi wa upendo na mwenye kusamehe dhambi na uasi. Lakini haachi kumwadhibu mwenye hatia, huadhibu watoto kwa ajili ya dhambi ya baba zao hata kizazi cha tatu na cha nne.’
१८परमेश्वर रागवायला मंद आहे आणि विपुल दयेने भरलेला आहे. तो अपराधांची व अधर्माची क्षमा करतो पण जे लोक अपराधी आहेत त्यांची मुळीच गय करत नाही. तो पूर्वजांच्या पापाबद्दल त्यांच्या वंशजाच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीवर वडिलांच्या अन्यायाची शिक्षा लेकरांना करतो.
19 Kwa kadiri ya upendo wako mkuu, usamehe dhambi ya watu hawa, kama vile ulivyowasamehe tangu wakati walitoka Misri mpaka sasa.”
१९मी तुला विनंती करतो, तुझ्या महान विश्वसनीयतेच्या कराराने त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही त्यांना क्षमा कर.”
20 Bwana akajibu, “Nimewasamehe kama ulivyoomba.
२०परमेश्वर म्हणाला, “तू विनंती केल्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.”
21 Hata hivyo, kwa hakika kama niishivyo, na kwa hakika kama utukufu wa Bwana uijazavyo dunia yote,
२१पण खचित जसा मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या वैभवाने भरलेली आहे.
22 hakuna hata mmoja wa watu hawa ambao waliuona utukufu wangu na ishara za miujiza niliyotenda huko Misri na huko jangwani, lakini ambaye hakunitii na akanijaribu mara hizi kumi,
२२ज्या सर्व लोकांनी माझे वैभव आणि मिसर देशात व रानात सामर्थ्याची चिन्हे पाहिले. तरी दहादा त्यांनी माझी परीक्षा पाहिली आणि माझी वाणी ऐकली नाही.
23 hakuna hata mmoja wao atakayeona nchi niliyowaahidi baba zao kwa kiapo. Hakuna hata mmoja ambaye amenidharau atakayeiona.
२३मी जो देश त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला तो ते खचित पाहणार नाहीत. ज्यांनी मला तुच्छ मानले त्यांच्यापैकी तो कोणीही पाहणार नाही.
24 Lakini kwa sababu mtumishi wangu Kalebu ana roho ya tofauti na ananifuata kwa moyo wote, nitamwingiza katika nchi aliyoiendea, nao wazao wake watairithi.
२४पण माझा सेवक कालेब याच्यासोबत वेगळा आत्मा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्यास नेईल. आणि त्याच्या वंशजांना तो देश वतन होईल.
25 Kwa kuwa Waamaleki na Wakanaani wanaishi katika mabonde, kesho geukeni mwelekee jangwani kwa kufuata njia iendayo Bahari ya Shamu.”
२५अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात राहत आहेत. म्हणून उद्या तुम्हीही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या रानात परत जा.
26 Bwana akamwambia Mose na Aroni:
२६परमेश्वर मोशे आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
27 “Jumuiya hii ovu itanungʼunika dhidi yangu hadi lini? Nimesikia malalamiko ya hawa Waisraeli wanaonungʼunika.
२७ही दुष्ट मंडळी माझ्याविरूद्ध टिका करते त्यांचे मी किती काळ सहन करू? इस्राएली लोक माझ्याविरूद्ध तक्रार करतात त्या मी ऐकल्या आहेत.
28 Hivyo waambie, ‘Hakika kama niishivyo, asema Bwana, nitawafanyia vitu vilevile nilivyosikia mkisema:
२८तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी करीन.
29 Kila mmoja wenu mwenye umri wa miaka ishirini au zaidi ambaye alihesabiwa na amenungʼunika dhidi yangu, miili yenu itaanguka katika jangwa hili.
२९तुमची प्रेते या रानात पडतील. तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षांचा किंवा त्याहून अधिक वयाचे ज्यांनी माझ्याविरूद्ध कुरकुरले,
30 Hakuna hata mmoja wenu atakayeingia katika nchi niliyoapa kwa mkono ulioinuliwa kuwa makao yenu, isipokuwa Kalebu mwana wa Yefune, na Yoshua mwana wa Nuni.
३०ज्या देशात तुमचे घर देण्याचे वचन मी तुम्हास दिले त्यामध्ये तुमच्यापैकी कोणीही जाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा जातील.
31 Lakini watoto wenu ambao mlisema watachukuliwa kama mateka, nitawaingiza humo ili waifurahie nchi ambayo ninyi mmeikataa.
३१ज्या तुमच्या मुलाबाळाविषयी तुम्ही म्हणाला की, त्यांची लूट होईल. मी त्यांना त्या देशात नेईल. तुम्ही जो देश नाकारला तो देश ते अनुभवतील.
32 Lakini ninyi, miili yenu itaanguka katika jangwa hili.
३२आणि तुमच्याविषयी तर तुमची प्रेते या रानात पडतील.
33 Watoto wenu watakuwa wachungaji wa mifugo hapa kwa miaka arobaini, wakiteseka kwa ajili ya kukosa uaminifu kwenu, hadi mwili wa mtu wenu wa mwisho ulale katika jangwa hili.
३३तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील.
34 Kwa miaka arobaini, mwaka mmoja kwa kila siku katika zile siku arobaini mlizoipeleleza nchi, mtateseka kwa ajili ya dhambi zenu, na kujua jinsi ilivyo vibaya kunifanya mimi kuwa adui yenu.’
३४तुम्हास तुमच्या पापाबद्दल चाळीस वर्षे दु: ख भोगावे लागेल. त्या मनुष्यांना तो प्रदेश शोधायला चाळीस दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हास समजेल.
35 Mimi Bwana nimesema, na hakika nitafanya mambo haya kwa jumuiya hii yote ovu, ambayo imefungamana pamoja dhidi yangu. Watakutana na mwisho wao katika jangwa hili; hapa ndipo watafia.”
३५“मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट मनुष्यांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरूद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या रानात मरतील.”
36 Hivyo watu wale ambao Mose alikuwa amewatuma kuipeleleza nchi, waliorudi na kuifanya jumuiya nzima kunungʼunika dhidi ya Mose kwa kueneza taarifa mbaya kuhusu hiyo nchi:
३६मोशेने ज्या लोकांस नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तीवान नाहीत.
37 watu hawa waliohusika kueneza taarifa mbaya kuhusu hiyo nchi walipigwa na kuanguka kwa tauni mbele za Bwana.
३७ज्यांनी वाईट वर्तमान आणले ते पुरुष जबाबदार होते ते परमेश्वरासमोर मरीने मरण पावले.
38 Miongoni mwa watu waliokwenda kuipeleleza hiyo nchi, ni Yoshua mwana wa Nuni, na Kalebu mwana wa Yefune peke yao waliosalia.
३८यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो देश शोधायला पाठवलेल्या लोकात होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले.
39 Mose alipotoa taarifa hii kwa Waisraeli wote, waliomboleza kwa uchungu.
३९मोशेने या सर्व गोष्टी इस्राएल लोकांस सांगितल्या. लोक खूप दु: खी झाले.
40 Mapema asubuhi siku iliyofuata walipanda juu kuelekea kwenye nchi ya vilima virefu, wakasema, “Tumetenda dhambi. Tutakwea mpaka mahali Bwana alipotuahidi.”
४०दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या देशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हास वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या देशात आम्ही जाऊ.”
41 Lakini Mose akasema, “Kwa nini hamtii amri ya Bwana? Jambo hili halitafanikiwa!
४१पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हास यश मिळणार नाही.
42 Msipande juu, kwa kuwa Bwana hayupo pamoja nanyi. Mtashindwa na adui zenu,
४२त्या देशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.
43 kwa kuwa Waamaleki na Wakanaani watapambana nanyi huko. Kwa sababu mmemwacha Bwana, hatakuwa pamoja nanyi, ninyi mtaanguka kwa upanga.”
४३अमालेकी आणि कनानी लोक आहेत तुम्ही तलवारीने पडाल. तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला आहात म्हणून युध्दाच्या वेळी तो तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही सर्व युद्धात मारले जाल.”
44 Hata hivyo, kwa kiburi chao walipanda juu kuelekea nchi ya vilima virefu, ijapokuwa Mose hakutoka kambini wala Sanduku la Agano la Bwana.
४४परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही.
45 Ndipo Waamaleki na Wakanaani walioishi katika hiyo nchi ya vilima wakateremka na kuwashambulia, wakawapiga njia yote hadi Horma.
४५डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मा नगरापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

< Hesabu 14 >