< Yoshua 9 >

1 Basi ikawa wafalme wote waliokuwa magharibi mwa Yordani waliposikia juu ya haya yote, wale waliokuwa katika nchi ya vilima, upande wa magharibi mwa vilima na katika pwani yote ya hiyo Bahari Kuu, hadi kufikia Lebanoni (wafalme wa Wahiti, Waamori, Wakanaani, Waperizi, Wahivi na Wayebusi),
मग यार्देन नदीच्या पश्चिमी डोंगराळ प्रदेशात, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या किनाऱ्यावर राहणारे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांचे जे सर्व राजे होते.
2 wakajiunga pamoja ili kupigana vita dhidi ya Yoshua na Israeli.
त्यांनी एका आदेशाखाली एकत्र जमून यहोशवा व इस्राएल यांच्या विरुद्ध लढाई पुकारली.
3 Hata hivyo, watu wa Gibeoni waliposikia juu ya hayo yote Yoshua aliyowatendea watu wa Yeriko na Ai,
यहोशवाने यरीहो आणि आय या नगरांचे काय केले हे जेव्हा गिबोनाच्या रहिवाश्यांनी ऐकले,
4 nao wakaamua kufanya hila: Wakajifanya kama wajumbe wakiwa na punda waliobebeshwa mizigo wakiwa na magunia yaliyochakaa na viriba vya mvinyo vikuukuu vyenye nyufa zilizozibwa.
तेव्हा त्यांनी फसवेगिरीची योजना केली; त्यांनी राजदुतांप्रमाने वर्तणूक केली, आणि आपल्या गाढवावर जुनी गोणताटे व झिजलेले, फाटलेले, शिवलेले द्राक्षरसाचे बुधले घेतले;
5 Walivaa miguuni mwao viatu vilivyoraruka na kushonwa kisha wakavaa nguo kuukuu. Chakula chao kilikuwa mkate uliokauka na kuingia koga.
त्यांनी आपल्या पायात झिजलेले व ठिगळाचे जोडे आणि अंगात जुनेपुराणे कपडे घातले; त्यांच्या खाण्याच्या सर्व भाकरी वाळलेल्या आणि बुरसटल्या होत्या.
6 Ndipo wakamwendea Yoshua kambini huko Gilgali wakamwambia yeye pamoja na watu wa Israeli, “Tumetoka katika nchi ya mbali, fanyeni mkataba nasi.”
ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्यास व इस्राएल लोकांस म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करार करा.”
7 Basi watu wa Israeli wakawaambia hao Wahivi, “Lakini huenda mnakaa karibu nasi, twawezaje basi kufanya mapatano nanyi?”
इस्राएल लोकांनी त्या हिव्वी लोकांस म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करार कसा करणार? कदाचित न जाणो तुम्ही आमच्याजवळ राहणारे असाल.”
8 Wakamwambia Yoshua, “Sisi ni watumishi wako.” Yoshua akawauliza, “Ninyi ni nani, nanyi mnatoka wapi?”
ते यहोशवाला म्हणाले, “आम्ही तुझे दास आहो.” यहोशवाने त्यांना विचारले, “तुम्ही कोण व कोठून आला?”
9 Nao wakamjibu: “Watumishi wako wametoka nchi ya mbali sana kwa ajili ya umaarufu wa Bwana Mungu wenu. Kwa kuwa tumesikia taarifa zake: hayo yote aliyofanya huko Misri,
त्यांनी त्यास म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून आम्ही तुझे दास फार दूर देशाहून आलो आहोत. कारण त्याने मिसरात जी प्रत्येक गोष्ट केली त्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे;
10 pia yale yote aliyowatendea wafalme wawili wa Waamori mashariki ya Yordani; huyo Sihoni mfalme wa Heshboni na Ogu mfalme wa Bashani, aliyetawala huko Ashtarothi.
१०आणि यार्देनेच्या पलीकडील अमोरी लोकांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टारोथातला बाशानाचा राजा ओग, यांना जे काय केले तेही आम्ही ऐकले आहे.
11 Basi wazee wetu na wale wote wanaoishi katika nchi yetu walituambia, ‘Chukueni chakula cha safari; nendeni mkakutane na watu hao na kuwaambia, “Sisi tu watumishi wenu, fanyeni mapatano nasi.”’
११तेव्हा आमचे वडील आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना म्हणा, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करार करा.”
12 Mkate huu wetu ulikuwa wa moto tulipoufunga siku tulipoanza safari kuja kwenu, lakini sasa angalia jinsi ulivyokauka na kuota ukungu.
१२या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी, प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा त्या गरम होत्या; पण आता त्या वाळून बुरसटल्या आहेत.
13 Viriba hivi vya mvinyo vilikuwa vipya tulipovijaza, lakini ona jinsi vilivyo na nyufa. Nguo zetu na viatu vimechakaa kwa ajili ya safari ndefu.”
१३हे द्राक्षरसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा नवे होते, पण आता ते फाटून तुटून गेले आहेत; हे आमचे कपडे आणि जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.
14 Basi watu wa Israeli wakavikagua vyakula vyao bila kupata shauri kutoka kwa Bwana.
१४तेव्हा लोकांनी त्यांचे काही अन्न स्वीकारले; पण त्यांनी मार्गदर्शनासाठी परमेश्वर देवाचा सल्ला घेतला नाही.
15 Ndipo Yoshua akafanya mapatano ya amani pamoja nao kuwaacha waishi, nao viongozi wa kusanyiko wakathibitisha kwa kiapo.
१५मग यहोशवाने त्यांच्याशी समेट केला आणि त्यांना जीवन बहाल करून सुरक्षित ठेवण्याचे अभिवचन दिले. लोकांच्या नेत्यांनीही त्यांच्याशी शपथ घेतली.
16 Siku ya tatu baada ya hao kufanya mapatano na Wagibeoni, Waisraeli wakapata habari kuwa hao watu ni jirani zao waliokuwa wanaishi karibu nao.
१६इस्राएल लोकांनी त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसानी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत.
17 Ndipo wana wa Israeli wakasafiri na siku ya tatu wakafika kwenye miji yao ya Gibeoni, Kefira, Beerothi na Kiriath-Yearimu.
१७नंतर इस्राएल लोक कूच करीत तिसऱ्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे गिबोन, कफीरा, बैरोथ व किर्याथ-यारीम.
18 Lakini Waisraeli hawakuwashambulia kwa kuwa viongozi wa kusanyiko walikuwa wamewaapia kwa Bwana, Mungu wa Israeli. Kusanyiko lote likanungʼunika dhidi ya hao viongozi,
१८पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण त्यांच्या नेत्यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी त्यांच्या नेत्यांविरुद्ध कुरकुर केली.
19 lakini viongozi wote wakawajibu, “Tumeshawaapia kwa Bwana, Mungu wa Israeli, kwa hiyo hatuwezi kuwagusa sasa.
१९परंतु सर्व नेत्यांनी सगळ्या लोकांस सांगितले, “आम्ही त्यांच्यासमोर इस्राएलाचा देव परमेश्वर याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हांला त्यांना हात लावता येत नाही.
20 Hivi ndivyo tutakavyowafanyia: Tutawaacha waishi, ili ghadhabu isije juu yetu kwa kuvunja kiapo tulichowaapia.”
२०त्यांच्याशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जिवंत राखणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.”
21 Wakaendelea kusema, “Waacheni waishi, lakini wawe wapasua kuni na wachota maji kwa ajili ya jamii yote.” Hivyo ahadi waliyoweka viongozi kwao ikawa hivyo.
२१नेत्यांनी लोकांस सांगितले की, “त्यांना जिवंत राहू द्या.” नेत्यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे गिबोनी लोक सर्व इस्राएली लोकांचे लाकूडतोडे व पाणक्ये झाले.
22 Kisha Yoshua akawaita Wagibeoni na kuwaambia, “Kwa nini mmetudanganya kwa kutuambia, ‘Tunaishi mbali nanyi,’ wakati ambapo ninyi mnaishi karibu nasi?
२२यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले, “तुम्ही आमच्यामध्ये राहत असून आम्ही फार दूरचे आहोत असे सांगून आम्हांला का फसवले?
23 Sasa mko chini ya laana: Daima mtakuwa wapasua kuni na wachota maji kwa ajili ya nyumba ya Mungu wangu.”
२३म्हणून आता तुम्ही या कारणासाठी शापित आहात, आणि तुमच्यातले काही नेहमी दास होऊन रहाल; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडणारे व पाणी काढणारे असे होऊन रहाल.”
24 Wakamjibu Yoshua, “Watumwa wako waliambiwa waziwazi jinsi Bwana Mungu wenu alivyomwamuru mtumishi wake Mose kuwapa ninyi nchi hii yote na kuwaangamiza wakazi wake wote toka mbele zenu. Kwa hiyo tuliogopa mno kwa ajili ya uhai wetu kwa sababu yenu, ndiyo maana tukafanya neno hili.
२४त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “हा सर्व देश तुम्हाला द्यावा आणि तुमच्यासमोर देशांतील सर्व रहिवाश्यांचा नाश करावा असे तुझा देव परमेश्वर याने आपला सेवक मोशे याला आज्ञापिले होते, हे तुझ्या दासांना पक्के कळले होते; तुमच्यामुळे आम्हांला आमच्या जीवाची फार भीती वाटली म्हणून आम्ही हे काम केले.
25 Sasa tupo mikononi mwako. Tufanyieni lolote mnaloona kuwa jema na haki kwako.”
२५आता पाहा, आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”
26 Kwa hiyo Yoshua akawaokoa mikononi mwa Waisraeli, nao hawakuuawa.
२६त्यामुळे यहोशवाने त्यांचे तसे केले; त्यांना इस्राएल लोकांच्या हातातून सोडवले; इस्राएल लोकांनी त्यांना जिवे मारले नाही,
27 Siku hiyo Yoshua akawafanya Wagibeoni wapasua kuni na wachota maji kwa ajili ya jamii na kwa ajili ya madhabahu ya Bwana mahali pale ambapo Bwana angepachagua. Hivyo ndivyo walivyo hadi hivi leo.
२७यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी गिबोन्यांना लाकूड तोडणारे व पाणी काढणारे म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.

< Yoshua 9 >