< Yoshua 22 >
1 Ndipo Yoshua akawaita Wareubeni, Wagadi na nusu ya kabila la Manase,
१मग यहोशवाने रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाला बोलावले;
2 naye akawaambia, “Mmeshafanya yale yote Mose mtumishi wa Bwana aliyowaamuru, nanyi mmenitii kwa kila jambo nililowaamuru.
२तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचा सेवक मोशे याने जे तुम्हाला आज्ञा करून जे सांगितले होते ते सर्वकाही तुम्ही केले आणि जे मी तुम्हाला आज्ञापिले त्या सर्वांविषयी तुम्ही माझी वाणी ऐकली
3 Kwa muda mrefu sasa, hadi siku hii ya leo, hamkuwaacha ndugu zenu, bali ninyi mmetimiza ile kazi Bwana Mungu wenu aliyowapa.
३मागील सर्व दिवसांमध्ये आणि आजपर्यंत तुम्ही आपल्या भावांना सोडले नाही. परंतु आपला देव परमेश्वर याच्या सूचनांचे आणि आज्ञांचे काटेकोरपणे पालन केले आहे.
4 Sasa kwa kuwa Bwana Mungu wenu amewapa ndugu zenu pumziko kama alivyoahidi, rudini nyumbani mwenu katika nchi ile ambayo Mose mtumishi wa Bwana aliwapa ngʼambo ya Yordani.
४आणि तुमचा देव परमेश्वर याने आपल्या त्याने विसावा दिला आहे; तेव्हा तुम्ही आता माघारी फिरा, आणि परमेश्वराचा सेवक मोशेने यार्देनेच्या पलीकडे दिलेला जो तुमचा स्वतःचा प्रदेश त्यामध्ये आपापल्या तंबूत जाऊन राहा.
5 Lakini mwe waangalifu sana kushika amri na sheria zile Mose mtumishi wa Bwana alizowapa: yaani kumpenda Bwana Mungu wenu na kuenenda katika njia zake zote, kutii amri zake, kushikamana naye kwa uthabiti na kumtumikia kwa moyo wenu wote na roho yenu yote.”
५तेव्हा परमेश्वराचा सेवक मोशे याने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या आज्ञा आणि जे शास्त्र दिले आहे; त्याचे काटेकोरपणे पालन करण्याविषयी जपा. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावी, सर्व मार्गांत त्याचे अनुसरण करावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्याच्याशी बिलगून रहावे आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व आपल्या संपूर्ण जिवाने त्याची सेवा करावी म्हणून फार जपा.”
6 Ndipo Yoshua akawabariki na kuwaaga waende zao, nao wakaenda nyumbani mwao.
६यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला, मग ते आपआपल्या तंबूकडे गेले.
7 (Kwa nusu ya kabila la Manase Mose alikuwa amewapa eneo katika Bashani na ile nusu nyingine ya hilo kabila Yoshua aliwapa eneo upande wa magharibi ya Yordani pamoja na ndugu zao). Yoshua alipowaaga waende zao nyumbani, aliwabariki,
७मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते परंतु त्याच्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यहोशवाने त्यांच्या भावांमध्ये पश्चिमेस यार्देनेच्या पश्चिमेला दिले होते; आणखी जेव्हा यहोशवाने त्यांना त्यांच्या तंबूकडे जायला निरोप दिला, आणि त्यांना आशीर्वाद दिला.
8 akisema, “Rudini nyumbani mwenu na utajiri wenu mwingi, yaani makundi makubwa ya mifugo, mkiwa na fedha, dhahabu, shaba na chuma, pia wingi wa nguo, nanyi mkagawane na ndugu zenu hizo nyara zilizotoka kwa adui zenu.”
८तेव्हा त्याने त्यांना असे सांगितले की, “बहुत द्रव्य व पुष्कळ पशुधन, रुपे आणि सोने, तांबे व लोखंड, आणि पुष्कळ वस्त्रे घेऊन तुम्ही आपल्या तंबूकडे माघारी जा आपल्या भावांबरोबर आपल्या शत्रूंची लूट वाटून घ्या.”
9 Kwa hiyo Wareubeni, Wagadi na hiyo nusu ya kabila la Manase wakawaacha Waisraeli huko Shilo katika nchi ya Kanaani ili kurudi Gileadi, nchi yao wenyewe waliyoipata sawasawa na agizo la Bwana kupitia Mose.
९मग रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश कनानाच्या देशातल्या शिलोहून इस्राएलाच्या इतर वंशजांतून निघून आपला वतनी गिलाद देश, जो मोशेकडून परमेश्वराने सांगितल्यावरून त्यांच्या वतनाचा झाला, त्यामध्ये जाण्यास माघारी चालले.
10 Walipofika Gelilothi karibu na Yordani, katika nchi ya Kanaani, Wareubeni, Wagadi na nusu ya kabila la Manase wakajenga madhabahu ya fahari kubwa huko kando ya Yordani.
१०तेव्हा यार्देन नदीच्या पश्चिमेच्या कनानातील गलीलोथ येथे रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश पोहचल्यावर, त्यांनी तेथे यार्देनेजवळ मोठी प्रेक्षणीय अशी वेदी बांधली.
11 Waisraeli wengine waliposikia kwamba Wareubeni, Wagadi na ile nusu ya kabila la Manase walikuwa wamejenga madhabahu kwenye mpaka wa Kanaani huko Gelilothi karibu na Yordani kwenye upande wa Israeli,
११तेव्हा इस्राएलाच्या इतर लोकांनी असे ऐकले की, पाहा, रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी कनान देशासमोर यार्देनेवरले गलीलोथ येथे, “जेथे इस्राएलाचे लोक उतरून आले होते तेथे एक वेदी बांधली आहे.”
12 kusanyiko lote la Israeli wakakusanyika huko Shilo ili wakapigane vita dhidi yao.
१२असे जेव्हा इस्राएल लोकांच्या साऱ्या मंडळीने ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांचा सर्व समुदाय त्यांच्याविरुद्ध लढावयास शिलो येथे एकत्र जमला.
13 Kwa hiyo Waisraeli wengine wakamtuma Finehasi mwana wa kuhani Eleazari katika nchi ya Gileadi, kwa Wareubeni, Wagadi na hiyo nusu ya kabila la Manase.
१३त्यानंतर इस्राएल लोकांनी, रऊबेन, गाद आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशांकडे गिलाद येथे निरोपे पाठविले. त्यांनी एलाजार याजक याचा पुत्र फिनहास यालाही पाठवले.
14 Wakatuma pamoja naye watu kumi ambao ni viongozi, mmoja kwa kila kabila la Israeli, kila mmoja aliyekuwa kiongozi katika mgawanyiko wa jamaa miongoni mwa koo za Israeli.
१४आणि त्याच्याबरोबर इस्राएलाच्या प्रत्येक वंशातील पूर्वजांच्या घराण्याचा एकएक अधिकारी असे दहा अधिकारी पाठवले; आणि त्यांच्यातील प्रत्येकजण इस्राएलातील आपापल्या वंशाचा प्रमुख होता.
15 Walipofika Gileadi, kwa Wareubeni, Wagadi na nusu ya kabila la Manase, wakawaambia:
१५तेव्हा गिलाद देशात रऊबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश त्याच्याकडे येऊन त्यांनी येऊन असे सांगितले,
16 “Kusanyiko lote la Bwana lasema: ‘Je, mmewezaje kuacha kumwamini Mungu wa Israeli jinsi hii? Mmewezaje kumwacha Bwana na kujijengea madhabahu dhidi yake na kumwasi?
१६परमेश्वराचा सर्व लोकसमुदाय असे म्हणतो की, तुम्ही इस्राएलाच्या देवाविरुद्ध असे पातक का केले? आज या दिवशी तुम्ही वेदी बांधून, परमेश्वराचे अनुसरण करण्याद्वारे परमेश्वराविरुद्ध बंड केले नाही काय?
17 Je, dhambi ya Peori haikutosha? Hata ingawa kulikuja tauni juu ya kusanyiko la Bwana, mpaka leo hii hatujatakasika kutokana na dhambi hiyo!
१७पौराच्या प्रकरणी जो आमच्याकडून अपराध घडला त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही,
18 Je, sasa ndiyo mnamwacha Bwana? “‘Kama mkimwasi Bwana leo, kesho atalikasirikia kusanyiko lote la Israeli.
१८सध्याच्या ह्या दिवसात परमेश्वरास अनुसरण्याचे तुम्ही सोडून देत आहात काय? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडाळी केली तर उद्या सर्व इस्राएल मंडळीवर त्याचा क्रोध होईल.
19 Kama nchi mnayomiliki imenajisika, vukeni mje katika nchi ya Bwana, mahali Maskani ya Bwana ilipo, nanyi mkajitwalie sehemu miongoni mwetu, lakini msije mkaasi dhidi ya Bwana wala dhidi yetu sisi kwa kujijengea madhabahu, zaidi ya madhabahu ya Bwana Mungu wetu.
१९आणि जर तुमच्या वतनाचा देश अशुद्ध असला, तर परमेश्वर वतनाच्या देशात, जेथे परमेश्वराचा निवासमंडप राहत आहे तेथे उतरून या, आणि आमच्यामध्ये वतन करून घ्या, परंतु आमचा देव परमेश्वर याच्या वेदी व्यतिरिक्त तुमच्यासाठी दुसरी वेदी बांधून आमचा देव परमेश्वर याच्याविरुद्ध आणि आमच्याविरुद्ध ही बंड करू नका.
20 Wakati Akani mwana wa Zera alipokosa uaminifu kwa vitu vilivyowekwa wakfu, je, ghadhabu haikulipata kusanyiko lote la Israeli? Hakuwa yeye peke yake aliyekufa kwa ajili ya dhambi yake.’”
२०जेरहाचा पुत्र आखान याने समर्पित वस्तुंविषयी आज्ञेचा भंग केला, आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नाही काय? आणि तो पुरुष आपल्या अपराधामुळे एकटाच मेला नाही.
21 Ndipo Wareubeni, Wagadi na nusu ya kabila la Manase walipowajibu viongozi wa koo za Israeli, wakisema:
२१तेव्हा रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश यांनी इस्राएलाच्या हजार हजार लोकांवर जे जे अधिकारी होते त्यांनी उत्तर देऊन म्हटले,
22 “Yeye Mwenye Nguvu, Mungu, Bwana! Yeye Mwenye Nguvu, Mungu, Bwana! Yeye anajua! Israeli na wajue! Kama huu umekuwa ni uasi au kukosa utii kwa Bwana, msituache hai siku hii ya leo.
२२जो समर्थ देव परमेश्वर! जो समर्थ देव परमेश्वर! तो जाणतो; आणि इस्राएल, तोसुद्धा जाणील; हे बंड असल्यास किंवा हे परमेश्वराविरुद्ध उल्लंघन असल्यास तू आज आम्हांला वाचवू नकोस;
23 Kama tumejijengea madhabahu yetu wenyewe ili kumwacha Bwana na kutoa sadaka za kuteketezwa na sadaka za nafaka, au kutoa sadaka za amani juu yake, Bwana mwenyewe na atupatilize leo.
२३परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही जर ही वेदी बांधली, तिच्यावर होमार्पण, पेयार्पण आणि शांत्यर्पणाचे यज्ञ करण्यासाठी जर बांधली असेल, तर त्याबद्दल परमेश्वर स्वतःचे आमचे पारिपत्य करो.
24 “Sivyo! Tulifanya hivyo kwa hofu kwamba siku zijazo wazao wenu wanaweza wakawaambia wazao wetu, ‘Mna uhusiano gani na Bwana, Mungu wa Israeli?
२४कदापि नाही, आम्ही अशा भीतीने विचार केला कि कदाचित पुढील काळी तुमचे पुत्र आमच्या पुत्रांना म्हणतील की इस्राएलाचा देव परमेश्वर याच्याशी तुमचा काय संबंध आहे?
25 Bwana ameifanya Yordani kuwa mpaka kati yetu na ninyi, ninyi Wareubeni na Wagadi! Hamna fungu kwa Bwana.’ Kwa hiyo wazao wenu wanaweza wakawasababisha wazao wetu wakaacha kumcha Bwana.
२५हे रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने यार्देन ही सीमा लावून दिली आहे; तुम्हाला परमेश्वरावर हक्क नाही. अशा प्रकारे तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराचे भय धरण्यापासून परावृत्त करतील.
26 “Hii ndiyo sababu tulisema, ‘Tujiweke tayari na tujenge madhabahu, lakini si kwa ajili ya sadaka za kuteketezwa au dhabihu.’
२६यास्तव आम्ही म्हटले की, “चला आपणासाठी एक वेदी बांधू, जी होमार्पणासाठी किंवा यज्ञार्पणासाठी नसेल.”
27 Badala yake, itakuwa ni ushahidi kati yetu na ninyi na vizazi vijavyo, kwamba tutamwabudu Bwana katika mahali patakatifu pake pamoja na sadaka zetu za kuteketezwa, dhabihu na sadaka za amani. Ndipo katika siku zijazo, wazao wenu hawataweza kuwaambia wazao wetu, ‘Ninyi hamna fungu katika Bwana.’
२७तर ती, आमच्या व तुमच्यामध्ये, आणि आमच्यामागे आमच्या पिढ्यांमध्ये हे साक्ष देण्यासाठी व्हावी; अशी की आम्ही परमेश्वरासमोर आपल्या होमार्पणांनी व आपल्या यज्ञार्पणांनी व आपल्या शांत्यर्पणांनी त्याची सेवा करीत जावी; आणि पुढल्या काळी तुमच्या संतानानी आमच्या संतानांना असे म्हणू नये की, “परमेश्वरावर तुमचा काही हक्क नाही.”
28 “Nasi tulisema, ‘Ikiwa wakati wowote watatuambia hilo, au kuwaambia uzao wetu, tutawajibu hivi: Angalieni nakala hii ya madhabahu ya Bwana, ambayo baba zetu waliijenga, si kwa ajili ya sadaka za kuteketezwa na dhabihu, bali kama ushahidi kati yetu na ninyi.’
२८यास्तव आम्ही म्हटले की, पुढे जेव्हा ते लोक आम्हांला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तेव्हा आम्ही त्यांना असे सांगू की तुम्ही परमेश्वराच्या वेदीचा नमुना “पाहा; ही आमच्या पूर्वजांनी ती होमबली किंवा यज्ञार्पणासाठी बांधली नाही तर ही आमच्या व तुमच्यामध्ये साक्ष देण्यासाठी म्हणून आहे.”
29 “Hili jambo la kumwasi Bwana na kumwacha siku hii ya leo kwa kujenga madhabahu kwa ajili ya sadaka za kuteketezwa, sadaka za nafaka na dhabihu, zaidi ya madhabahu ya Bwana Mungu wetu iliyo mbele ya maskani yake na liwe mbali nasi.”
२९आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण, किंवा यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर याची त्याच्या निवासमंडपाच्यासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि प्रभूला अनुसरण्याचे सोडून देण्याचे आमच्या हातून कदापि न घडो.
30 Wakati kuhani Finehasi na viongozi wa kusanyiko na wakuu wa koo za Israeli, waliposikia hayo waliyosema Wareubeni, Wagadi na Manase, wakaridhika.
३०तेव्हा रऊबेन वंश, गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या फिनहास याजक व त्याच्याबरोबर जे असलेले अधिकारी म्हणजे इस्राएलाच्या प्रत्येक वंशाचे जे प्रमुख पुरुष होते, तेव्हा त्यांना बरे वाटले.
31 Naye Finehasi mwana wa kuhani Eleazari, akawaambia Wareubeni, Wagadi na Manase, “Leo tunajua kwamba Bwana yuko pamoja nasi, kwa sababu hamkukosa uaminifu kwa Bwana katika jambo hili. Sasa mmewaokoa Waisraeli na mkono wa Bwana.”
३१यास्तव एलाजार याजक याचा पुत्र फिनहास ह्याने रऊबेन वंश व गाद वंश, व मनश्शे वंश यांना सांगितले, “आज आम्हांला कळले की, परमेश्वर आमच्यामध्ये आहे; कारण की तुम्ही परमेश्वराचा काही गुन्हा केला नाही; येणेकरून तुम्ही इस्राएल लोकांस परमेश्वराच्या हातातून सोडवले आहे.”
32 Ndipo Finehasi, mwana wa kuhani Eleazari na viongozi wakarudi Kanaani kutoka kwenye kukutana kwao na Wareubeni na Wagadi huko Gileadi nao wakatoa taarifa kwa Waisraeli.
३२मग रऊबेन वंश व गाद वंश यांपासून गिलाद देशातून एलाजार याजक याचा पुत्र फिनहास व ते अधिकारी यानी कनान देशात इस्राएलाच्या लोकांजवळ माघारे येऊन त्यांना वर्तमान सांगितले.
33 Walifurahi kusikia taarifa hiyo, na wakamhimidi Mungu. Wala hawakuzungumza tena habari za kupigana vita dhidi yao ili kuharibu nchi ambayo Wareubeni na Wagadi waliishi.
३३तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांनी देवाचा धन्यवाद केला, आणि ज्या देशात रऊबेन वंश व गाद वंश राहिले होते, तेव्हा रऊबेन व गाद यांच्याविरुद्ध लढाई करून त्यांचा नाश करावा असे ते कधीच म्हणाले नाही.
34 Nao Wareubeni na Wagadi wakayaita yale madhabahu Edi, yaani Shahidi: kwa kuwa itakuwa shahidi kati yetu na ninyi kwamba Bwana ndiye Mungu.
३४तेव्हा रऊबेन व गाद यानी त्या वेदीला “एद” असे नाव दिले; कारण, “परमेश्वर हाच देव आहे,” याची ती आमच्यामध्ये “साक्ष” असेल.