< 1 Samweli 5 >

1 Baada ya Wafilisti kuteka Sanduku la Mungu, walilichukua kutoka Ebenezeri mpaka Ashdodi.
आता पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला होता तो त्यांनी एबन-एजराहून अश्दोदास नेला.
2 Kisha wakaliingiza lile Sanduku ndani ya hekalu la Dagoni na kuliweka kando ya huyo Dagoni.
आणि पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला तो त्यांनी दागोनाच्या देवळात नेऊन दागोनाच्याजवळ ठेवला.
3 Watu wa Ashdodi walipoamka asubuhi na mapema kesho yake, kumbe, wakamkuta Dagoni ameanguka chini kifudifudi mbele ya Sanduku la Bwana! Wakamwinua Dagoni na kumrudisha mahali pake.
जेव्हा अश्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले, तेव्हा पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला होता. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेऊन त्याच्या ठिकाणी परत ठेवला.
4 Lakini asubuhi iliyofuata, walipoamka kumbe, walimkuta huyo Dagoni ameanguka chini kifudifudi mbele ya Sanduku la Bwana! Kichwa chake na mikono vilikuwa vimevunjwa navyo vimelala kizingitini, ni kiwiliwili chake tu kilichokuwa kimebaki.
पण ते दुसऱ्या दिवशी पहाटेस उठल्यावर, पाहा, परमेश्वराच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला आहे आणि दागोनाचे डोके व त्याच्या हाताचे दोन्ही पंजे तुटलेले उंबऱ्यावर पडले आहेत. दागोनाचे धड तेवढे त्यास राहिले होते.
5 Ndiyo sababu mpaka leo makuhani wa Dagoni wala wengine waingiao katika hekalu la Dagoni huko Ashdodi hawakanyagi kizingiti.
म्हणून, आजपर्यंत, दागोनाचे याजक व दागोनाच्या घरात येणारे ते अश्दोदकर दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत.
6 Mkono wa Bwana ulikuwa mzito juu ya watu wa Ashdodi na vijiji jirani, akaleta uharibifu juu yao na kuwatesa kwa majipu.
मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा भारी हात पडला व त्याने त्यांचा नाश केला, म्हणजे अश्दोदाला आणि त्यांच्या प्रदेशातील लोकांस गाठींच्या पीडेने पीडले.
7 Watu wa Ashdodi walipoona kile kilichokuwa kikitokea, wakasema, “Sanduku la Mungu wa Israeli kamwe lisikae hapa pamoja na sisi, kwa sababu mkono wake ni mzito juu yetu na juu ya Dagoni mungu wetu.”
तेव्हा अश्दोदकरांनी जे काही घडत आहे ते ओळखले, ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश आम्हामध्ये राहू नये कारण त्याचा हात आम्हांवर व आमच्या दागोन देवाविरूद्ध भारी झाला आहे.”
8 Basi wakawaita watawala wote wa Wafilisti pamoja na kuwauliza, “Tutafanya nini na hili Sanduku la Mungu wa Israeli?” Wakajibu, “Sanduku la Mungu wa Israeli na liende Gathi.” Basi wakalihamisha Sanduku la Mungu wa Israeli.
मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना आपणाकडे एकवट करून म्हटले, “इस्राएलाच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” ते बोलले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथाला न्यावा.” मग त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश तेथे नेला.
9 Lakini baada ya kulihamisha, mkono wa Bwana ulikuwa dhidi ya huo mji wa Gathi, akiuweka katika fadhaa kuu. Mungu akawatesa watu wa huo mji, vijana kwa wazee, kwa kuwaletea majipu.
परंतु असे झाले की त्यांनी तो तेथे नेल्यावर, परमेश्वराचा हात त्याच्यावर पडून त्या नगरात मोठा गोंधळ उडाला. त्याने नगरातली लहान आणि मोठी माणसे यांना पीडले. आणि त्यांच्या अंगावर गाठी उठल्या.
10 Basi wakapeleka Sanduku la Mungu Ekroni. Wakati Sanduku la Mungu lilipokuwa linaingia Ekroni, watu wa Ekroni walilia wakisema “Wamelileta Sanduku la Mungu wa Israeli kwetu ili kutuua sisi na watu wetu.”
१०मग त्यांनी देवाचा कोश एक्रोनाला पाठवला; परंतु, असे झाले की, “देवाचा कोश एक्रोन येथे येताच एक्रोनकर ओरडून म्हणाले आम्हांला व आमच्या लोकांस मारायला इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”
11 Basi wakawaita watawala wote wa Wafilisti pamoja na kusema, “Liondoeni Sanduku la Mungu wa Israeli na lirudishwe mahali pake, la sivyo litatuua sisi na watu wetu.” Kwa kuwa kifo kilikuwa kimeujaza mji hofu; kwani mkono wa Mungu ulikuwa mzito sana juu yake.
११मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र केले; ते त्यांना म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश त्याच्याजागी परत पाठवून द्या, यासाठी की, त्याने आम्हास व आमच्या लोकांस मारू नये.” कारण तेथे सर्व नगरात मरणाचे भयंकर भय पसरले होते; देवाचा जबरदस्त हात त्यांच्यावर पडला होता.
12 Wale ambao hawakufa walipatwa na majipu, na kilio cha mji kilikwenda juu hadi mbinguni.
१२जी माणसे मरण पावली नाहीत त्यास त्यांना गाठीने पीडले, आणि नगराचा आक्रोश वर आकाशापर्यंत गेला.

< 1 Samweli 5 >