< Salmos 60 >
1 Dios, nos has apartado de ti, nos has enviado en todas direcciones, has estado enojado; O vuelve a nosotros de nuevo.
१दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आम्हास टाकून दिले आहेस; तू आम्हास फाडून खाली टाकले आहे; आमच्यावर रागावला आहेस; तू आम्हांस पुन्हा पूर्वस्थितीवर आण.
2 Con el poder de tu mano la tierra tiembla y se abrió; hazla fuerte de nuevo, porque se movió.
२तू भूमी कंपित केली आहेस; तू ती फाडून वेगळी केली; तिचे खिंडार बरे कर, कारण ती हादरत आहे.
3 Has hecho que la gente vea tiempos difíciles; nos has dado el vino de aturdimiento para nuestra bebida.
३तू तुझ्या लोकांस कठीण गोष्टी दाखवल्या आहेत; तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षरस पाजला आहे.
4 Da un lugar seguro a las personas que te temen, a dónde pueden huir de las flechas. (Selah)
४तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे, यासाठी की, त्यांनी सत्याकरता तो उभारावा.
5 Para que tus seres queridos puedan salvarse, deja que tu diestra sea mi salvación, y dame una respuesta.
५ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी, म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे.
6 Dios ha dicho en su lugar santo, me alegraré. Haré una división de Siquem, y el valle de Sucot será medido.
६देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन; मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
7 Galaad es mío, y Manasés es mío; y Efraín es la fortaleza de mi cabeza; Judá es mi dador de leyes;
७गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे; एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझा राजदंड आहे.
8 Moab es mi vasija para lavarme; sobre Edom pondré mi zapato; sobre Filistea sonará un alegre clamor.
८मवाब माझे धुण्याचे पात्र आहे; अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन; मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
9 ¿Quién me llevará a la ciudad amurallada? ¿Quién será mi guía en Edom?
९मला बळकट नगरात कोण नेईल? मला अदोमात कोण नेईल?
10 ¿No nos has apartado, oh Dios? y no has salido con nuestros ejércitos.
१०हे देवा, तू आम्हास नाकारले नाही? परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
11 Danos ayuda en nuestro problema; porque no hay ayuda en el hombre.
११तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर, कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.
12 Por medio de Dios haremos grandes cosas, porque a través de él nuestros enemigos serán aplastados bajo nuestros pies.
१२आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ; तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.