< Hechos 11 >
1 Ahora los Apóstoles y los hermanos que estaban en Judea tenían noticias de que la palabra de Dios había sido dada a los gentiles.
१यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहूदीया प्रांतातील प्रेषितांनी व बंधूनी ऐकले.
2 Y cuando Pedro llegó a Jerusalén, los que guardaban la ley de la circuncisión discutían con él,
२पण जेव्हा पेत्र यरूशलेम शहरास आला, तेव्हा सुंता झालेला यहूदी विश्वासी गट त्याच्यावर टिका करू लागले.
3 Diciendo: Porque Fuiste a casa de incircuncisos, y comiste con ellos?
३ते म्हणाले, “जे सुंता न झालेले व परराष्ट्रीय आहेत अशा विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले.”
4 Pero Pedro les dio un informe de todo esto en orden, diciéndoles:
४म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना सविस्तर स्पष्ट करून सांगितल्या.
5 Yo estaba en la ciudad de Jope, en la oración; y al caer en un sueño profundo, vi en una visión una vasija como una gran tela que bajaba del cielo, y vino a mí:
५पेत्र म्हणाला, मी यापो शहरात प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मी एक दृष्टांत पाहिला की, मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर माझ्यापर्यंत आली.
6 Y mirándolo con atención vi en él todo tipo de bestias y pájaros.
६मी त्याच्याकडे न्याहाळून पाहून विचार करीत होतो, मी त्यामध्ये पृथ्वीवरील चार पायाचे प्राणी, जंगली पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी मी त्यामध्ये पाहिले.
7 Y una voz vino a mis oídos, diciendo: Ven, Pedro; mata y come.
७एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, “पेत्रा, ऊठ, मारून खा!”
8 Pero yo dije: No, Señor; porque nada común o inmundo alguna vez ha venido a mi boca.
८पण मी म्हणालो, “प्रभू, मी असे कधीही करणार नाही, मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही.”
9 Pero la voz, viniendo por segunda vez del cielo, dijo: Lo que Dios ha limpiado, no lo llames tu común.
९आकाशातून त्या वाणीने पुन्हा उत्तर दिले, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.”
10 Y esto fue hecho tres veces, y todo fue llevado de nuevo al cielo.
१०असे तीन वेळा घडले, मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले.
11 Y en ese momento, tres hombres, enviados desde Cesarea, vinieron a la casa donde estábamos.
११इतक्यात पाहा, तीन माणसे ज्या घरामध्ये आम्ही होतो त्यापुढे कैसरीयाहून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली.
12 Y el Espíritu me dio órdenes de ir con ellos, sin dudar nada. Y estos seis hermanos vinieron conmigo; y entramos en la casa de aquel hombre.
१२आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले, हे सहा बंधू जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते, आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो.
13 Y nos contó cómo había visto al ángel en su casa, diciendo: Envía a Jope, y haz que Simón, llamado Pedro, venga a ti;
१३कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले, देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “काही माणसे यापोस पाठव, शिमोन पेत्राला बोलावून घे.
14 ¿Quién te dirá palabras a través de las cuales tú y toda tu familia podrán obtener la salvación?
१४तो तुझ्याशी बोलेल, तो ज्या गोष्टी तुला सांगेल, त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.”
15 Y mientras les hablaba, el Espíritu Santo descendió sobre ellos tambien, como sobre nosotros al principio.
१५त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली, सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला.
16 Y las palabras del Señor vinieron a mi mente, cómo él dijo: El bautismo de Juan fue con agua, pero ustedes tendrán el bautismo con el Espíritu Santo.
१६तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले, प्रभू म्हणाला होता, “योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे हे खरे, पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.”
17 Si entonces Dios les dio, cuando tuvieron fe en el Señor Jesucristo, lo mismo que él nos dio, ¿quién era yo para ir en contra de Dios?
१७आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांसही देवाने सारखेच दान दिले, मग देवाला अडविणारा असा मी कोण?
18 Oyendo estas cosas, no dijeron nada más, sino que glorificaban a Dios, diciendo: de manera que también a los gentiles ha dado Dios arrepentimiento, para que tengan vida eterna.
१८जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”
19 Entonces los que se habían ido en el momento de la persecución de Esteban, llegaron hasta Fenicia y Chipre, predicando solo a los judíos.
१९स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वास ठेवणारे यरूशलेम शहरापासून दूर ठिकाणी फेनीके प्रांत, कुप्र बेट व अंत्युखिया शहरापर्यंत पांगले गेले, विश्वास ठेवणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांसच सुवार्ता सांगितली.
20 Pero algunos de ellos, hombres de Chipre y Cirene, cuando llegaron a Antioquía, dieron las buenas nuevas acerca del Señor Jesús a los griegos.
२०यातील काही विश्वास ठेवणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते, जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा त्यांनी या ग्रीक लोकांस येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
21 Y el poder del Señor estaba con ellos, y un gran número tuvo fe y dejaron sus antiguas creencias y se convirtieron al Señor.
२१प्रभू विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले.
22 Y noticias de ellos vinieron a oídos de la iglesia en Jerusalén; y enviaron a Bernabé hasta Antioquía.
२२याविषयीची बातमी यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्या मंडळीच्या कानावर आली, म्हणून यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठवले.
23 El cual, cuando llegó y vio la gracia de Dios, se alegró; y les exhortó a que con corazón firme siguieran fieles al Señor con toda la fuerza de sus corazones:
२३बर्णबा चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता, जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे, त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला, अंत्युखियातील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, कधीही तुमचा विश्वास गमावू नका, नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.
24 Porque era un hombre bueno y lleno del Espíritu Santo y de la fe; y un gran número se unió al Señor.
२४तो चागंला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले.
25 Luego Bernabé fue a Tarso, buscando a Saúl;
२५जेव्हा बर्णबा तार्सास गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता.
26 Y cuando se encontró con él, lo llevó a Antioquía. Y estuvieron con la iglesia allí por un año, enseñando a la gente; y a los discípulos primero se les dio el nombre de cristianos en Antioquía.
२६जेव्हा बर्णबाने त्यास शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले, शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे मंडळीत राहून पुष्कळ लोकांस शिकवले, अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले.
27 En aquellos días, los profetas llegaron de Jerusalén a Antioquía.
२७याच काळात काही संदेष्टे यरूशलेम शहराहून अंत्युखियास आले.
28 Y uno de ellos, llamado Agabo, dijo públicamente por medio del Espíritu que habría una gran hambruna en toda la tierra: lo cual sucedió en el tiempo de Claudio.
२८यांच्यापैकी एकाचे नाव अगब होते, अंत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला, पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे, लोकांस खायला अन्न मिळणार नाही, क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले.
29 Y los discípulos, cada uno como pudo, tomaron la decisión de enviar ayuda a los hermanos que vivían en Judea;
२९विश्वास ठेवणाऱ्यांनी ठरवले की, यहूदीया येथील आपल्या बंधू व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले.
30 Lo cual hicieron, y lo enviaron a los principales de la iglesia por mano de Bernabé y Saulo.
३०त्यांनी पैसे गोळा करून बर्णबा व शौल यांच्याकडे दिले, मग बर्णबा व शौल यांनी ते पैसे यहूदीयातील वडीलजनांकडे पाठवून दिले.