< Oseas 10 >
1 Israel parra vacía, ¿ha de hacer fruto para sí? Conforme a la multiplicación de su fruto multiplicó altares, conforme a la bondad de su tierra mejoraron sus estatuas.
१इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्यास विपुल फळे येतात. जसजसे त्याची फळे वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या. त्याची भूमी सुपीक झाली, तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.
2 Se apartó su corazón. Ahora serán convencidos; él quebrantará sus altares, asolará sus estatuas.
२त्यांचे हृदय कपटी आहे, त्यांना त्यांची शिक्षा होईल परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडून टाकेल त्याच्या पवित्र स्तंभाचा नाश करेल.
3 Porque dirán ahora: No tenemos rey, porque no temimos al SEÑOR: ¿y el rey qué nos hará?
३आता ते म्हणतील, “आम्हास राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय मानले नाही आणि राजा आमच्यासाठी काय करणार?”
4 Han hablado palabras jurando en vano al hacer alianza; por tanto, el juicio florecerá como ajenjo en los surcos del campo.
४ते पोकळ शब्द बोलतात खोट्या शपथा वाहून करार करतात, म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात तसा त्यांच्यावर न्याय येईल.
5 Por las becerras de Bet-avén serán atemorizados los moradores de Samaria; porque su pueblo lamentará a causa del becerro, y sus sacerdotes que en él se regocijaban por su gloria, la cual será disipada.
५शोमरोनाचे रहिवासी बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील, सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते आता ते त्यांच्याबरोबर नाहीत.
6 Y aun será él llevado a Asiria en presente al rey de Jareb; Efraín será avergonzado, e Israel será confuso de su consejo.
६ते अश्शूरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील. एफ्राईम लज्जीत होईल, आणि मुर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे इस्राएल लज्जीत होईल.
7 De Samaria fue cortado su rey como la espuma sobre la superficie de las aguas.
७शोमरोनाचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलण्यासारखा नाश पावेल.
8 Y los altares de Avén serán destruidos, el pecado de Israel; crecerá sobre sus altares espino y cardo. Y dirán a los montes: Cubridnos; y a los collados: Caed sobre nosotros.
८दुष्टतेची श्रध्दास्थानाने आणि इस्राएलाची पापे नाश पावतील त्यांच्या वेदींवर काटे व काटेरी झुडपे उगवतील. लोक पर्वतास म्हणतील, “आम्हास झाका” आणि टेकडयास म्हणतील, “आमच्यावर पडा”
9 Desde los días de Gabaa has pecado, oh Israel; allí estuvieron; no los tomó la batalla en Gabaa contra los inicuos.
९इस्राएला, गिबाच्या दिवसापासून तू पाप करत आहेस; तू तिथेच राहिला आहेस गिबाच्या दुष्टांसोबत झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत?
10 Y los castigaré como deseo; y pueblos se juntarán sobre ellos cuando sean atados en sus dos surcos.
१०मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन, त्यांच्या विरोधात राष्ट्रे एकत्र येतील व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील.
11 Efraín es becerra domada, amadora del trillar; mas yo pasaré sobre su lozana cerviz; yo haré halar a Efraín; arará Judá, quebrará sus terrones Jacob.
११एफ्राईम ही प्रशिक्षित कालवड आहे तिला मळणी करायला आवडते म्हणून मी तिच्या गोऱ्या मानेवर जू ठेवीन. मी एफ्राईमावर जू ठेवीन, यहूदा नांगरील, याकोब ढेकळे फोडील.
12 Sembrad vosotros mismos para justicia, segad vosotros mismos para misericordia; arad vuestro barbecho; porque es el tiempo de buscar al SEÑOR, hasta que venga y os enseñe justicia.
१२तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा आणि कराराच्या विश्वासूपणाची फळे तोडा, तुमची पडीत भूमी नांगरुन काढा, कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पाडत नाही, तोपर्यंत परमेश्वरास शोधण्याचीच ही वेळ आहे.
13 Habéis arado impiedad, segasteis iniquidad; comeréis fruto de mentira; porque confiaste en tu camino, y en la multitud de tus fuertes.
१३तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली, तुम्ही अन्यायाची कापणी केली, तुम्ही फसवणूकीचे फळ खाल्ले कारण तू तुझ्या योजनांवर आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला.
14 Por tanto, en tus pueblos se levantará alboroto, y todas tus fortalezas serán destruidas, como destruyó Salmán a Bet-arbel el día de la batalla; la madre fue arrojada sobre los hijos.
१४म्हणून तुझ्या लोकांमध्ये युध्दाचा गलबला होईल आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील. हे असे घडेल जसे शल्मनाने बेथ-आर्बिलाच्या युध्दात नाश केला तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले गेले.
15 Así hará a vosotros Bet-el por la maldad de vuestra maldad; en la mañana será del todo cortado el rey de Israel.
१५तुझ्या अती दुष्टपणामुळे बेथेल तुझ्यासोबत असेच करील. प्रभातसमयी इस्राएलाचा राजा पूर्णपणे नाश पावील.