< Apocalipsis 14 >
1 Y MIRÉ, y he aquí, el Cordero estaba sobre el monte de Sión, y con él ciento cuarenta y cuatro mil, que tenían el nombre de su Padre escrito en sus frentes.
१नंतर मी बघितले, पाहा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता; आणि ज्यांच्या कपाळांवर त्याचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिलेले होते, असे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे त्याच्याबरोबर होते.
2 Y oí una voz del cielo como ruido de muchas aguas, y como sonido de un gran trueno: y oí una voz de tañedores de arpas que tañían con sus arpas:
२आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व मेघ गडगडाटाच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जसे वीणावादक आपल्या वीणा वाजवत आहेत अशी ती होती.
3 Y cantaban como un cántico nuevo delante del trono, y delante de los cuatro animales, y de los ancianos: y ninguno podía aprender el cántico sino aquellos ciento cuarenta y cuatro mil, los cuales fueron comprados de entre los de la tierra.
३ते राजासनासमोर आणि त्या चार प्राणी व वडिलांसमोर जणू एक नवे गीत गात होते; पृथ्वीवरून विकत घेतलेले जे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही.
4 Estos son los que con mujeres no fueron contaminados; porque son vírgenes. Estos, los que siguen al Cordero por donde quiera que fuere. Estos fueron comprados de entre los hombres por primicias para Dios y para el Cordero.
४स्त्रीसंगाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याचे अनुसरण करणारे ते आहेत. मानवजातीतून खंडणी भरून मुक्त केलेले, हे देवाला व कोकऱ्याला प्रथमफळ असे आहेत.
5 Y en sus bocas no ha sido hallado engaño; porque ellos son sin mácula delante del trono de Dios.
५त्यांच्या मुखात काही असत्य आढळले नाही; ते निष्कलंक आहेत.
6 Y vi otro ángel volar por en medio del cielo, que tenía el evangelio eterno para predicarlo á los que moran en la tierra, y á toda nación y tribu y lengua y pueblo, (aiōnios )
६यानंतर मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ, पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा बोलणाऱ्यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला, सार्वकालिक सुवार्ता होती. (aiōnios )
7 Diciendo en alta voz: Temed á Dios, y dadle honra; porque la hora de su juicio es venida; y adorad á aquel que ha hecho el cielo y la tierra y el mar y las fuentes de las aguas.
७तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.
8 Y otro ángel le siguió, diciendo: Ha caído, ha caído Babilonia, aquella grande ciudad, porque ella ha dado á beber á todas las naciones del vino del furor de su fornicación.
८मग आणखी एक देवदूत त्याच्या मागोमाग आला आणि म्हणाला, “पडली, मोठी बाबेल पडली! कारण तिने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा क्रोधरूपी द्राक्षरस पाजला आहे.”
9 Y el tercer ángel los siguió, diciendo en alta voz: Si alguno adora á la bestia y á su imagen, y toma la señal en su frente, ó en su mano,
९आणि तिसरा देवदूत दुसऱ्या दोन देवदूतांच्या मागोमाग आला आणि म्हणाला, जर कोणी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन करील आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण करून घेईल
10 Este también beberá del vino de la ira de Dios, el cual está echado puro en el cáliz de su ira; y será atormentado con fuego y azufre delante de los santos ángeles, y delante del Cordero:
१०तोसुध्दा देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला, त्याचा क्रोधरुपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र दूतांसमोर आणि कोकऱ्यासमोर त्यास अग्नी आणि गंधक ह्यापासून पीडला जाईल.
11 Y el humo del tormento de ellos sube para siempre jamás. Y los que adoran á la bestia y á su imagen, no tienen reposo día ni noche, ni cualquiera que tomare la señal de su nombre. (aiōn )
११त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर चढत राहतो; त्या पशूला आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांना आणि त्याच्या नावाचे चिन्ह करून घेणाऱ्या कोणालाही रात्रंदिवस विसावा मिळणार नाही. (aiōn )
12 Aquí está la paciencia de los santos; aquí [están] los que guardan los mandamientos de Dios, y la fe de Jesús.
१२जे देवाच्या आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे.
13 Y oí una voz del cielo que me decía: Escribe: Bienaventurados los muertos que de aquí adelante mueren en el Señor. Sí, dice el Espíritu, que descansarán de sus trabajos; porque sus obras con ellos siguen.
१३आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली; ती मला म्हणाली, हे लिहीः आतापासून, प्रभूमध्ये मरणारे धन्य आहेत. आत्मा म्हणतो, “हो, म्हणजे त्यांना आपल्या कष्टांपासून सुटून विसावा मिळावा कारण त्यांची कामे तर त्यांच्याबरोबर त्यांच्यामागे जातात.”
14 Y miré, y he aquí una nube blanca; y sobre la nube uno sentado semejante al Hijo del hombre, que tenía en su cabeza una corona de oro, y en su mano una hoz aguda.
१४तेव्हा मी बघितले आणि पाहा, एक पांढरा ढग आणि मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी त्या ढगावर बसला होता. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या हातात एक धारदार विळा होता.
15 Y otro ángel salió del templo, clamando en alta voz al que estaba sentado sobre la nube: Mete tu hoz, y siega; porque la hora de segar [te] es venida, porque la mies de la tierra está madura.
१५मग परमेश्वराच्या भवनातून आणखी एक देवदूत बाहेर आला आणि जो ढगावर बसला होता त्यास त्याने मोठ्या आवाजात म्हटले, “विळा चालव आणि कापणी कर कारण तुझ्या कापणीची वेळ आली आहे; कारण पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.”
16 Y el que estaba sentado sobre la nube echó su hoz sobre la tierra, y la tierra fué segada.
१६मग जो ढगावर बसला होता त्याने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली.
17 Y salió otro ángel del templo que está en el cielo, teniendo también una hoz aguda.
१७मग आणखी एक देवदूत स्वर्गातील परमेश्वराच्या भवनामधून बाहेर आला; त्याच्याजवळही एक धारदार विळा होता.
18 Y otro ángel salió del altar, el cual tenía poder sobre el fuego, y clamó con gran voz al que tenía la hoz aguda, diciendo: Mete tu hoz aguda, y vendimia los racimos de la tierra; porque están maduras sus uvas.
१८मग आणखी एक देवदूत वेदीतून बाहेर आला; त्यास अग्नीवर अधिकार होता; आणि ज्याच्याजवळ धारदार विळा होता त्यास त्याने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, “तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षवेलीचे घड गोळा कर; कारण तिची द्राक्षे पिकली आहेत.”
19 Y el ángel echó su hoz aguda en la tierra, y vendimió la viña de la tierra, y echó [la uva] en el grande lagar de la ira de Dios.
१९तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे पीक गोळा करून ते देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.
20 Y el lagar fué hollado fuera de la ciudad, y del lagar salió sangre hasta los frenos de los caballos por mil y seiscientos estadios.
२०यानंतर ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले; व द्राक्षकुंडामधून रक्त वर आले; ते घोड्याच्या लगामापर्यंत चढले आणि शंभर कोसांच्या परिसरात पसरले.