< Salmos 47 >

1 Al Músico principal: de los hijos de Coré: Salmo. PUEBLOS todos, batid las manos; aclamad á Dios con voz de júbilo.
कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीते अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा.
2 Porque Jehová el Altísimo es terrible; Rey grande sobre toda la tierra.
कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
3 El sujetará á los pueblos debajo de nosotros, y á las gentes debajo de nuestros pies.
तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
4 El nos elegirá nuestras heredades; la hermosura de Jacob, al cual amó. (Selah)
त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
5 Subió Dios con júbilo, Jehová con sonido de trompeta.
जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.
6 Cantad á Dios, cantad: cantad á nuestro Rey, cantad.
देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.
7 Porque Dios es el Rey de toda la tierra: cantad con inteligencia.
कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.
8 Reinó Dios sobre las gentes: asentóse Dios sobre su santo trono.
देव राष्ट्रांवर राज्य करतो; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
9 Los príncipes de los pueblos se juntaron al pueblo del Dios de Abraham: porque de Dios son los escudos de la tierra; él es muy ensalzado.
अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो अत्यंत उंच आहे.

< Salmos 47 >