< Proverbios 21 >
1 COMO los repartimientos de las aguas, así está el corazón del rey en la mano de Jehová: á todo lo que quiere lo inclina.
१राजाचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे परमेश्वराच्या हातात आहे; तो त्यास वाटेल तेथे वळवतो.
2 Todo camino del hombre es recto en su opinión: mas Jehová pesa los corazones.
२प्रत्येक मनुष्याचे मार्ग त्याच्या दृष्टीने योग्य असतात, परंतु परमेश्वर अंतःकरणे तोलून पाहतो.
3 Hacer justicia y juicio es á Jehová más agradable que sacrificio.
३योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा परमेश्वरास अधिक मान्य आहेत.
4 Altivez de ojos, y orgullo de corazón, y el brillo de los impíos, son pecado.
४घमेंडखोर दृष्टी व गर्विष्ठ मन दुर्जनांच्या शेतातील उपज हे पाप उत्पन्न करतात.
5 Los pensamientos del solícito ciertamente [van] á abundancia; mas todo presuroso, indefectiblemente á pobreza.
५परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते, परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो.
6 Allegar tesoros con lengua de mentira, es vanidad desatentada de aquellos que buscan la muerte.
६लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते.
7 La rapiña de los impíos los destruirá; por cuanto no quisieron hacer juicio.
७दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील, कारण ते न्याय करण्याचे नाकारतात.
8 El camino del hombre perverso es torcido y extraño: mas la obra del limpio es recta.
८अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो, पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो.
9 Mejor es vivir en un rincón de zaquizamí, que con la mujer rencillosa en espaciosa casa.
९भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहाण्यापेक्षा, धाब्याच्या कोपऱ्यात राहणे अधिक चांगले.
10 El alma del impío desea mal: su prójimo no le parece bien.
१०दुष्टाचा जीव वाईटाची हाव धरतो; त्याच्या शेजाऱ्याला तो दया दाखवत नाही.
11 Cuando el escarnecedor es castigado, el simple se hace sabio; y cuando se amonestare al sabio, aprenderá ciencia.
११जेव्हा निंदकास शासन होते तेव्हा अज्ञानी शहाणे होतात; आणि जेव्हा सुज्ञास शिक्षण मिळते तेव्हा त्याच्या ज्ञानात वाढ होते.
12 Considera el justo la casa del impío: [cómo] los impíos son trastornados por el mal.
१२नीतिमान दुष्टाच्या घराकडे लक्ष लावतो, तो दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांना उलथून टाकतो.
13 El que cierra su oído al clamor del pobre, también él clamará, y no será oído.
१३जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही, तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही.
14 El presente en secreto amansa el furor, y el don en el seno, la fuerte ira.
१४गुप्तपणे दिलेली देणगी राग शांत करते, आणि दडवलेली देणगी तीव्र कोप दूर करते.
15 Alegría es al justo hacer juicio; mas quebrantamiento á los que hacen iniquidad.
१५योग्य न्यायाने नीतिमानाला आनंद होतो. पण तोच दुष्कर्म करणाऱ्यांवर फार मोठी भीती आणतो.
16 El hombre que se extravía del camino de la sabiduría, vendrá á parar en la compañía de los muertos.
१६जो कोणी ज्ञानाच्या मार्गापासून भटकतो, त्यास मरण पावलेल्यांच्या मंडळीत विसावा मिळेल.
17 Hombre necesitado será el que ama el deleite: y el que ama el vino y ungüentos no enriquecerá.
१७ज्याला ख्यालीखुशाली प्रिय आहे तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षरस आणि तेल प्रिय आहे तो श्रीमंत होणार नाही.
18 El rescate del justo es el impío, y por los rectos el prevaricador.
१८जो कोणी चांगले करतो त्याची खंडणी दुर्जन आहे, आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो.
19 Mejor es morar en tierra del desierto, que con la mujer rencillosa é iracunda.
१९भांडखोर आणि खूप तक्रार करून अशांती निर्माण करणाऱ्या पत्नीबरोबर राहाण्यापेक्षा वाळवंटात राहाणे अधिक चांगले.
20 Tesoro codiciable y pingüe hay en la casa del sabio; mas el hombre insensato lo disipará.
२०सुज्ञाच्या घरात मोलवान खजिना आणि तेल आहेत, पण मूर्ख मनुष्य ते वाया घालवतो.
21 El que sigue la justicia y la misericordia, hallará la vida, la justicia, y la honra.
२१जो कोणी नीतिमत्ता आणि दया करतो, त्यास आयुष्य, उन्नती आणि मान मिळेल.
22 La ciudad de los fuertes tomó el sabio, y derribó la fuerza en que ella confiaba.
२२सुज्ञ मनुष्य बलवानांच्या नगराविरूद्ध चढतो, आणि तो त्यांच्या संरक्षणाचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.
23 El que guarda su boca y su lengua, su alma guarda de angustias.
२३जो कोणी आपले तोंड व जीभ सांभाळतो, तो संकटापासून आपला जीव वाचवतो.
24 Soberbio y presuntuoso escarnecedor es el nombre del que obra con orgullosa saña.
२४गर्विष्ठ व घमेंडखोर मनुष्यास उद्दाम असे नाव आहे. तो गर्वाने उद्धट कृती करतो.
25 El deseo del perezoso le mata, porque sus manos no quieren trabajar.
२५आळशाची वासना त्यास मारून टाकते; त्याचे हात काम करण्यास नकार देतात.
26 Hay quien todo el día codicia: mas el justo da, y no desperdicia.
२६तो सर्व दिवस हाव आणि अधिक हाव धरतो, परंतु नीतिमान देतो आणि मागे धरून ठेवत नाही.
27 El sacrificio de los impíos es abominación: ¡cuánto más ofreciéndolo con maldad!
२७दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते, तर मग तो यज्ञ दुष्ट हेतूने आणतो ते किती अधिक वीट असे आहे.
28 El testigo mentiroso perecerá: mas el hombre que oye, permanecerá en su dicho.
२८खोटा साक्षीदार नाश पावेल, पण जो कोणी ऐकतो त्याप्रमाणे सर्व वेळ तसे बोलतो.
29 El hombre impío afirma su rostro: mas el recto ordena sus caminos.
२९दुष्ट मनुष्य आपले मुख धीट करतो, पण सरळ मनुष्य आपल्या मार्गाचा नीट विचार करतो.
30 No hay sabiduría, ni inteligencia, ni consejo, contra Jehová.
३०परमेश्वराविरूद्ध शहाणपण, बुद्धि किंवा युक्ती ही मुळीच उभी राहू शकत नाहीत.
31 El caballo se apareja para el día de la batalla: mas de Jehová es el salvar.
३१लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात, पण तारण परमेश्वराकडून आहे.