< 1 Samuel 11 >
1 Y SUBIÓ Naas Ammonita, y asentó campo contra Jabes de Galaad. Y todos los de Jabes dijeron á Naas: Haz alianza con nosotros, y te serviremos.
१मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व मनुष्यांनी नाहाशाला म्हटले, “आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.”
2 Y Naas Ammonita les respondió: Con esta condición haré alianza con vosotros, que á cada uno de todos vosotros saque el ojo derecho, y ponga esta afrenta sobre todo Israel.
२तेव्हा नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हाशी अशा अटीवर करार करीन की, मी तुम्हातील प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून सर्व इस्राएलाची मानहानी करीन.”
3 Entonces los ancianos de Jabes le dijeron: Danos siete días, para que enviemos mensajeros á todos los términos de Israel; y si nadie hubiere que nos defienda, saldremos á ti.
३तेव्हा याबेशच्या वडिल जनांनी त्यास म्हटले, “आम्हांला सात दिवसाचा अवकाश दे, म्हणजे इस्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू. मग जर आम्हास सोडवायला कोणी येत नसला, तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ.”
4 Y llegando los mensajeros á Gabaa de Saúl, dijeron estas palabras en oídos del pueblo; y todo el pueblo lloró á voz en grito.
४आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे येऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या; तेव्हा सर्व लोक मोठ्याने आवाज काढून रडू लागले.
5 Y he aquí Saúl que venía del campo, tras los bueyes; y dijo Saúl: ¿Qué tiene el pueblo, que lloran? Y contáronle las palabras de los hombres de Jabes.
५आणि पाहा शौल शेतातून गाईबैलांच्या मागून चालत येत होता. शौल म्हणाला, “लोकांस काय झाले? म्हणून ते रडत आहेत?” तेव्हा त्यांनी त्यास याबेशातील माणसे काय म्हणाली ते सांगितले.
6 Y el espíritu de Dios arrebató á Saúl en oyendo estas palabras, y encendióse en ira en gran manera.
६तेव्हा शौलाने या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला.
7 Y tomando un par de bueyes, cortólos en piezas, y enviólas por todos los términos de Israel por mano de mensajeros, diciendo: Cualquiera que no saliere en pos de Saúl y en pos de Samuel, así será hecho á sus bueyes. Y cayó temor de Jehová sobre el pueblo, y salieron como un solo hombre.
७मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की, “जो कोणी शौलामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल.” तेव्हा परमेश्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे होऊन एकत्र होऊन निघाले.
8 Y contólos en Bezec; y fueron los hijos de Israel trescientos mil, y treinta mil los hombres de Judá.
८मग जेव्हा त्याने बेजेकात त्यांची नोंद केली, तेव्हा इस्राएलाचे लोक तीन लाख होते, आणि यहूदाचे लोक तीस हजार होते.
9 Y respondieron á los mensajeros que habían venido: Así diréis á los de Jabes de Galaad: Mañana en calentando el sol, tendréis salvamento. Y vinieron los mensajeros, y declaráronlo á los de Jabes, los cuales se holgaron.
९तेव्हा जे दूत आले होते त्यांना त्यांनी म्हटले, “याबेश-गिलादाच्या मनुष्यांना असे सांगा की, उद्या सूर्य तापेल तेव्हा तुमची सुटका होईल.” मग दूतांनी जाऊन याबेशाच्या मनुष्यांना तसे सांगितले; तेव्हा ते आनंदीत झाले.
10 Y los de Jabes dijeron: Mañana saldremos á vosotros, para que hagáis con nosotros todo lo que bien os pareciere.
१०मग याबेशांतील माणसे नाहाशाला म्हणाली, “उद्या आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ तेव्हा तुम्हास बरे दिसेल तसे आमचे करा.”
11 Y el día siguiente dispuso Saúl el pueblo en tres escuadrones, y entraron en medio del real á la vela de la mañana, é hirieron á los Ammonitas hasta que el día calentaba: y los que quedaron fueron dispersos, tal que no quedaron dos de ellos juntos.
११मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापे पर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यातले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली.
12 El pueblo entonces dijo á Samuel: ¿Quiénes son lo que decían: Reinará Saúl sobre nosotros? Dad[nos] esos hombres, y los mataremos.
१२मग लोक शमुवेलाला म्हणाले, “शौल आम्हावर राज्य करील काय? असे जे बोलले ते कोण आहेत? ती माणसे काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.”
13 Y Saúl dijo: No morirá hoy ninguno, porque hoy ha obrado Jehová salud en Israel.
१३तेव्हा शौल बोलला, “आज कोणाही मनुष्यास जिवे मारायचे नाही कारण आज परमेश्वराने इस्राएलास सोडवले आहे.”
14 Mas Samuel dijo al pueblo: Venid, vamos á Gilgal para que renovemos allí el reino.
१४तेव्हा शमुवेलाने लोकांस म्हटले, “चला आपण गिलगालास जाऊन तेथे नव्याने राज्य स्थापन करू.”
15 Y fué todo el pueblo á Gilgal, é invistieron allí á Saúl por rey delante de Jehová en Gilgal. Y sacrificaron allí víctimas pacíficas delante de Jehová; y alegráronse mucho allí Saúl y todos los de Israel.
१५मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी परमेश्वराच्यासमोर शौलाला राजा केले आणि तेथे परमेश्वराच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले; तेव्हा तेथे शौल व इस्राएलाची सर्व माणसे यांना फार आनंद झाला.