< Romanos 11 >
1 Digo pues: ¿Ha desechado Dios a su pueblo? En ninguna manera. Porque también yo soy Israelita, de la simiente de Abraham, de la tribu de Benjamín.
१तर मी म्हणतो की, देवाने आपल्या लोकांस नाकारले आहे काय? कधीच नाही कारण मीही इस्राएली आहे, अब्राहामाच्या संतानातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे.
2 No ha desechado Dios a su pueblo, al cual antes conoció. ¿O no sabéis lo que dice en Elías la Escritura? cómo se queja a Dios contra Israel, diciendo:
२देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने नाकारले नाही. शास्त्रलेख एलीयाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की,
3 Señor, a tus profetas han muerto, y a tus altares han minado, y yo he quedado solo, y procuran quitarme mi vida.
३‘प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना मारले आहे आणि तुझ्या वेद्या खणून पाडल्या आहेत; आणि मी एकटा राहिलो आहे आणि ते माझ्या जीवावर टपले आहेत.’
4 Mas ¿qué le dice la divina respuesta? Yo me he reservado siete mil varones que no han doblado la rodilla delante de la imagen de Baal.
४पण देवाचे उत्तर त्यास काय मिळाले? ‘ज्यांनी बआलाच्या मूर्तीपुढे गुडघा टेकला नाही, असे एकंदर सात हजार लोक मी माझ्यासाठी राखले आहेत.’
5 Así también, pues, en este tiempo ha quedado un residuo según la elección de la gracia.
५मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे.
6 Y si por gracia, luego no es por obras: de otro modo la gracia ya no es gracia. Mas si por obras, ya no es gracia: de otra manera la obra ya no es obra.
६आणि जर कृपेने आहे, तर कृतीवरून नाही; तसे असेल तर कृपा ही कृपा होत नाही.
7 ¿Pues qué? Lo que buscaba Israel, aquello no ha alcanzado; mas la elección lo ha alcanzado; y los demás fueron endurecidos.
७मग काय? इस्राएल जे मिळवू पाहत आहे ते त्यास मिळाले नाही, पण निवडलेल्यांना ते मिळाले आणि बाकी अंधळे केले गेले.
8 (Como está escrito: Dióles Dios espíritu de adormecimiento, ojos con que no vean, y oídos con que no oigan; ) hasta el día de hoy.
८कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’
9 Y David dice: Séales hecha su mesa un lazo, y una red, y un tropezadero, y una retribución;
९त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की, ‘त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाळे व सापळा, आणि अडथळा व प्रतिफळ होवो.
10 Sus ojos sean oscurecidos para que no vean; y agóbiales siempre el espinazo.
१०त्यांनी पाहू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ सतत वाकव.’
11 Digo pues: ¿Tropezaron luego de tal manera que cayesen del todo? En ninguna manera; antes mas bien por la caída de ellos vino la salud a los Gentiles, para que por ellos fuesen provocados a zelos.
११मग मी विचारतो की, इस्राएलाने पडावे म्हणून त्यांना अडखळण आहे काय? तसे न होवो. पण त्यांच्या पडण्यामुळे त्यांना ईर्ष्येस चढवण्यास तारण परराष्ट्रीयांकडे आले आहे.
12 Y si la caída de ellos es la riqueza del mundo, y el menoscabo de ellos la riqueza de los Gentiles, ¿cuánto más la plenitud de ellos?
१२आता, त्यांचा अपराध हे जर जगाचे धन झाले आणि त्यांचे कमी होणे हे जर परराष्ट्रीयांची धन झाले, तर त्यांचा भरणा होणे हे त्याहून किती अधिक होईल?
13 Porque, a vosotros hablo, Gentiles, en cuanto a la verdad yo soy apóstol de los Gentiles, mi ministerio ensalzo,
१३पण, तुम्ही जे परराष्ट्रीय आहात, त्या तुमच्याशी मी बोलत आहे. ज्याअर्थी, मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्याअर्थी, मी माझ्या सेवेचे गौरव करतो.
14 Si en alguna manera provocase a emulación a los de mi carne, e hiciese salvos a algunos de ellos.
१४यहूदी म्हणजे माझ्या देहाचे आहेत त्यांना मी शक्य त्याद्वारे ईर्ष्येस चढवून त्यांच्यामधील काहींचे तारण करावे.
15 Porque si el desechamiento de ellos es la reconciliación del mundo, ¿qué será el recibimiento de ellos, sino vida de los muertos?
१५कारण त्यांचा त्याग म्हणजे जगाशी समेट आहे तर त्यांचा स्वीकार म्हणजे मृतांतून जीवन नाही काय?
16 Porque si el primer fruto es santo, también lo es la masa; y si la raíz es santa, también lo son los ramos.
१६कारण पहिला उंडा जर पवित्र आहे तर तसाच सगळा गोळा आहे आणि मूळ जर पवित्र आहे तर तसेच फाटे आहेत.
17 Y si algunos de los ramos fueron quebrados, y tú siendo acebuche has sido injerido en lugar de ellos, y has sido hecho participante de la raíz, y de la grosura de la oliva;
१७आणि जैतुनाचे काही फाटे जर तोडले गेले आणि तू रानटी जैतून असता, त्यामध्ये कलम करून जोडला गेलास आणि तू त्या जैतुनाच्या पौष्टीकतेच्या मुळात जर सहभागी झालास
18 No te jactes contra los ramos; mas si te jactas, sabe que no sustentas tú a la raíz, sino la raíz a ti.
१८तर त्या फाट्यांविरुद्ध अभिमान मिरवू नकोस आणि जरी अभिमान मिरवलास तरी तू मुळाला उचलले नसून मुळाने तुला उचलले आहे.
19 Dirás pues: Los ramos fueron quebrados para que yo fuese injerido.
१९मग तू म्हणशील की, मला कलम करून जोडण्यासाठी ते फाटे तोडले गेले.
20 Bien: por su incredulidad fueron quebrados, mas tú por la fe estás en pie. No te ensoberbezcas, antes teme;
२०बरे, ते अविश्वासामुळे तोडले गेले आणि तू विश्वासामुळे स्थिर आहेस, ह्यात मोठेपणा मानू नकोस. पण भीती बाळग;
21 Porque si Dios no perdonó a los ramos naturales, teme que a ti tampoco te perdone.
२१कारण, जर देवाने मूळच्या फाट्यांची गय केली नाही तर तो तुझीही गय करणार नाही.
22 Mira pues la bondad, y la severidad de Dios: la severidad ciertamente para con los que cayeron; mas la bondad para contigo, si permanecieres en su bondad; de otra manera tú también serás cortado.
२२तर तू देवाची दया आणि छाटणी बघ. जे पडले त्यांच्यावर छाटणी, पण, तू जर दयेत राहिलास तर तुझ्यावर दया; नाही तर, तूही छाटला जाशील.
23 Y aun ellos, si no permanecieren en incredulidad, serán injeridos; que poderoso es Dios para volverlos a injerir.
२३आणि ते जर अविश्वासात राहिले नाहीत तर तेही कलम करून जोडले जातील; कारण देव त्यांना पुन्हा कलम करून जोडण्यास समर्थ आहे.
24 Porque si tú fuiste cortado del natural acebuche, y contra natura fuiste injerido en la buena oliva, ¿cuánto más estos, que son los ramos naturales, serán injeridos en su oliva?
२४कारण तुला मूळच्या रानटी जैतुनांतून कापून, जर निसर्गाविरुद्ध, चांगल्या जैतुनाला कलम करून जोडले आहे, तर जे नैसर्गिक फाटे आहेत ते, किती विशेषेकरून, आपल्या मूळच्या जैतुनाला कलम करून जोडले जातील?
25 Porque no quiero, hermanos, que ignoréis este misterio, para que no seáis acerca de vosotros mismos arrogantes; y es, que el endurecimiento en parte ha acontecido a Israel, hasta tanto que entrase la plenitud de los Gentiles.
२५बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की, तुम्ही या रहस्याविषयी अज्ञानी असावे. ते असे की, परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएलात काही अंशी अंधळेपण उद्धवले आहे.
26 Y así todo Israel será salvo; como está escrito: Vendrá de Sión el Libertador, y apartará de Jacob la impiedad.
२६आणि सर्व इस्राएल अशाप्रकारे तारले जाईल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘सियोनापासून उद्धारक येईल, आणि याकोबातून अभक्ती घालवील.
27 Y éste es mi concierto con ellos, cuando quitaré sus pecados.
२७आणि मी त्यांची पापे दूर करीन. तेव्हा माझा त्यांच्याबरोबर हा करार होईल.’
28 Así que, en cuanto al evangelio, son enemigos por causa de vosotros; mas en cuanto a la elección, son muy amados por causa de los padres.
२८ते सुवार्तेच्या बाबतीत तुमच्यामुळे वैरी आहेत पण ते दैवी निवडीच्या बाबतीत पूर्वजांमुळे प्रिय आहेत.
29 Porque sin arrepentimiento son las mercedes y la vocación de Dios.
२९कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात.
30 Porque como también vosotros en algún tiempo no creísteis a Dios, mas ahora habéis alcanzado misericordia por ocasión de la incredulidad de ellos;
३०कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता पण आता इस्त्राएलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे.
31 Así también estos ahora no han creído, para que en vuestra misericordia, ellos también alcancen misericordia.
३१त्याचप्रमाणे आता तेही अवमान करीत आहेत; म्हणजे तुमच्यावरील दयेच्या द्वारे त्यांच्यावर दया केली जावी.
32 Porque Dios encerró a todos en incredulidad, para tener misericordia de todos. (eleēsē )
३२कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे. (eleēsē )
33 ¡Oh profundidad de las riquezas de la sabiduría, y de la ciencia de Dios! ¡Cuán incomprensibles son sus juicios, e investigables sus caminos!
३३अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे न्याय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत?
34 Porque ¿quién entendió la mente del Señor? ¿o quién fue su consejero?
३४असे नियमशास्त्रात लिहिले आहे; ‘कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे? किंवा त्याचा सल्लागार कोण होता?
35 ¿O quién le dio a él primero, para que le sea pagado?
३५किंवा कोणी त्यास आधी दिले आणि ते त्यास परत दिले जाईल?’
36 Porque de él, y por él, y en él son todas las cosas. A él sea gloria por los siglos. Amén. (aiōn )
३६कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्यास युगानुयुग गौरव असो. आमेन. (aiōn )