< Jueces 17 >
1 Fue un varón del monte de Efraím, que se llamaba Micas:
१एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात एक मनुष्य होता; त्याचे नाव मीखा.
2 El cual dijo a su madre: Los mil y cien siclos de plata, que te fueron hurtados, y tú maldecias, oyéndolo yo, he aquí que yo tengo este dinero: yo lo había tomado. Entonces la madre dijo: Bendito seas de Jehová, hijo mío.
२आणि त्याने आपल्या आईला म्हटले, “जी अकराशे शेकेल रुप्याची नाणी तुझ्याजवळून घेतली गेली होती,” आणि ज्यामुळे तू शाप उच्चारला होता, आणि तो मी ऐकला! पाहा ती रुप्याची नाणी माझ्याजवळ आहेत; मीच ती चोरून घेतली होती. त्याची आई म्हणाली, “माझ्या मुला, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो!”
3 Y después que él hubo tornado a su madre los mil y cien siclos de plata, su madre dijo: yo he dedicado este dinero a Jehová de mi mano para ti, hijo mío, para que hagas imagen de talla y de fundición: por tanto yo ahora te lo vuelvo.
३मग त्याने ती अकराशे शेकेल रुप्याची नाणी आपल्या आईला परत दिली; तेव्हा त्याच्या आईने म्हटले, “मी माझ्या मुलासाठी कोरीव लाकडी मूर्ती व ओतीव धातूची मूर्ती करण्यासाठी आपल्या हाताने हे रुपे परमेश्वरास अर्पण म्हणून वेगळी करते. तर आता मी ही तुला परत देते.”
4 Mas volviendo él los dineros a su madre, su madre tomó doscientos siclos de plata, y diólos al fundidor, y él le hizo de ellos una imagen de talla y de fundición, la cual fue puesta en casa de Micas.
४त्याने ती रुप्याची नाणी आपल्या आईला परत दिल्यावर त्याच्या आईने दोनशे शेकेल रुपे घेऊन ते सोनाराला दिले, आणि त्याने त्याची कोरीव व ओतीव मूर्ती केली. नंतर ती मीखाच्या घरी ठेवली.
5 Y tuvo este hombre Micas casa de dioses: e hízose hacer efod, y terafim, y consagró uno de sus hijos, y fuéle por sacerdote.
५मीखा या मनुष्याचे एक मूर्तीचे देवघर होते, आणि त्याने याजकाचे एफोद व कुलदेवता केल्या होत्या; आणखी त्याने आपल्या एका मुलाचे याजक म्हणून समर्पण केले होते.
6 En estos días no había rey en Israel: mas cada uno hacía como mejor le parecía.
६त्या दिवसात इस्राएलावर कोणी राजा नव्हता; प्रत्येकाने आपापल्या दिसण्यात जे योग्य, ते केले.
7 Y había un mancebo de Belén de Judá, de la tribu de Judá, el cual era Levita, y peregrinaba allí.
७तेव्हा यहूदातील बेथलेहेमातला यहूदी घराण्यातला तरुण लेवी तेथे आपले कर्तव्य पार पाडत राहत होता.
8 Este varón se había partido de la ciudad de Belén de Judá, para ir a vivir donde hallase: y llegando al monte de Efraím, vino a casa de Micas, para de allí hacer su camino.
८नंतर तो मनुष्य यहूदातल्या बेथलेहेम नगरातून निघाला, आपल्याला राहण्यास कोठे जागा मिळेल ते शोधू लागला. प्रवास करत तो एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आला.
9 Y Micas le dijo: ¿De dónde vienes? Y el Levita le respondió: Soy de Belén de Judá, y voy a vivir donde hallare.
९मग मीखा त्यास म्हणाला, “तू कोठून आलास?” तेव्हा तो मनुष्य त्यास म्हणाला, “मी बेथलेहेमातला यहूदी लेवी आहे; आणि मला राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून मी प्रवास करत आहे.”
10 Entonces Micas le dijo: Quédate en mi casa, y serme has en lugar de padre y de sacerdote: y yo te daré diez siclos de plata por un cierto tiempo, y el ordinario de vestidos, y tu comida. Y el Levita se quedó.
१०तेव्हा मीखा त्यास म्हणाला, “तू माझ्याबरोबर राहा आणि माझा सल्लागार व याजक असा हो. म्हणजे मी तुला प्रती वर्षी दहा रुप्याची नाणी व एक पोशाख व तुझे अन्न देईन. मग तो लेवी आत गेला.”
11 Y el Levita acordó de morar con aquel hombre, y él le tenía como a uno de sus hijos.
११तो लेवी त्या मनुष्याबरोबर राहायला तयार झाला, आणि तो तरुण त्याच्याजवळ त्याच्या एका पुत्रासारखा झाला.
12 Y Micas consagró al Levita, y aquel mancebo le servía de sacerdote: y estuvo en casa de Micas.
१२आणि मीखाने त्या लेवीला पवित्र कर्तव्य करण्यास वेगळे केले, आणि तो तरुण त्याचा याजक झाला आणि तो मीखाच्या घरी राहिला.
13 Y Micas dijo: Ahora sé que Jehová me hará bien, pues que el Levita es hecho mi sacerdote.
१३नंतर मीखा बोलला, “आता मला कळले की, परमेश्वर माझे चांगले करील, कारण हा लेवी माझा याजक झाला आहे.”