< Jeremías 40 >
1 Palabra que fue a Jeremías de Jehová después que Nabuzardán, capitán de la guarda, le envió desde Rama, cuando le tomó que estaba preso con esposas entre toda la transmigración de Jerusalem, y de Judá, que iban cautivos a Babilonia.
१यरूशलेम व यहूदा येथील जे सर्व कैदी बंदिवान करून बाबेलास नेले होते त्यांच्यामध्ये यिर्मया बेड्यांनी बांधलेला होता. तेव्हा राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने त्यास रामा येथून पाठवून दिल्यावर जे वचन परमेश्वराकडून यिर्मयाकडे आले ते हे.
2 Y el capitán de la guarda tomó a Jeremías, y díjole: Jehová tu Dios habló este mal contra este lugar;
२प्रमुख अंगरक्षकाने यिर्मयाला घेतले आणि तो त्यास म्हणाला, “तुझा देव परमेश्वर ह्याने हे अरिष्ट या स्थळावर येणार म्हणून भाकीत केले.
3 Y trájolo, e hizo Jehová según que había dicho; porque pecasteis contra Jehová, y no oísteis su voz, por tanto os ha venido esto.
३आणि परमेश्वराने ते आणले आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याने केले आहे; कारण तुम्ही लोकांनी परमेश्वराविरुध्द पाप केले आहे आणि त्याची वाणी पाळली नाही. म्हणून या गोष्टी तुम्हा लोकांविरूद्ध घडल्या आहेत.
4 Y ahora yo te he soltado hoy de las esposas que tenías en tus manos: si te está bien venir conmigo a Babilonia, ven, y yo pondré mis ojos sobre ti. Y si no te está bien venir conmigo a Babilonia, déjalo. Mira, toda la tierra está delante de ti; a lo que mejor y más cómodo te pareciere ir, vé.
४पण आता पाहा, मी तुझ्या हातात असलेल्या बेड्यापासून तुला आज सोडवत आहे. जर तुझ्या दृष्टीने तू माझ्याबरोबर बाबेलास येणे चांगले असले तर, ये, आणि मी तुझी काळजी घेईन. पण जर तुझ्या दृष्टीने तू माझ्याबरोबर बाबेलास येणे चांगले नसेल तर मग येऊ नको. तुझ्यादृष्टीने जेथे चांगले आणि योग्य आहे तेथे तू जा.
5 Y aun él no había respondido que se volvería, cuando él le dijo: Vuélvete a Godolías, hijo de Ahicam, hijo de Safán, al cual el rey de Babilonia ha puesto sobre todas las ciudades de Judá, y vive con él en medio del pueblo, o adonde te pareciere más cómodo de ir, vé. Y dióle el capitán de la guarda presentes y dones, y le envió.
५जेव्हा यिर्मयाने काही उत्तर दिले नाही, नबूजरदान म्हणाला, शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने त्यास यहूदातील नगरांचा अधिकारी नेमले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याच्याबरोबर लोकांमध्ये राहा. किंवा जेथे कोठे तुझ्या दृष्टीने तुला योग्य वाटेल तेथे तू जा.” राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाने त्यास अन्न व बक्षीस दिले आणि त्यास दूर पाठवून दिले.
6 Y vino Jeremías a Godolías, hijo de Ahicam, a Maspat, y moró con él en medio del pueblo que había quedado en la tierra.
६मग यिर्मया, मिस्पा येथे अहीकामाचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे गेला. तो देशात मागे राहिलेल्या लोकांमध्ये जाऊन राहिला.
7 Y todos los príncipes del ejército que estaban por el campo, ellos y sus hombres, oyeron como el rey de Babilonia había puesto a Godolías, hijo de Ahicam, sobre la tierra, y que le había encomendado los hombres, y las mujeres, y los niños, y los pobres de la tierra, los que no fueron traspasados en Babilonia.
७आता यहूदाच्या सैन्यातील काही सेनापतींनी जे अजून अंगणात होते ते आणि त्यांच्या मनुष्यांनी ऐकले की, बाबेलाच्या राजाने अहीकामाचा मुलगा गदल्या ह्यास, देशावर अधिपती म्हणून नेमले आहे. त्यांनी हेही ऐकले की, देशात अगदी गरीब पुरुष, स्त्रिया व मुले ह्यांना कैद करून बाबेलला नेले नव्हते जे मागेच राहिले होते त्यांना त्याच्या ताब्यात दिले आहे.
8 Y vinieron a Godolías en Maspat, es a saber, Ismael, hijo de Natanías, y Johanán, y Jonatán, hijos de Carée, y Sareas, hijo de Taneumet, y los hijos de Ofi, Netofatita, y Jezonías, hijo de Maacati, ellos y sus hombres.
८मग ते मिस्पा येथे गदल्याकडे गेले. ती माणसे नथन्याचा मुलगा इश्माएलाची होती; कारेहाचे मुले योहानान व योनाथान; तन्हुमेथाचा मुलगा सराया; रफैची मुले नटोफाथी आणि माकाथाचा मुलगा याजन्या ते व त्यांची माणसे.
9 Y juróles Godolías, hijo de Ahicam, hijo de Safán, a ellos y a sus hombres, diciendo: No tengáis temor de servir a los Caldeos: habitád en la tierra, y servíd al rey de Babilonia, y habréis bien.
९तेव्हा शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या त्यांना व त्यांच्या मनुष्यांना शपथ घेऊन आणि त्यांना म्हणाला, खास्दी अधिकऱ्यांची सेवा करण्यास घाबरु नका. देशात वस्ती करा आणि बाबेलाच्या राजाची सेवा करा आणि असे केल्याने तुमचे भले होईल.
10 Y veis aquí que yo habito en Maspat para estar delante de los Caldeos que vendrán a nosotros; y vosotros cogéd el vino, y el pan, y el aceite, y ponédlo en vuestros almacenes, y quedáos en vuestras ciudades que habéis tomado.
१०आणि पाहा, जे खास्दी आम्हाजवळ येतील त्यांना भेटण्यास मी मिस्पात राहीन. म्हणून तुम्ही द्राक्षरस, उन्हाळी फळ व तेल यांचे उत्पादन करून आपल्या पात्रात साठवून ठेवावे. जी नगरे तुम्ही ताब्यात घेतली आहेत त्यामध्ये तुम्ही राहा.
11 Y asimismo todos los Judíos que estaban en Moab, y entre los hijos de Ammón, y en Edom, y los que estaban en todas las tierras, oyeron decir como el rey de Babilonia había concedido resto de Judá, que había puesto sobre ellos a Godolías, hijo de Ahicam, hijo de Safán.
११त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशात जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलाच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,
12 Y tornáronse todos los Judíos de todas las partes adonde habían sido echados, y vinieron en tierra de Judá a Godolías en Maspat, y cogieron vino y muy mucho pan.
१२तेव्हा जे सर्व प्रत्येक ठिकाणी पांगले होते ते सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पात गदल्याकडे आले. त्यांनी द्राक्षरस आणि उन्हाळी फळांचा हंगाम मोठ्या विपुलतेने साठा केला.
13 Y Johanán, hijo de Carée, y todos los príncipes de los ejércitos que estaban en el campo, vinieron a Godolías en Maspat.
१३कारेहाचा मुलगा योहानान व खेड्यापाड्याच्या प्रदेशातील सैन्याचे सर्व अधिकारी मिस्पा येथे गदल्याकडे आले.
14 Y dijéronle: ¿No sabes de cierto como Baalis, rey de los hijos de Ammón, ha enviado a Ismael, hijo de Natanías para matarte? Mas Godolías, hijo de Ahicam, no los creyó.
१४ते त्यास म्हणाले, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस याने नथन्याचा मुलगा इश्माएल ह्याला तुला मारण्यासाठी पाठविले आहे, हे तू जाणतोस काय?” पण अहीकामचा मुलगा गदल्या याने त्यावर विश्वास ठेवला नाही.
15 Y Johanán hijo de Carée, habló a Godolías en secreto en Maspat, diciendo: Yo iré ahora, y heriré a Ismael, hijo de Natanías, y hombre no lo sabrá; ¿por qué te ha de matar, y todos los Judíos que se han recogido a ti se derramarán, y perecerá la resta de Judá?
१५मग मिस्पा येथे एकांतात कारेहाचा मुलगा योहानान गदल्याशी बोलला की, “मला नथन्याचा मुलगा इश्माएल याला ठार मारण्याची परवानगी दे. कोणी माझ्यावर संशय घेणार नाही. त्याने तुला का मारावे? जे सर्व यहूदी तुझ्याभोवती गोळा झाले आहेत त्यांना देशात पांगण्याची आणि यहूदाचे उरलेले अवशेष नष्ट होण्याची परवानगी का देतोस?”
16 Y Godolías, hijo de Ahicam, dijo a Johanán, hijo de Carée: No hagas esto; porque falso es lo que tú dices de Ismael.
१६पण अहीकामाचा मुलगा गदल्या हा कारेहाचा मुलगा योहानान ह्यास म्हणाला, “तू ही गोष्ट करू नकोस, कारण इश्माएलाबद्दल तू खोट सांगत आहेस.”