< Oseas 1 >
1 Palabra de Jehová que fue a Oséas, hijo de Beerí, en días de Ozías, Joatán, Acaz, Ezequías, reyes de Judá; y en días de Jeroboam, hijo de Joas, rey de Israel.
१होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएलमध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता.
2 El principio de la palabra de Jehová con Oséas. Y dijo Jehová a Oséas: Vé, tómate una mujer fornicaria, e hijos de fornicaciones; porque la tierra fornicará fornicando de en pos de Jehová.
२हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला, “जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील कारण परमेश्वराचा त्याग करणे हे जारकर्म हा देश करीत आहे.”
3 Y fue, y tomó a Gomer, hija de Diblaim, la cual concibió, y le parió un hijo.
३म्हणून होशेयने ने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला.
4 Y díjole Jehová: Pónle por nombre Jezrael; porque de aquí a poco yo visitaré las sangres de Jezrael sobre la casa de Jehú, y haré cesar el reino de la casa de Israel.
४परमेश्वर होशेयला म्हणाला, त्याचे नाव इज्रेल ठेव, कारण काही वेळानंतर मी येहूच्या घराण्याला त्यांनी इज्रेल येथे केलेल्या रक्तपातामुळे शिक्षा करणार आहे व इस्राएल घराण्याच्या राज्याचा शेवट करणार आहे.
5 Y acaecerá que en aquel día yo quebraré el arco de Israel en el valle de Jezrael.
५त्या दिवशी मी इज्रेलच्या दरीत इस्राएलचे धनुष्य मोडेन.
6 Y concibió aun, y parió una hija; y díjole: Pónle por nombre Lo-ruhama; porque nunca más tendré misericordia de la casa de Israel, mas del todo los quitaré.
६गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली तेव्हा परमेश्वर होशेय ला म्हणाला हिचे नांव लो-रुहामा ठेव कारण यापुढे मी इस्राएल राष्ट्रावर दया करणार नाही व त्यास क्षमा करणार नाही.
7 Y de la casa de Judá tendré misericordia, y salvarlos he en Jehová su Dios; y no los salvaré con arco, ni con espada, ni con batalla, ni con caballos, ni caballeros.
७तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई, घोडे किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही तर त्यांना स्वबळाने सोडवेन.
8 Y después de haber destetado a Lo-ruhama, concibió, y parió un hijo.
८मग लो-रुहामाचे दुध तुटल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला मुलगा झाला.
9 Y dijo: Pónle por nombre Lo-ammi; porque vosotros no sois mi pueblo, ni yo seré vuestro.
९मग परमेश्वर म्हणाला, त्याचे नांव लो-अम्मी ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाही आणि मी तुमचा देव नाही.
10 Y será el número de los hijos de Israel como la arena de la mar, que ni se puede medir ni contar. Y será que donde se les decía: Vosotros no sois mi pueblo; les sea dicho: Hijos del Dios viviente.
१०जरी इस्राएलच्या लोकांची संख्या समुद्राच्या वाळूकणांसारखी असेल जी मोजता येत नाही हे असे घडेल की, जिथे तुम्ही माझे लोक नव्हते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील.
11 Y los hijos de Judá y de Israel serán congregados en uno, y levantarán para sí una cabeza, y subirán de la tierra; porque el día de Jezrael es grande.
११यहूदाचे लोक व इस्राएलचे लोक एकत्र येऊन आपणावर एक पुढारी नेमतील व त्या देशातून निघून येतील तेव्हा इज्रेलाचा दिवस महान होईल.