< 2 Crónicas 13 >
1 A los diez y ocho años del rey Jeroboam reinó Abías sobre Judá,
१इस्राएलचा राजा यराबामाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला.
2 Y reinó tres años en Jerusalem. El nombre de su madre fue Micaia, hija de Uriel de Gabaa. Y hubo guerra entre Abías y Jeroboam.
२त्याने यरूशलेमेत तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाची आई गिबा नगरातील उरीएलची ती कन्या. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई झाली.
3 Y Abías ordenó batalla con el ejército de los valerosos en la guerra, cuatrocientos mil hombres escogidos: y Jeroboam ordenó batalla contra él con ochocientos mil hombres escogidos, fuertes y valerosos.
३अबीयाच्या सैन्यात निवडक चार लाख बलवान व धाडसी योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामाकडे आठ लाख सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला.
4 Y levantóse Abías sobre el monte de Semerón, que es en los montes de Efraím, y dijo: Oídme Jeroboam, y todo Israel:
४एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील समाराइम पर्वतावर उभे राहून अबीया म्हणाला, “यराबाम आणि समस्त इस्राएल लोकांनो, ऐका,
5 ¿No sabéis vosotros, que Jehová Dios de Israel dio el reino a David sobre Israel perpetuamente, a él y a sus hijos en alianza de sal?
५दावीद आणि त्याचे पुत्र यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलाच्या परमेश्वर देवानेच त्यांना आधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या,” देवाने दाविदाशी तसा मिठाचा करारच केला आहे.
6 ¿Y que Jeroboam, hijo de Nabat, siervo de Salomón, hijo de David, se levantó y se rebeló contra su señor:
६पण नबाटाचा पुत्र यराबामाने त्याचा स्वामी जो राजा त्याच्याविरुध्द बंड केले. नबाट हा दावीदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक होता.
7 Y que se allegaron a él hombres vanos, e hijos de Belial: y pudieron más que Roboam, hijo de Salomón; porque Roboam era mozo, y tierno de corazón, y no se esforzó delante de ellos?
७मग कुचकामी आणि वाईट मनुष्यांशी यराबामाशी दोस्ती झाली. यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा पुत्र रहबाम जेव्हा याच्या विरूद्ध होती. रहबाम जेव्हा तरुण आणि अनुभवी होता. त्यास यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही.
8 Y ahora vosotros consultáis para fortificaros contra el reino de Jehová, que está en mano de los hijos de David; y sois muchos, y tenéis con vosotros los becerros de oro, que Jeroboam os hizo por dioses.
८आता तुम्ही लोकांनी परमेश्वराचे राज्य म्हणजे दाविदाच्या पुत्राची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. तुमची सेना मोठी आहे आणि यराबामाने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत.
9 ¿No echasteis vosotros los sacerdotes de Jehová, los hijos de Aarón, y los Levitas, y os habéis hecho sacerdotes a la manera de los pueblos de las tierras, que cualquiera venga a consagrarse con un becerro, hijo de vaca, y siete carneros, y sea sacerdote de los que no son dioses?
९परमेश्वराचे याजक आणि लेवी यांना तुम्ही हाकलून लावले नाही का? हे याजक अहरोनाचे व लेवीचे वंशज आहेत त्यांच्या जागी तुम्ही आपले याजक नेमले नाही का? अशा गोष्टी इतर देशातले लोक करतात. कोणीही उठून एक गोऱ्हा किंवा सात एडके आणून स्वत: वर संस्कार केला की तो जे खोटे देव आहेत त्यांचा याजक बनतो.
10 Mas a nosotros, Jehová es nuestro Dios y no le dejamos: y los sacerdotes que ministran a Jehová son los hijos de Aarón, y los Levitas en la obra:
१०“पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनाचे वंशज आहेत लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात.
11 Los cuales queman a Jehová los holocaustos cada mañana y cada tarde, y los perfumes aromáticos, y ponen los panes sobre la mesa limpia, y el candelero de oro con sus candilejas para que ardan cada tarde; porque nosotros guardamos la observancia de Jehová nuestro Dios: mas vosotros le habéis dejado.
११परमेश्वरास ते होमार्पणे करतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वरास सोडले आहे.
12 Y, he aquí, Dios está con nosotros por cabeza, y sus sacerdotes, y las trompetas del júbilo, para que suenen contra vosotros. Oh hijos de Israel, no peleéis contra Jehová el Dios de vuestros padres, porque no os sucederá bien.
१२पाहा खुद्द परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. तोच आमचा शास्ता असून त्याचे याजक आमच्या बाजूला आहेत. तुम्ही जागे व्हावे व परमेश्वराकडे यावे म्हणून देवाचे याजक कर्णे वाजवत आहेत. इस्राएल लोकांनो, आपल्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या विरुध्द लढू नका, कारण त्यामध्ये तुम्हास यश येणार नाही.”
13 Y Jeroboam hizo una emboscada al derredor, para venir a ellos por las espaldas: y la emboscada estaba a las espaldas de Judá, y ellos delante.
१३पण यराबामाने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. ह्याप्रकारे ते यहूदाच्या आघाडीस होते व त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला.
14 Entonces como miró Judá, he aquí que tenían batalla delante y a las espaldas. Y clamaron a Jehová, y los sacerdotes tocaron las trompetas.
१४यहूदातील या सैन्याने जेव्हा आपल्या भोवताली पाहिले तेव्हा यराबामाच्या सैन्याने आपल्याला मागून पुढून वेढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा यहूदा लोकांनी परमेश्वराचा धावा सुरु केला आणि याजकांनी कर्णे वाजवले.
15 Y los de Judá alzaron grita. Y como ellos alzaron grita, Dios venció a Jeroboam y a todo Israel delante de Abías y de Judá.
१५मग अबीयाच्या सैन्यातील लोकांनी जयघोष केला त्याचवेळेस देवाने यराबामाच्या सैन्याचा पराभव केला. अबीयाच्या यहूदा सैन्याने यराबामाच्या इस्राएली सैन्याचा पाडाव केला.
16 Y huyeron los hijos de Israel delante de Judá: y Dios los entregó en sus manos.
१६इस्राएल लोकांनी यहूदासमोरुन पळ काढला देवाने यहूदाच्या हातून इस्राएल लोकांचा पराभव केला.
17 Y Abías y su pueblo hacían en ellos gran mortandad: y cayeron heridos de Israel quinientos mil hombres escogidos.
१७अबीयाने केलेल्या या दारुण पराभवात इस्राएलचे पाच लाख योध्दे मारले गेले.
18 Así fueron humillados los hijos de Israel en aquel tiempo: y los hijos de Judá se fortificaron; porque estribaban en Jehová el Dios de sus padres.
१८अशाप्रकारे त्यावेळी इस्राएल लोक हरले आणि यहूदा जिंकले. आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवावर विसंबून राहिल्यामुळेच यहूदा सैन्याने विजय मिळवला.
19 Y siguió Abías a Jeroboam, y tomó sus ciudades, a Bet-el con sus aldeas, a Jesana con sus aldeas, a Efrón con sus aldeas.
१९अबीयाच्या सैन्याने यराबामाच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामाकडून अबीयाच्या सैन्याने जिंकला.
20 Y nunca más Jeroboam tuvo fuerza en los días de Abías: y Jehová le hirió, y murió.
२०अबीयाच्या हयातीत पुन्हा यराबाम डोके वर काढू शकला नाही. परमेश्वराने यराबामावर प्रहार केला आणि तो मेला.
21 Mas Abías se fortificó: y tomóse catorce mujeres, y engendró veinte y dos hijos, y diez y seis hijas.
२१अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा पत्नी केल्या. त्यास बावीस पुत्र आणि सोळा कन्या झाल्या.
22 Lo demás de los hechos de Abías, sus caminos, y sus negocios, está escrito en la historia de Addo profeta.
२२इद्दो या भविष्याद्याच्या नोंद वह्यांमध्ये अबीयाने केलेल्या इतर सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत.