< Isaías 66 >
1 Yavé dice: El cielo es mi trono, y la tierra el estrado de mis pies. ¿Dónde está la casa que me edificarán, y dónde el lugar de mi reposo?
१परमेश्वर असे म्हणतो, “आकाश माझे सिंहासन आणि पृथ्वी पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी कोठे घर बांधाल? मला विश्रांतीची जागा कुठे आहे?”
2 Mi mano hizo todas estas cosas. Por tanto existen todas ellas, dice Yavé. Pero Yo miraré al humilde y de espíritu contrito, y que tiembla ante mi Palabra.
२“सर्व गोष्टी माझ्या हाताने निर्माण केल्या, या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत.” परमेश्वर असे म्हणतो. “पण जो दीन व अनुतापी आत्म्याचा आहे, आणि माझ्या वचनाने थरथर कापतो अशा मनुष्यास मी मान्य करतो.”
3 El que mata un buey es como el que mata a un hombre. El que sacrifica un cordero es como el que desnuca un perro. El que da ofrenda vegetal es como el que ofrece sangre de cerdo. El que invoca y ofrece incienso es como el que bendice a un ídolo. Todos ellos escogieron sus procedimientos, y sus almas se deleitan en sus repugnancias.
३जो यज्ञासाठी बैल कापतो तो मनुष्यघातकासारखा आहे, जो कोकऱ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान तोडणाऱ्यासारखा आहे. जो अन्नार्पण अर्पितो तो डुकराचे रक्त अर्पणारा असा आहे, जो धूप जाळतो तो मूर्तीची स्तुती करणारा असा आहे, त्यांनी स्वत: आपले मार्ग निवडले आहेत आणि त्यांचा जीव त्याच्या अमंगळ पदार्थाच्या ठायी संतोष पावतो.
4 Yo también escogeré escarnios para ellos y traeré sobre ellos lo que temen. Porque llamé, y nadie respondió. Hablé, y no escucharon. Hicieron lo malo ante mis ojos y escogieron lo que no me deleita.
४अशाच प्रकारे मी त्यांची शिक्षा निवडेन. ते ज्या गोष्टींना फार भितात तिच त्यांच्यावर आणीन. कारण जेव्हा मी बोलावले तेव्हा कोणी उत्तर दिले नाही. जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले आणि ज्यात मला संतोष नाही ते त्यांनी निवडले.
5 Escuchen la Palabra de Yavé ustedes los que tiemblan ante su Palabra: Dicen sus hermanos que los aborrecen y los echan fuera por causa de mi Nombre: ¡Que Yavé sea glorificado! Pero Él se mostrará para gozo de ustedes, y ellos serán avergonzados.
५जे तुम्ही परमेश्वराच्या वचनाने थरथर कापता ते तुम्ही त्याचे वचन ऐका, तुमच्या ज्या भावांनी तुमचा द्वेष केला, ज्यांनी माझ्या नावा करीता तुम्हास बाहेर टाकले आहे, ते म्हणाले की आम्ही तुमचा हर्ष पाहावा असा परमेश्वराचा महिमा होवो. पण ते लाजवले जातील.
6 Un murmullo sale de la ciudad. Sale del Templo. Es el sonido de Yavé, Quien da el pago a sus enemigos.
६नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे. परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे.
7 Antes que estuviera de parto, dio a luz. Antes que le vinieran los dolores, dio a luz un varón.
७“तिला कळा येण्यापुर्वीच ती प्रसूत झाली, तिला वेदना लागण्याच्या आधीच तिला पुरुषसंतान झाले.”
8 ¿Quién oyó cosa semejante? ¿Quién vio esas cosas? ¿Concebirá la tierra en un instante? ¿Nacerá una nación de una vez? Pues cuando Sion estuvo de parto dio a luz sus hijos.
८अशी गोष्ट कोणी ऐकली काय? कोणी अशी गोष्ट पाहिली आहे काय? एकाच दिवसात राष्ट्र जन्म घेते काय? एक राष्ट्र एका क्षणात स्थापन होईल का? कारण सियोन प्रसूतिवेदना पावली तेव्हाच ती आपली मुले प्रसवली.
9 Yo, Quien abre la matriz, ¿no incitaré a que dé a luz? dice Yavé. Yo, que permito engendrar, ¿impediré el nacimiento? dice tu ʼElohim.
९परमेश्वर म्हणतो, मी आईला प्रसूतिच्या वेळेत आणून तिचे मुल जन्मविणार नाही काय? जो मी जन्मास आणतो तो मी गर्भस्थान बंद करीन काय? तुमचा देव असे म्हणतो.
10 ¡Alégrense con Jerusalén! ¡Gócense con ella todos los que la aman! Regocíjense todos los que están de duelo por ella,
१०यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा. जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा.
11 para que mamen, se sacien de los pechos de sus consolaciones y succionen gozosos la abundancia de su seno.
११कारण तुम्ही तिच्या सांत्वनांचे स्तन चोखून तृप्त व्हावे, आणि तिच्या महिम्याच्या विपूलतेचे दूध ओढून घेऊन संतुष्ट व्हावे.
12 Porque Yavé dice: Yo extiendo sobre ella paz como un río y el esplendor de las naciones como un torrente que se desborda. Mamarán, serán llevadas en brazos, y sobre las rodillas las acariciarán.
१२परमेश्वर असे म्हणतो “मी तुमच्यावर नदीप्रमाणे हे वैभव पसरवेल, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा वाहणारा ओघ तुमच्या कडे येईल. तुम्ही ते चोखाल, तुम्ही कडेवर वाहिले जाल आणि मांड्यांवर खेळविले जाल.
13 Como a uno a quien su madre consuela, así Yo los consolaré. En Jerusalén serán consolados.
१३आई जशी मुलाला सांत्वन देते, तसा मी तुम्हास सांत्वन देईन, आणि यरूशलेमेत तुम्ही सांत्वन पावाल.”
14 Al verlo, su corazón se regocijará y sus huesos rejuvenecerán como la hierba tierna. La mano de Yavé se manifestará a sus esclavos, y su ira sobre sus enemigos.
१४तुम्ही हे पाहाल आणि तुमचे हृदय हर्ष पावेल, आणि हिरवळीप्रमाणे तुमचे हाडे नवी होतील. आणि परमेश्वराचा हात त्याच्या सेवकाकडे आहे हे कळेल, पण त्याच्या शत्रूंचा त्यास राग येईल.
15 Porque ciertamente Yavé viene en fuego y como remolino de viento con sus carrozas, para descargar su ira con furor y su reprensión con llama de fuego.
१५कारण पाहा! परमेश्वर अग्नीसहीत येईल, आणि अग्नीद्वारे आपला क्रोध प्रकट करावा, आणि धमकीसोबत ज्वाला निघाव्यात म्हणून त्याचे रथ वावटळीसारखे होतील.
16 Porque Yavé juzgará con fuego y espada a todo hombre. Los muertos de Yavé serán multiplicados.
१६कारण परमेश्वर अग्नीने आणि तलवारीने सर्व मनुष्यावर न्याय करेल. परमेश्वर मारले जातील ते खूप असतील.
17 Los que se consagran y se purifican para entrar a los huertos, tras uno que está en el centro, los que comen carne de cerdo y de reptiles repugnantes como el ratón, serán juntamente aniquilados, dice Yavé.
१७जे डुकराचे मांस खातात व अमंगळ गोष्टी व उंदीर खाऊन, बागांच्यामध्ये झाडा खाली आपणाला पवित्र करतात आपणांस स्वच्छ करतात, ते एकत्र नाश होतील असे परमेश्वर म्हणतो.
18 Porque Yo conozco sus obras y sus pensamientos. Llegará el tiempo de congregar a todas las naciones y lenguas. Vendrán y contemplarán mi gloria.
१८कारण मला त्यांचे विचार आणि कल्पना ठाऊक आहेत. ती वेळ येणार आहे जेव्हा मी सर्व राष्ट्रांना व भाषांना एकत्र करीन. आणि ते येतील व माझे वैभव पाहतील.
19 Haré una señal entre ellas, y enviaré a los que huyeron de ellas a Tarsis, a Etiopía, a Libia, a Mesec, a Rosh, a Tubal y a Javán, a las costas lejanas que no oyeron mi fama ni vieron mi gloria, para que proclamen mi gloria entre las naciones.
१९काही लोकांवर मी खूण करीन. मी या वाचविलेल्या काही लोकांस तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तुबाल, यवान आणि दूरदूरच्या द्वीपात, ज्यांनी माझी कीर्ती ऐकली नाही व माझे वैभव पाहिले नाही त्याच्याकडे पाठवीन. ते राष्ट्रांमध्ये माझे वैभव प्रकट करतील.
20 Como los hijos de Israel traen su ofrenda en utensilios puros a la Casa de Yavé, así traerán de todas las naciones a todos sus hermanos en caballos, en carrozas, en literas, en mulas y dromedarios hasta mi Santa Montaña en Jerusalén, como ofrenda a Yavé, dice Yavé.
२०आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावांना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमेला, घोड्यांवरून, खेचरांवर, उंटावरून, रथांतून आणि गाड्यांतून आणतील. ते म्हणजे जणू काही इस्राएलाच्या लोकांनी निर्मळ तबकातून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील.
21 Entre ellos escogeré sacerdotes y levitas, dice Yavé.
२१“ह्यातीलच काही लोकांस मी याजक व लेवी होण्यासाठी निवडीन.” परमेश्वर असे म्हणतो.
22 Porque permanecerán delante de Mí como los nuevos cielos y la nueva tierra que haré, dice Yavé. Así permanecerán su linaje y su nombre.
२२कारण मी जे नवीन आकाशे व पृथ्वी निर्माण करीन, ती माझ्या समोर अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले माझ्याबरोबर टिकून राहतील, परमेश्वर असे म्हणतो.
23 Sucederá de nueva luna en nueva luna, y de sábado en sábado, que toda criatura vendrá para postrarse delante de Mí, dice Yavé.
२३आणि एका महिन्या पासून दुसऱ्या महिन्या पर्यंत, एका शब्बाथापासून दुसऱ्या शब्बाथापर्यंत, सर्व लोक माझ्या समोर नमन करायला येत जातील, परमेश्वर असे म्हणतो.
24 Saldrán y mirarán los cadáveres de los hombres que se rebelaron contra Mí: Su gusano no morirá, ni su fuego se extinguirá. Serán una repugnancia para toda la humanidad.
२४“आणि ज्या मनुष्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला त्यांची प्रेते ते पाहातील, कारण त्यांचा किडा मरणार नाही आणि त्यांचा अग्नी कधी विझणार नाही. आणि ते मनुष्ये सर्व मनुष्यास घृणास्पद होतील.”