< Isaías 47 >
1 Baja, siéntate en el polvo, oh virgen hija de Babilonia. Siéntate en el suelo sin trono, oh hija de los caldeos, porque ya no serás llamada tierna y delicada.
१बाबेलाच्या कुमारी कन्ये, खाली ये आणि धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासनाशिवाय जमिनीवर बस. तुला यापुढे सुंदर आणि नाजूक म्हणणार नाहीत.
2 Toma las piedras del molino y muele el grano. Quítate tu velo y despójate de tu ropa larga. Descubre piernas y cruza los ríos.
२जाते घे आणि पीठ दळ; तुझा बुरखा काढ, तुझ्या झग्याचा घोळ काढून टाक, तुझे पाय उघडे कर, नद्या ओलांडून जा.
3 Que se descubra tu desnudez y se vea tu vergüenza. Tomaré venganza y no habrá quien interceda.
३तुझी नग्नता उघडी होईल, होय, तुझी लज्जा दिसेल. मी सूड घेईल आणि कोणा मनुष्यास सोडणार नाही.
4 Nuestro Redentor, cuyo Nombre es Yavé de las huestes, el Santo de Israel, dice:
४“आमचा उद्धारक, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे.”
5 Siéntate y calla. Entra en la oscuridad, oh hija de los caldeos, porque nunca más te volverán a llamar soberana de reinos.
५खास्द्यांच्या कन्ये शांत बस आणि अंधकारात जा; तुला यापुढे राज्याची राणी म्हणणार नाहीत.
6 Airado contra mi pueblo, profané mi heredad y la entregué en tu mano. No tuviste compasión de ellos. Pusiste un yugo muy pesado sobre los ancianos
६मी माझ्या लोकांवर रागावलो होतो; मी माझे वतन अशुद्ध केले आहे आणि मी ते तुझ्या हातात दिले आहे, पण तू त्यांना दया दाखवली नाही; तू वृद्धांवर फार जड ओझे ठेवले आहे.
7 y dijiste: Seré una reina para siempre. Estas cosas hiciste sin considerar ni recordar el posterior resultado de ellas.
७तू म्हटले, मी त्यांच्यावर सर्वोच्च राणीप्रमाणे चिरकाल राज्य करीन. म्हणून तू यागोष्टी मनात घेतल्या नाहीत, किंवा यांचा परिणाम लक्षात घेतला नाही.
8 Ahora pues, escucha esto, oh mujer sensual que vives confiadamente y dices en tu corazón: Yo soy y ninguno hay además de mí. No quedaré viuda, ni experimentaré la pérdida de hijos.
८तेव्हा आता हे ऐका, अगे विलासिनी जी तू सुरक्षितपणे बसली आहेस, जी तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणीच नाही; मी कधीच विधवा अशी बसणार नाही किंवा मला मुले गमवल्याचा अनुभव कधी येणार नाही.
9 Estas dos cosas te vendrán de repente en un mismo día: viudez y pérdida de hijos, a pesar de la multitud de tus hechicerías y de tus numerosos encantamientos.
९परंतु अपत्यहीनता व विधवापण या दोन्ही गोष्टी एका दिवशी एका क्षणात तुझ्यावर येतील; तुझे जादूटोणा आणि पुष्कळ मंत्रतंत्र व ताईत यांना न जुमानता तुजवर जोराने येतील.
10 Porque te confiaste en tu maldad y dijiste: Nadie me ve. Tu sabiduría y tu misma ciencia te engañaron. Dijiste en tu corazón: Yo y nadie más.
१०तू आपल्या दुष्कृत्यांवर विश्वास ठेवलीस; तू म्हणालास, मला कोणी पाहणार नाही; तुझे शहाणपण आणि ज्ञान यांनी तुला बहकावले, पण तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणी नाही.
11 Vendrá sobre ti un mal que no podrás conjurar. De repente caerá sobre ti una destrucción de la cual no sabes.
११तुझ्यावर संकटे येतील; तुझ्या आपल्या मंत्रातंत्राने ते घालवून देण्यास तू समर्थ नाहीस. तुझ्यावर विपत्ती येईल; ती तू निवारण करू शकणार नाहीस. तुला समजण्या पूर्वीच अचानक तुझ्यावर संकटे येतील.
12 Persiste ahora en tus encantamientos y en tus numerosas hechicerías, con las cuales te desvelaste desde tu juventud. Quizás puedas sacar algún provecho, quizás puedas ocasionar terror.
१२ज्या तुझ्या पुष्कळ मंत्रतंत्रात आणि जादूटोणात आपल्या लहानपणापासून विश्वासाने त्याचे पठन करून त्यामध्ये टिकून राहीला; कदाचित त्यामध्ये तू यशस्वी होशील, कदाचित तू विपत्तीला घाबरून दूर होशील.
13 Estás agotada con tus numerosos consejos. ¡Que se levanten los astrónomos, los que observan las estrellas y los pronosticadores mensuales, y que te salven de lo que vendrá sobre ti!
१३तू आपले बहुत सल्लागार करून थकली आहेस; आणि तुला जे काय घडणार आहे त्यापासून तुझे रक्षण करो. जे आकाशाचा तक्ता आणि ताऱ्यांकडे पाहून नव चंद्रदर्शन जाहीर करतात, ती माणसे उभे राहून तुझे रक्षण करोत.
14 Ciertamente serán como pasto seco, y el fuego los consumirá. No podrán librar su vida del poder de las llamas. No quedarán brasas para calentarse, ni lumbre ante la cual se sienten.
१४पाहा, ते धसकटाप्रमाणे होतील; अग्नी त्यांना जाळील; त्यांना स्वतःला ज्वालेच्या हातातून वाचवता येणार नाही; तेथे ती ज्वाला तिच्यासमोर बसण्यास किंवा हा कोळसा त्यांना शेकण्यासाठी योग्य नाही.
15 Así fueron para ti aquellos con quienes te afanaste, aquellos con quienes trataste desde tu juventud. Andarán errantes, cada uno vagará por su lado. No habrá quien te salve.
१५ज्यांच्यासाठी तू मेहनत केली, तुझ्या तरुणपणापासून तू त्यांच्याबरोबर व्यापार केलास; ते सर्व तुला सोडून जातील. ते प्रत्येकजण आपापल्या मार्गाने भरकटले; तुला वाचवायला कोणीही नाही.