< Ezequiel 24 >
1 El año noveno, el mes décimo, a los diez días del mes, la Palabra de Yavé vino a mí:
१बाबेलातील बंदिवासाच्या नवव्या वर्षी पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणाला,
2 Hijo de hombre, escribe la fecha de este día, pues en este mismo día el rey de Babilonia sitió a Jerusalén.
२“मानवाच्या मुला, तुझ्यासाठी आजचा दिवस आणि तारीख लिहून ठेव, याच दिवशी बाबेलचा राजा येऊन यरूशलेमेला वेढा देईल.
3 Habla una parábola a la casa rebelde: ʼAdonay Yavé dice: Pon la olla, colócala, y echa agua en ella.
३आणि या फितुर घराण्या विरुध्द म्हणी बोल, दाखले देऊन सांग, प्रभू परमेश्वर देव असे सांगत आहे. एक जेवण शिजवण्याचे भांडे घे व त्यामध्ये पाणी ओत.
4 Echa los trozos que te pertenecen en ella: trozos selectos, la pierna y la espaldilla. Llénala de huesos escogidos.
४मांडी व खांद्याचे तुकडे, अन्नांचे तुकडे त्यामध्ये गोळा कर, त्यामध्ये हाडे टाकून भरणा कर.
5 Toma lo mejor del rebaño. Apila la leña debajo de la olla para que hierva bien. Cocina sus huesos dentro de ella.
५कळपातले चांगले कोकरु घे, हाडे शिजवण्यासाठी खाली लाकडांचा जाळ कर, त्यांना चांगले शिजू दे त्यातील हाडांनाही शिजू दे.
6 Pues ʼAdonay Yavé dice: ¡Ay de la ciudad sanguinaria, de la oxidada olla de cocinar cuyo óxido no despega! Vacíala poco a poco. No eches suerte sobre ella
६यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहे, या रक्तपाती शहराचा निषेध असो, ती गंज चढलेल्या भांड्यासारखी आहे; त्याचा गंज निघत नाही, त्याच्या तुकड्यातून तुकडा काढून त्यातून काही निघत नाही.
7 porque su sangre está dentro de ella. La derramó sobre una roca lisa, no sobre la tierra para que el polvo la cubriera,
७तिने सर्वांच्यामध्ये रक्तपात केला तिने गुळगुळीत खडकावर रक्त सांडले जमिनीच्या धुळीने त्यास झाकू दिले नाही.
8 a fin de causarme furor y llegue a vengarme. Yo puse su sangre en roca lisa para que no sea cubierta.
८म्हणून संतापाच्या त्वेषाने मी तिचे रक्त खडकावर सांडले जमीनीच्या धुळीने त्यास झाकू दिले नाही.
9 Por tanto ʼAdonay Yavé dice: ¡Ay de la ciudad sanguinaria! Yo también haré la hoguera grande.
९यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहेः या रक्तपाती शहराचा निषेध असो, मी जळणासाठी लाकडाचा मोठा साठा करीन.
10 Apilen la leña y enciendan el fuego para cocinar bien la carne. Cocinen la carne, hagan la salsa y quemen los huesos.
१०लाकडाचा साठा वाढवा, आग जाळा, मांस शिजवा या ऋतूत रस्सा चांगला बनव, हाडेही भाजू देत.
11 Luego pónganla vacía sobre las brasas para que el cobre se caliente y brille, su impureza se derrita y su óxido se consuma.
११मग अग्नीवर भांडे रिकामेच असू दे अशासाठी की त्यातील गाळ तप्त अग्नीने जळून जाईल.
12 Pero vano es el esfuerzo, pues no salió de ella su mucho óxido. Solo en el fuego será consumido su óxido.
१२ती कष्टाने खूप कामाने थकली भागली होती, पण अग्नीने तिची झिज झाली होती.
13 Hay perversidad en tu impureza, porque intenté purificarte, pero no estás purificada. No serás purificada de tu impureza hasta que Yo descargue mi furor sobre ti.
१३तुझा लज्जास्पद स्वभाव हा तुझ्या अशुद्धतेत आहे, कारण मी तुला शुद्ध करु पाहिले तरी पण तू शुद्ध झालीच नाही व अशुद्धच राहिल्याने माझा त्वेष तुझ्यावर आला आहे.
14 Yo, Yavé, hablé. Se cumplirá. Yo lo cumpliré. No retrocederé ni me compadeceré ni me pesará. Te juzgarán según tu conducta y según tus obras, dice ʼAdonay Yavé.
१४मी परमेश्वर देव असे जाहीर करतो हे असे घडेलच व ते मी करेलच, मी कडक धोरण सोडून देईन, तुझे मार्ग आणि तुझे कार्य हेच तुझा न्याय करतील; असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.
15 La Palabra de Yavé vino a mí:
१५मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला,
16 Hijo de hombre, mira, voy a quitarte de golpe el deleite de tus ojos. No lamentes, ni llores, ni corran tus lágrimas.
१६मानवाच्या मुला पाहा! तुझ्या डोळ्यांना जे उत्तम वाटते ते तुझ्यापासून मी काढून घेईन, तरी तू दुःख करु नये व आसवेही गाळू नये व आपली वाहने फाडू नयेत.
17 Gime en silencio, no hagas el lamento por los muertos, átate el turbante y ponte las sandalias en tus pies. No te cubras el labio ni comas pan de duelo.
१७तू मुकाट्याने खेद व्यक्त कर मृतांसाठी दुःख व्यक्त करु नको, आपल्या डोक्यात फेटा राहू दे, व पायात जोडा घाल आपले तोंड झाकू नको दुःखाच्या समयी पत्नीच्या मुत्युनंतर जे पुरुष अन्न पाठवतात ते खाऊ नको.”
18 Por tanto hablé al pueblo por la mañana, y al llegar la noche murió mi esposa. En la mañana hice como me fue mandado.
१८मग पहाटे मी माझ्या लोकांशी बोललो आणि माझी पत्नी सायंकाळी वारली. तेव्हा मला जी आज्ञा झाली तसे मी सकाळी पालन केले.
19 El pueblo me decía: ¿No nos dirás qué significan para nosotros estas cosas que haces?
१९लोकांनी मला विचारले, “तू आम्हास याचा अर्थ काय हे सांगणार नाहीस जे काही तू करत आहेस ते?”
20 Y les contesté: La Palabra de Yavé vino a mí:
२०मग मी त्यांना म्हणालो, परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
21 Dí a la Casa de Israel: ʼAdonay Yavé dice: Ciertamente voy a profanar mi Santuario, que es la exaltación, la fuerza de ustedes, el deseo de sus ojos y deleite de su alma. Sus hijos y sus hijas que queden caerán a espada.
२१इस्राएलाच्या घराण्याला सांग, परमेश्वर देव असे सांगत आहे पाहा! घमंड तुझी ताकत झाली आहे तुझ्या डोळ्यांना जे बरे वाटते ते तुझ्या जीवाच्या वासनेने माझे पवित्रस्थान विटाळले आहे! आणि जी तुझी मुले व ज्या तुझ्या मुली मागे उरलेल्या होत्या त्या तलवारीने खाली पडल्या आहेत.
22 Entonces harán lo que yo hice. No se cubrirán su labio, ni comerán pan de duelo.
२२मग मी जे केले तेच तुम्ही कराल; तू आपले तोंड खाली घालणार नाही, दुःखाच्या समयी लोक देतात ती खावयाची भाकर खाणार नाही.
23 Sus turbantes estarán en sus cabezas y sus sandalias en sus pies. No lamentarán ni llorarán, sino desfallecerán en sus iniquidades y gemirán unos con otros.
२३त्यापेक्षा आपल्या डोक्यात फेटा आणि पायात जोडा घाला तू खेद व आसवे गाळणार नाहीस, तुझ्या अपराधासाठी वितळले जाशील प्रत्येक त्यांच्या भावंडासाठी विव्हळ होईल.
24 Ezequiel les servirá de señal. Ustedes harán todo lo que él hizo. Cuando esto ocurra, sabrán que Yo soy ʼAdonay Yavé.
२४मग यहेज्केल तुम्हास चिन्ह होईल जे काही त्याने केले तेच तुम्ही कराल हे जेव्हा होईल तेव्हा तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
25 Y tú, hijo de hombre, no estarás el día cuando Yo les quite su fortaleza, el gozo de su gloria, el deleite de sus ojos y el anhelo de sus almas y [cuando les quite] a sus hijos e hijas.
२५“पण तू मानवाच्या मुला, ज्या दिवशी त्यांच्यापासून त्यांचा आश्रय ताब्यात घेतला, जो त्यांचा आनंद, गर्व जो त्यांनी पाहिला व ज्याची इच्छा त्यांनी केली जेव्हा मी त्यांच्या मुलामुलींना त्यांच्या पासून घेऊन गेलो.
26 Aquel día un fugitivo llegará a ti para comunicar la noticia a tus oídos.
२६त्या दिवशी शरणार्थी येतील व तुला बातमी देतील.
27 Aquel día tu boca será abierta para hablar al fugitivo. Hablarás y ya no estarás mudo. Les servirás de señal. Y sabrán que Yo soy Yavé.
२७त्या दिवशी शरणार्थी व निभावलेले येतील आणि ते तुला सांगतील तू आता फार काळ गप्प रहाणार नाही, असा तू चिन्ह होशील म्हणजे, त्यांना समजेल मी परमेश्वर देव आहे.”