< 2 Reyes 6 >

1 Los hijos de los profetas dijeron a Eliseo: Mira, el lugar donde vivimos delante de ti es estrecho para nosotros.
एकदा संदेष्ट्याची मुले अलीशाला म्हणाली, “आम्ही राहतो ती जागा आम्हास अपुरी पडते.
2 Te rogamos que nos permitas ir al Jordán, para que cada uno tome de allí un madero, y nos hagamos allí un lugar donde podamos vivir. Y él dijo: Vayan.
यार्देन नदीवर जाऊन आम्ही एकेकजण एकेक तुळई आणू आणि आपल्यासाठी तिथे राहायला आश्रम बांधावा म्हणून आम्हास परवानगी द्या. अलीशा म्हणाला, जा आणि कामाला लागा.”
3 Y dijo uno: Te rogamos que vayas con tus esclavos. Y él respondió: Yo iré.
एकजण म्हणाला, “आमच्याबरोबर चला.” अलीशा म्हणाला, “ठीक आहे, येतो.”
4 Así que fue con ellos, y cuando llegaron al Jordán, cortaron unos árboles.
तेव्हा अलीशा त्या संदेष्ट्यांच्या मुलांबरोबर गेला. ते यार्देन नदी जवळ आले आणि लाकडे तोडायला लागले.
5 Aconteció que mientras uno de ellos cortaba un árbol, se le cayó el hierro al agua, y gritó: ¡Ay, ʼadón mío! ¡Era prestada!
तुळई तोडत असताना एकाची लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले. तेव्हा तो ओरडला, “स्वामी, मी तर ती उसनी मागून आणली होती.”
6 Y el varón de ʼElohim preguntó: ¿Dónde cayó? Y le mostró el lugar. Entonces él cortó un palo, lo echó allí e hizo flotar el hierro.
नंतर देवाच्या मनुष्याने विचारले, “ती कोठे पडली?” तेव्हा त्याने, ती जागा दाखवली. तेव्हा अलीशाने मग एक लाकूड तोडून त्या जागी पाण्यात टाकले. त्याबरोबर ते लोखंड पाण्यावर तरंगू लागले.
7 Y dijo: Tómalo. Y él extendió su mano y lo tomó.
अलीशा म्हणाला, “ते उचलून घे.” मग त्याने पुढे हात करून ते उचलले.
8 El rey de Siria tenía guerra contra Israel. Al consultar con sus esclavos dijo: En tal lugar estará mi campamento.
अरामाच्या राजाने इस्राएलाशी लढाई करत असताना त्याने आपल्या सेवकाबरोबर मसलत केली, राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा.”
9 Entonces el varón de ʼElohim envió a decir al rey de Israel: Cuídate de pasar por tal lugar, porque los sirios van a bajar allí.
पण तेव्हा देवाच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा.” त्याठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य चढाई करणार आहे.
10 El rey de Israel envió gente al lugar que el varón de ʼElohim le indicó. Así fue advertido y él fue vigilante allí, no una ni dos veces.
१०ज्याठिकाणी जाऊ नकोस असा देवाच्या मनुष्याने इस्राएलाच्या राजाला निरोप पाठवला होता, तेथे त्याने आपली माणसे पाठवली. असा आपला बचाव त्याने एकदोनदा नाहीतर अनेकदा केला होता.
11 El corazón del rey de Siria estaba turbado por tal motivo. Llamó a sus esclavos y les preguntó: ¿No me dirán ustedes quién de los nuestros está a favor del rey de Israel?
११यावरुन अरामाच्या राजाला संताप आला. त्याने पुन्हा आपल्या सेवकांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “इस्राएलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा.”
12 Y uno de sus esclavos respondió: No, rey y ʼadón mío. Es el profeta Eliseo que está en Israel, quien revela al rey de Israel las palabras que tú hablas en el interior de tu aposento.
१२तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, “स्वामी, कोणीही हेर नाही, पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्राएलाचा तो संदेष्टा अलीशाच त्यांच्या राजाला सांगतो.”
13 Y él dijo: Vayan y averigüen dónde está, para que yo envíe a detenerlo. Y le fue dicho: Mira, está en Dotán.
१३तेव्हा अरामाचा राजा म्हणाला, “कोठे आहे तो अलीशा. त्यास पकडायला मी माणसे पाठवतो!” तेव्हा अरामाच्या राजाच्या सेवकांनी तो दोथानमध्ये असल्याचे सांगितले.
14 Entonces el rey envió allá caballería, carruajes y un gran ejército, los cuales llegaron de noche y rodearon la ciudad.
१४मग अरामाच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दोथान कडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला.
15 Cuando el esclavo del varón de ʼElohim madrugó para salir, ahí estaba un ejército con caballos y carruajes rodeando la ciudad. Entonces el esclavo le dijo: ¡Ay, ʼadón mío! ¿Qué haremos?
१५देवाच्या मनुष्याचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो, रथ व घोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले. अलीशाचा सेवक अलीशाला म्हणाला, “स्वामी, आता आपण काय करावे?”
16 Él respondió: No temas, porque más son los que están con nosotros que los que están con ellos.
१६अलीशा म्हणाला, “घाबरु नको! त्याच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य कितीतरी मोठे आहे!”
17 Eliseo oró: ¡Oh Yavé, te ruego que abras sus ojos para que mire! Y Yavé abrió los ojos del esclavo, y miró. Ciertamente la montaña estaba repleta de caballos y carruajes de fuego alrededor de Eliseo.
१७आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्यास नीट दिसेल.” परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्यास अलीशाच्या भोवती अग्नीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले.
18 Cuando bajaron contra él, Eliseo oró a Yavé: Te ruego que hieras a esta gente con ceguera. Y Él los hirió con una ceguera total según la palabra de Eliseo.
१८हे अग्नीरथ आणि अग्नीचे घोडे खाली अलीशाजवळ उतरले. अलीशाने परमेश्वराची प्रार्थना करून म्हटले, “तू या लोकांस आंधळे करून टाकावेस अशी मी तुला विनंती करतो.” अलीशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले.
19 Entonces Eliseo les dijo: Este no es el camino, ni ésta es la ciudad. Síganme y los llevaré al varón que buscan. Y los condujo a Samaria.
१९अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हास हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमाग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो मनुष्य मी तुम्हास दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले.
20 Cuando llegaron a Samaria, sucedió que Eliseo dijo: Oh Yavé, abre los ojos de éstos para que puedan mirar. Y Yavé abrió sus ojos, y miraron. Ciertamente estaban en medio de Samaria.
२०ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.” परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनामध्ये असल्याचे कळले.
21 Y cuando el rey de Israel los vio, preguntó a Eliseo: ¿Los mato? Padre mío, ¿Los mato?
२१इस्राएलच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले. राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी यांना मारु का? त्यांना ठार करु का?”
22 Y él dijo: No los mates. ¿Matarías tú a los que capturaste con tu espada y con tu arco? Sírveles pan y agua, para que coman y beban, y vuelvan a sus ʼadón.
२२अलीशा म्हणाला, “नाही, यांना मारु नको. लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते. या अरामी सैन्याला खायला प्यायला दे. थोडी भाकर आणि पाणी दे मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.
23 Entonces preparó una gran comida para ellos. Cuando comieron y bebieron, los dejó ir, y regresaron a sus ʼadón. Nunca más volvieron bandas armadas de Siria a la tierra de Israel.
२३इस्राएलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या अरामी सैन्याचे खाणेपिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठवले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा अरामी सैन्याच्या टोळ्या इस्राएलावर आल्या नाहीत.”
24 Después de esto, sucedió que Ben-adad, rey de Siria, reunió todo su ejército, salió y sitió a Samaria.
२४यानंतर, अरामाचा राजा बेन-हदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला.
25 Hubo una gran hambruna en Samaria, pues estaba sitiada, hasta el punto que la cabeza de un asno era vendida por 80 piezas de plata, y 0,3 litros de estiércol de paloma por cinco piezas de plata.
२५त्यामुळे शोमरोनामध्ये महगाई वाढली. गाढवाचे मुंडके ऐंशी रुपयांना आणि कबुतराची पावशेर विष्ठा पांच रुपयांना विकली जाऊ लागली.
26 Sucedió que cuando el rey de Israel pasaba por el muro, una mujer clamó a él: ¡Auxilio, mi ʼadón, oh rey!
२६इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन फिरत होता. तेव्हा एका स्त्रीने त्यास मोठ्याने ओरडून म्हटले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरून मला मदत करा!”
27 Y él dijo: Si Yavé no te salva, ¿de dónde te salvo yo? ¿Con algo del granero o del lagar?
२७इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाहीतर मी तुला कोठून मदत करु? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”
28 Y el rey agregó: ¿Qué tienes? Y ella respondió: Esta mujer me dijo: Entrega a tu hijo para que lo comamos hoy, y mañana comeremos el mío.
२८मग राजाने तिची विचारपूस केली. ती म्हणाली, “ही स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्यास मारुन खाऊ मग उद्या आपण माझा मुलगा खाऊ.
29 Cocimos, pues, a mi hijo y lo comimos. Al día siguiente le dije: Entrega a tu hijo para que lo comamos, pero ella escondió a su hijo.
२९तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्यास आपण खाऊ.’ पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.”
30 Cuando el rey escuchó las palabras de la mujer, mientras pasaba por el muro, rasgó sus ropas. Ciertamente llevaba ropa áspera sobre su cuerpo.
३०स्त्रीचे हे बोलणे ऐकून राजा इतका व्यथित झाला की त्याने आपले कपडे फाडले. तो तेथून पुढे गेला तेव्हा त्याने गोणताट घातलेले लोकांनी पाहिले
31 Entonces dijo: ¡Así me haga ʼElohim, y aun me añada, si la cabeza de Eliseo, hijo de Safat, permanece hoy sobre él!
३१राजा म्हणाला, “आज दिवस मावळेपर्यंत शाफाटचा मुलगा अलीशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो!”
32 Eliseo estaba sentado en su casa. Los ancianos estaban sentados con él cuando el rey envió a uno de sus hombres. Pero antes que el mensajero llegara a él, Eliseo dijo a los ancianos: ¿Vieron como este hijo de homicida envió a cortarme la cabeza? Observen cuando llegue el emisario, cierren la puerta e impídanle la entrada. ¿No se escucha tras él el ruido de los pasos de su ʼadón?
३२राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडिलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांस म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा त्यास लोटून दार लावून घ्या. त्याच्या मागोमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहुल मला लागली आहे!”
33 Aún hablaba con ellos, cuando ciertamente el mensajero bajaba hacia él, y Eliseo dijo: Reconozco que esta desgracia es de parte de Yavé. ¿Para qué espero más a Yavé?
३३अलीशा हे बोलत असातानाच दूत त्याच्याजवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहावी?”

< 2 Reyes 6 >