< 2 Reyes 15 >
1 El año 27 de Jeroboam, rey de Israel, comenzó a reinar Azarías, hijo de Amasías, rey de Judá.
१इस्राएलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राज्य करू लागला.
2 Tenía 16 años cuando comenzó a reinar, y reinó 52 años en Jerusalén. El nombre de su madre fue Jecolía, de Jerusalén.
२अजऱ्या राज्य करू लागला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता. आणि त्याने यरूशलेमामध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या असून ती यरूशलेमेतील होती.
3 Hizo lo recto ante Yavé, conforme a todo lo que hizo su padre Amasías.
३अजऱ्याचे वर्तन आपल्या वडिलांप्रमाणेच परमेश्वराने सांगितले तसे उचित होते. आपले वडिल अमस्या जसे वागले तसाच हाही वागला.
4 Sin embargo, los lugares altos no fueron quitados, pues el pueblo aún sacrificaba y quemaba incienso en los lugares altos.
४उंचस्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत, त्याठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
5 Yavé hirió al rey, y fue leproso hasta el día de su muerte, y vivió en una casa aislada. Jotam, hijo del rey, administraba la casa del rey y gobernaba al pueblo de la tierra.
५परमेश्वराने राजाला दु: ख दिले आणि अजऱ्याला कुष्ठरोग होऊन त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तो वेगळा घरी राहिला. राजाचा मुलगा योथाम त्याच्या घरावर अधिकारी होऊन तोच देशातील लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.
6 Todo lo que hizo Azarías, ¿no está escrito en el rollo de las Crónicas de los reyes de Judá?
६अजऱ्याच्या राहिलेल्या गोष्टी, आणि त्याने जे केले, ते सर्व यहूदाच्या राजांचा इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले नाही काय?
7 Azarías descansó con sus antepasados, y lo sepultaron con sus antepasados en la Ciudad de David. Reinó en su lugar su hijo Jotam.
७आणि अजऱ्या आपल्या पूर्वजांबरोबर निजला. त्यांनी त्यास दाविदाच्या नगरात त्याच्या पूर्वजांसोबत पूरले. त्याचा मुलगा योथाम हा त्यानंतर राजा झाला.
8 El año 38 de Azarías, rey de Judá, comenzó a reinar Zacarías, hijo de Jeroboam, y reinó seis meses sobre Israel en Samaria.
८यहूदाचा राजा अजऱ्या याच्या अडतिसाव्या वर्षी यराबामाचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनात सहा महिने राज्य केले.
9 Hizo lo malo ante Yavé, como hicieron sus antepasados. No se apartó de los pecados de Jeroboam, hijo de Nabat, con los cuales estimuló a pecar a Israel.
९जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच याने केली.
10 Salum, hijo de Jabes, conspiró contra él. Lo hirió delante del pueblo y lo mató, y reinó en su lugar.
१०मग याबेशाचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट करून त्यास लोकांच्या समोर मारून ठार केले. आणि तो त्याच्या जागेवर राजा झाला.
11 Los demás hechos de Zacarías ciertamente están escritos en el rollo de las Crónicas de los reyes de Israel.
११जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या इस्राएलच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.
12 Ésta fue la Palabra que Yavé habló a Jehú: Tus hijos se sentarán en el trono de Israel hasta la cuarta generación. Y sucedió así.
१२अशा रीतीने परमेश्वराचे जे वचन त्याने येहूला सांगितले होते ते असे की, “तुझे वंशज चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील,” आणि तसेच झाले.
13 Salum, hijo de Jabes, comenzó a reinar el año 39 de Uzías, rey de Judá, y reinó un mes en Samaria.
१३याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा, यहूदाचा राजा उज्जीया याचे एकोणचाळीसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनात एक महिना राज्य केले.
14 Manahem, hijo de Gadi, subió de Tirsa a Samaria, hirió a Salum, hijo de Jabes, lo mató y reinó en su lugar.
१४गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून वर शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा मुलगा शल्लूम याला मारून ठार केले आणि स्वत: त्याच्या जागेवर राजा झाला.
15 Los demás hechos de Salum, y la conspiración que tramó, ciertamente están escritos en el rollo de las Crónicas de los reyes de Israel.
१५आणि शल्लूमच्या राहिलेल्या गोष्टी, त्याने केलेला कट, हे सर्व इस्राएल राजाच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले आहे.
16 En aquel tiempo Manahem atacó a Tirsa, a todos los que estaban en ella y en sus alrededores, porque ellos no le abrieron [las puertas]. Por eso la atacó y abrió el vientre a todas las mujeres embarazadas.
१६मनहेमने तिफसाह तसेच त्यातले सर्वजण, तसेच तिरसापासून त्याच्या सीमेमधले सर्वजण जीवे मारले, कारण लोकांनी त्यास नगराची वेस उघडून दिली नाही, म्हणून त्यांने त्यांना मारले. त्याने त्या नगरातल्या सर्व गर्भवती स्त्रियांनाही कापून टाकले.
17 El año 39 de Azarías, rey de Judá, comenzó a reinar Manahem, hijo de Gadi, sobre Israel, y reinó diez años en Samaria.
१७यहूदाचा राजा अजऱ्या याच्या शासनाच्या एकोणचाळिसाव्या वर्षात गादीचा मुलगा मनहेम इस्राएलवर राज्य करु लागला. मनहेमने शोमरोनात दहा वर्षे राज्य केले.
18 Hizo lo malo ante Yavé, y en todo su tiempo no se apartó de los pecados de Jeroboam, hijo de Nabat, con los cuales estimuló a pecar a Israel.
१८मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अध: पात झाला तीच पापे मनहेमने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात केली, त्यापासून तो फिरला नाही.
19 Pul, rey de Asiria, llegó contra la tierra, y Manahem dio a Pul 33 toneladas de plata para que la mano de él estuviera a favor de Manahem, a fin de fortalecer el reino bajo su dominio.
१९अश्शूरचा राजा पूल देशावर आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे, या इराद्याने मनहेमने पूलला हजार किक्कार चांदी दिली.
20 Manahem impuso este dinero a Israel por medio de un tributo a todos los poderosos y opulentos: 550 gramos de plata por cada uno, para entregarlos al rey de Asiria. Con eso el rey de Asiria se retiró, y no permaneció en la tierra.
२०हा पैसा उभा करायला मनहेमने इस्राएलातील श्रीमंत लोकांवर कर बसवला. त्याने प्रत्येकाला पन्नास शेकेल चांदी कर द्यायला लावला. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.
21 Todo lo que hizo Manahem, ¿no está escrito en el rollo de las Crónicas de los reyes de Israel?
२१मनहेमच्या पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नाही काय?
22 Manahem reposó con sus antepasados, y su hijo Pecaía reinó en su lugar.
२२मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांसोबत झोपी गेला. त्यानंतर त्याचा मुलगा पेकह्या नवीन राजा झाला.
23 El año 50 de Azarías, rey de Judá, comenzó a reinar Pecaía, hijo de Manahem, en Israel, y reinó en Samaria dos años.
२३अजऱ्याच्या यहूदावरील राज्याच्या पन्नासाव्या वर्षी मनहेमचा मुलगा पेकह्या शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने दोन वर्षे राज्य केले.
24 Hizo lo malo ante Yavé. No se apartó de los pecados de Jeroboam, hijo de Nabat, con los cuales estimuló a pecar a Israel.
२४परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच पेकह्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचे अध: पतन झाले तीच पापे पेकह्याने केली.
25 Conspiró contra él su comandante Peca, hijo de Remalías, junto con Argob, Arie y 50 hombres de los hijos de los galaaditas. Lo mató en el palacio de la casa real en Samaria, y reinó en su lugar.
२५रमाल्याचा मुलगा पेकह हा त्याचा सरदार होता. त्याने अर्गोब व अरये आणि गिलादी लोकांतले पन्नास माणसे आपल्यासोबत घेतली, आणि त्याच्याविरुध्द कट करून त्यास शोमरोन मध्ये राजाच्या घरांतल्या महालात मारून ठार केले आणि त्याच्या जागी पेकह राज्य करू लागला.
26 Todo lo que hizo Pecaía, ciertamente está escrito en el rollo de las Crónicas de los reyes de Israel.
२६पेकह्याच्या सर्व पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
27 El año 52 de Azarías, rey de Judá, Peca, hijo de Remalías, comenzó a reinar en Israel y reinó 20 años en Samaria.
२७रमाल्याचा मुलगा पेकह शोमरोनात इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले.
28 Hizo lo malo ante Yavé, pues no se apartó de los pecados de Jeroboam, hijo de Nabat, con los cuales estimuló a pecar a Israel.
२८परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापांनी इस्राएलचा अध: पात झाला, त्या पापांपासून तो फिरला नाही.
29 En el tiempo de Peca, rey de Israel, llegó Tiglat-pileser, rey de Asiria. Tomó Ijón, Abel-bet-maaca, Janoa, Cedes, Hazor, Galaad, Galilea y toda la tierra de Neftalí, y los llevó cautivos a Asiria.
२९पेकह इस्राएलचा राजा असताना, अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करून आला. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल-बेथ-माका यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांस कैद करून अश्शूरला नेले.
30 El año 20 de Jotam, hijo de Azarías, [rey de Judá], Oseas, hijo de Ela, tramó una conspiración contra Peca, hijo de Remalías. Lo hirió, lo mató, y reinó en su lugar.
३०उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी, एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला.
31 Todo lo que hizo Peca ciertamente está escrito en el rollo de las Crónicas de los reyes de Israel.
३१पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
32 El segundo año de Peca, hijo de Remalías, rey de Israel, comenzó a reinar Jotam, hijo de Uzías, rey de Judá.
३२रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलमध्ये राज्यावर आल्यावर त्याच्या दुसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा उज्जीया याचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करु लागला.
33 Cuando comenzó a reinar tenía 25 años, y reinó 16 años en Jerusalén. El nombre de su madre fue Jerusa, hija de Sadoc.
३३योथाम तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. सादोकाची मुलगी यरुशा ही त्याची आई.
34 Hizo lo recto ante Yavé, conforme a todo lo que hizo su padre Uzías.
३४आपले वडिल उज्जीया यांच्या प्रमाणेच योथामही परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कृत्ये करत होता.
35 Sin embargo, no se quitaron los lugares altos, porque el pueblo aún sacrificaba y quemaba incienso en los lugares altos. Él construyó la puerta más alta de la Casa de Yavé.
३५पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामाने एक वरचा दरवाजा बांधला.
36 Todo lo que hizo Jotam, ¿no está escrito en el rollo de las Crónicas de los reyes de Judá?
३६यहूदाच्या राजाचा इतिहास, या पुस्तकात योथामाने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे.
37 En aquel tiempo Yavé comenzó a enviar a Rezín, rey de Siria, y a Peca, hijo de Remalías, contra Judá.
३७अरामाचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना यावेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्युक्त केले.
38 Azarías descansó Jotam con sus antepasados, y fue sepultado en la ciudad de David. Su hijo Acaz reinó en su lugar.
३८योथाम मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. दावीद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्यास पुरले. त्यानंतर त्याचा मुलगा आहाज नवा राजा झाला.