< 2 Reyes 13 >

1 El año 23 de Joás, hijo de Ocozías, rey de Judá, comenzó a reinar Joacaz, hijo de Jehú, sobre Israel en Samaria, y reinó 17 años.
अहज्याचा मुलगा योवाश यहूदाचा राजा, याच्या तेविसाव्या वर्षापासून येहूचा मुलगा यहोआहाज शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने सतरा वर्षे राज्य केले.
2 Hizo lo malo ante Yavé, porque siguió tras los pecados de Jeroboam, hijo de Nabat, con los cuales estimuló a pecar a Israel, y no se apartó de ellos.
परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी यहोआहाजाने केल्या. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच यहोआहाजाने केली, त्याने ती सोडली नाही.
3 La ira de Yavé se encendió contra Israel, y los entregó en repetidas ocasiones en mano de Hazael, rey de Siria, y en mano de Ben-adad, hijo de Hazael.
तेव्हा परमेश्वराचा इस्राएलवर कोप झाला. अरामाचा राजा हजाएल आणि हजाएलचा मुलगा बेन-हदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्राएलची सत्ता सोपवली.
4 Pero Joacaz oró a Yavé, y Yavé lo escuchó, porque Él veía la aflicción de Israel, cómo los oprimía el rey de Siria.
तेव्हा यहोआहाजाने मदतीसाठी परमेश्वराची याचना केली, तेव्हा परमेश्वराने त्याची विनंती ऐकली. अरामाच्या राजाने इस्राएली लोकांचा केलेला छळ आणि इस्राएलांच्या हाल अपेष्टा परमेश्वराने पाहिल्या होत्या.
5 Yavé dio a Israel un libertador, y se libraron de la mano de Siria. Los hijos de Israel vivieron en sus tiendas como antes.
मग परमेश्वराने इस्राएलाला तारणारा दिला. तेव्हा अराम्यांच्या हातून इस्राएलींची मुक्तता झाली आणि इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपापल्या मुक्कामी परतले.
6 Pero no se apartaron de los pecados de la casa de Jeroboam, con los cuales estimuló a pecar a Israel, sino anduvieron en ellos. También la Asera seguía en pie en Samaria.
तरीही यराबामाच्या घराण्याने जी पापे इस्राएल लोकांस करायला लावली ती करायचे काही त्यांनी सोडले नाही. यराबामाची सर्व पापाचरणे त्यांनी चालूच ठेवली शोमरोनात अशेरा देवतेचे स्तंभ त्यांनी ठेवलेच.
7 A Joacaz no le quedaban sino 50 jinetes, diez carruajes y 10.000 hombres de infantería, porque el rey de Siria los había destruido y los había dejado como el polvo de la trilla.
अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकांस त्याने ठार केले. फक्त पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलफटाप्रमाणे यहोआहाजाच्या सैनिकांची अवस्था होती.
8 Todos los hechos de Joacaz y su valor, ¿no están escritos en el rollo de las Crónicas de los reyes de Israel?
“इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात यहोआहाजाने केलेली थोर कृत्ये लिहून ठेवली आहेत.
9 Joacaz descansó con sus antepasados y lo sepultaron en Samaria. Reinó en su lugar su hijo Jeoás.
पुढे यहोआहाज मरण पावला आणि पूर्वजांसमवेत त्याचे दफन झाले. शोमरोनात लोकांनी त्यास पुरले. त्याचा मुलगा योवाश (किंवा यहोआश) त्याच्या जागी राज्य करु लागला.
10 El año 37 de Joás, rey de Judá, comenzó a reinar Jeoás, hijo de Joacaz, sobre Israel en Samaria, y reinó 16 años.
१०यहोआहाजाला मुलगा योवाश शोमरोनात इस्राएलच्या राजा झाला. यहूदाचा राजा योवाश याचे ते सदतिसावे वर्ष होते. योवाशाने इस्राएलवर सोळा वर्षे राज्य केले.
11 Hizo lo malo ante Yavé, y no se apartó de todos los pecados de Jeroboam, hijo de Nabat, con los cuales estimuló a pecar a Israel, sino anduvo en ellos.
११परमेश्वराने जे जे करु नका म्हणून सांगितले ते सर्व त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली ती करण्याचे योवाशाने सोडले तर नाहीच, उलट तोसुध्दा त्याच मार्गाने गेला.
12 Todos los hechos de Jeoás y su valor al luchar contra Amasías, rey de Judá, ¿no están escritos en el rollo de las Crónicas de los reyes de Israel?
१२इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात, योवाशाने केलेले पराक्रम आणि यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या लढाया यांची हकिकत आलेली आहे.
13 Jeoás descansó con sus antepasados, y Jeroboam se sentó en su trono. Jeoás fue sepultado en Samaria con los reyes de Israel.
१३योवाशाच्या निधनानंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. यराबाम सिंहासनावर आला आणि योवाशाचे शोमरोनात इस्राएलच्या राजांबरोबर दफन झाले.
14 Eliseo cayó enfermo con la enfermedad por la cual iba a morir. Y Jeoás, rey de Israel, bajó y lloró delante de él, y dijo: ¡Padre mío, padre mío! ¡Carroza de Israel y su jinete!
१४आता अलीशा तर आजारी पडला व त्या आजारातच पुढे तो मरण पावला. तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्यास भेटायला गेला आणि अलीशाबद्दल दु: खातिशयाने त्यास रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, इस्राएलचा रथ व त्याचे स्वार तुला घेण्यासाठी आले.”
15 Eliseo le dijo: Toma un arco y unas flechas. Así que él tomó un arco y unas flechas.
१५तेव्हा अलीशा योवाशाला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशाने धनुष्य व काही बाण घेतले
16 Y dijo al rey de Israel: Pon tu mano sobre el arco. Y él puso su mano sobre el arco. Entonces Eliseo apoyó sus manos sobre las manos del rey
१६मग अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “धनुष्यावर हात ठेव.” योवाशाने त्याप्रमाणे केले. अलीशाने मग आपले हात राजाच्या हातांवर ठेवले.
17 y dijo: Abre la ventana hacia el oriente, y él la abrió. Entonces Eliseo dijo: ¡Tira! Y al tirar él, Eliseo dijo: ¡Flecha de victoria de Yavé! ¡Sí, flecha de victoria contra Siria, pues matarás a los sirios en Afec hasta acabarlos!
१७अलीशा त्यास म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशाने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्यास बाण मारायला सांगितले. योवाशाने बाण सोडला. अलीशा त्यास म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामावरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.”
18 Y agregó: Toma las flechas. Y las tomó. Entonces dijo al rey de Israel: ¡Golpea la tierra! Él la golpeó tres veces y se detuvo.
१८अलीशा पुढे म्हणाला, “बाण घे.” योवाशाने ते घेतले. अलीशाने मग इस्राएलच्या राजाला भूमीवर बाण मारायला सांगितले. योवाशाने जमिनीवर तीन बाण मारले. मग तो थांबला.
19 Y el varón de ʼElohim se airó contra él y dijo: ¡Si hubieras golpeado cinco o seis veces, entonces herirías a Siria hasta acabarla! Pero ahora vencerás a Siria solo tres veces.
१९देवाचा मनुष्य योवाशावर रागावला. तो त्यास म्हणाला, “तू पाच सहावेळा तरी मारायला हवे होतेस. तरच तू अराम्यांना पुरते नेस्तनाबूत करु शकला असतास. आता तू फक्त तीनदाच त्यांचा पराभव करशील.”
20 Eliseo murió y lo sepultaron. El año siguiente llegaron bandas armadas de moabitas a la tierra.
२०अलीशाने देह ठेवला आणि लोकांनी त्यास पुरले. पुढे वसंतात मवाबी सैन्यातील काहीजण इस्राएलाला आले. लढाईनंतर लूट करायला ते आले होते.
21 Aconteció que al sepultar a un hombre, de repente vieron una banda armada, y lanzaron el muerto al sepulcro de Eliseo. Cuando el cadáver tocó los huesos de Eliseo, revivió y se levantó sobre sus pies.
२१काही इस्राएली लोक एका मृताला पुरत असताना त्यांनी या सैनिकांना पाहिले. तेव्हा त्या लोकांनी अलीशाच्या कबरेतच तो मृतदेह टाकला आणि पळ काढला. अलीशाच्या अस्थींना त्या देहाचा स्पर्श होताच तो मृत पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला.
22 Hazael, rey de Siria, afligió a Israel todos los días de Joacaz.
२२यहोआहाजाच्या कारकिर्दीमध्ये अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलचा छळ केला होता.
23 Pero Yavé tuvo misericordia y se compadeció de ellos. Se volvió hacia ellos a causa de su Pacto con Abraham, Isaac y Jacob. No los destruyó, ni los echó de su Presencia hasta ahora.
२३पण परमेश्वरासच इस्राएलची दया आली. इस्राएलवर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वरास इस्राएल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता. त्यास त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते.
24 Murió Hazael, rey de Siria, y su hijo Ben-adad reinó en su lugar.
२४अरामाचा राजा हजाएल मरण पावला. त्यानंतर बेन-हदाद राज्य करु लागला.
25 Jeoás, hijo de Joacaz, volvió a quitar de mano de Ben-adad, hijo de Hazael, las ciudades que éste tomó en guerra de mano de su padre Joacaz. Tres veces Jeoás lo venció, y recuperó las ciudades de Israel.
२५मृत्यूपूर्वी हजाएलने योवाशाचे वडिल यहोआहाज ह्यांच्या कडून युध्दात काही नगरे हस्तगत केली होती. पण योवाशाने ती आता हजाएलचा मुलगा बेन-हदाद याच्याकडून परत मिळवली. योवाशाने बेनहदादचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलची नगरे जिंकून घेतली.

< 2 Reyes 13 >